२ ऑक्टोबर २०२६ रोजी महात्मा गांधींची १५७ वी जयंती संपूर्ण भारत देशात साजरी केली जाईल. अहिंसा आणि नैतिकतेच्या आधारावर महात्मा गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे यशस्वी नेतृत्व केले. अहिंसा आणि सत्य ,सत्याग्रह व नैतिकता हेच त्यांच्या स्वातंत्र्य संकल्पनेचे मूलभूत शस्त्र होते. अहिंसा ही केवळ एक धार्मिक संकल्पना नसून ती एक सामाजिक शक्ती आहे .धर्माच्या चौकटीत बंदिस्त अहिंसेला सामाजिक स्वरूप देण्याचे प्रमुख कार्य भारतीय जनमानसात करत त्याद्वारे देश इंग्रजांच्या पारतंत्र्यातून मुक्त करत गांधीजींनी अहिंसेची शक्ती जगाला दाखवून दिली. महात्मा गांधीजींनी आपले उच्च शिक्षण (वकिलीचे शिक्षण) इंग्लंडमधील University College London (UCL) येथे घेतले. बॅरिस्टर म्हणून भारतात परतल्यावर त्यांनी त्याचा व्यावसायिक वापर न करता उच्च शिक्षण देशहितासाठी कारणी लावले.भारतीय स्वातंत्र्य आणि आज सुद्धा भारताच्या अस्तित्वाबद्दल बोलायचे झाले तर महात्मा गांधींच्या नावाशिवाय ते अशक्य आहे. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देणे इतकाच उद्देश न ठेवता पुढे देशाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी महात्मा गांधीजींनी अनेक विषयावर आपले विचार देशासमोर मांडले. त्यामध्ये ग्रामस्वराज्य, शिक्षण, नैतिकता, स्त्री शिक्षण, खेड्यांबद्दलची आत्मीयता, मजूर किंवा कामगारांबद्दल चे अधिकार विचार इत्यादी अनेक नीती वैचारिक पातळीवर स्पष्ट केल्या त्यामध्येच अपरिग्रहाच्या सिद्धांतावर आधारित विश्वस्तता किंवा ट्रस्टीशिप हा महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी मांडला. या आधारावर आज अनेक संस्था सामान्य माणसाचे हित जोपासत उभ्या आहेत. महात्मा गांधींची 'विश्वस्त संकल्पना' (Trusteeship Theory) हा त्यांच्या आर्थिक आणि नैतिक तत्त्वज्ञानाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गांधीजींनी १९०३ मध्ये हा सिद्धांत मांडला. समाजातील आर्थिक विषमता, शोषण आणि गरिबी दूर करण्यासाठी त्यांनी हा एक अहिंसक पर्याय सुचवला होता. या संकल्पनेचे मुख्य विचार असा आहे, “ संपत्तीचा खरा मालक समाज आहे ” गांधीजींच्या मते, कोणत्याही भांडवलदाराकडे किंवा श्रीमंत व्यक्तीकडे असणारी त्याच्या आवश्यकतेपेक्षा अधिक संपत्ती ही त्याची वैयक्तिक मालमत्ता नसून ती समाजाची आहे. श्रीमंत व्यक्तीने स्वतःला त्या संपत्तीचा मालक न समजता, 'विश्वस्त' (Trustee) म्हणजेच केवळ रखवाला समजावे. अपरिग्रह अर्थात् आवश्यकतेपेक्षा जास्त संग्रह न करणे हे या सिद्धांताचे प्रमुख तत्त्व आहे. या सिद्धांताचा पाया 'अपरिग्रह' या मूल्यावर आधारित आहे. व्यक्तीने आपल्या मूळ गरजा पूर्ण करण्यासाठी जितकी आवश्यक आहे तितकीच संपत्ती वापरावी. आपल्या गरजा भागल्यानंतर उरलेली अतिरिक्त संपत्ती कायदेशीररित्या समाजाच्या आणि गरिबांच्या कल्याणासाठी खर्च केली पाहिजे. असा विचार त्यांनी मांडला. हृदयपरिवर्तन आणि अहिंसक मार्ग गांधीजींचा साम्यवाद किंवा समाजवादाच्या बळजबरीने संपत्ती हिरावून घेण्याच्या (हिंसक) पद्धतीला विरोध होता. श्रीमंतांचे हृदयपरिवर्तन करून त्यांना स्वेच्छेने समाजाचे विश्वस्त बनवणे हाच आर्थिक समता आणण्याचा एकमेव शाश्वत आणि अहिंसक मार्ग आहे, असे गांधीजी मानत. ही विश्वस्तता महात्मा गांधीजींनी दिलेली अत्यंत मूल्यवान अशी संकल्पना आहे. या आधारे स्वातंत्र्य व स्वातंत्र्योत्तर काळानंतर त्यांच्या या संकल्पनेचा मान ठेवत अनेक उद्योगपती, गर्भश्रीमंत, संपन्न व्यक्तींनी त्यांच्या मालमत्तेचे विश्वस्थीकरण करत अनेक ट्रस्ट भारतामध्ये स्थापन झाले आजही आहेत निर्माण होत आहेत आणि त्याद्वारे गरजूंना मदत मिळते , विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते, औषधोपचार मिळतात. अपरिग्रह आणि संपत्तीचे विकेंद्रीकरण हा खूप मोलाचा महत्त्वाचा विचार देशाला देऊन महात्मा गांधीजींनी त्यांच्या काळापासूनच नव्हे तर भारताच्या पुढील उज्वल भविष्यासाठी सुद्धा एक मोठी व्यापक विचाराची देणगी दिलेली आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी आणि मिनी राजस्थान; भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
- मुंबई: ठाण्यातील ॲमेझॉन एआय डेटा सेंटर आणि रिंग मेट्रो प्रकल्पांचा फेरविचार करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पुणेः आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्गमित्रांकडून १५ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन अल्पवयीन ताब्यात!
महाराष्ट्र
- पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक बंदी केवळ कागदावरच! शहरात पिशव्यांचे ढीग साचल्याने नाले तुंबण्याच्या प्रमाणात मोठी वाढ
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अंबरनाथ: पालिकेची सभा सुरू असताना नाट्यगृहाबाहेर कारमध्ये सापडली तलवार व शस्त्रे; दोघांना ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ
- मुंबई: मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी आणि मिनी राजस्थान; भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

नंदनवन लॉन्समध्ये ‘शिवाजी महाराज चरित्र कथा’ला प्रारंभ! 🚩🙏
DSP चौकात वाहतूक नियम तोडणाऱ्या वाहनांवर कारवाई! 🚔⚠️
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपी CCTV कॅमेऱ्यात कैद! 📹⚠️
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




