पुणे: अत्यंत गजबजलेले आणि सातत्याने अपघातप्रवण क्षेत्र (डेथ ट्रॅप) म्हणून कुप्रसिद्ध असलेला नवले पूल परिसर पुन्हा एकदा एका गंभीर समस्येच्या विळख्यात सापडला आहे. नवले पुलाखालील सिग्नलवर वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे होणारे उघडउघड आणि बेजबाबदार उल्लंघन ही आता रोजचीच बाब बनली आहे. विशेष चिंतेची व संतापजनक गोष्ट म्हणजे, सिग्नलवर वाहतूक पोलीस स्वतः उपस्थित असतानाही अनेक वाहनचालक नियमांना केराची टोपाडी दाखवून आपली वाहने सर्रास झेब्रा क्रॉसिंग ओलांडून पुढे आणून उभी करतात. वाहनचालकांच्या या बेफिकीर वृत्तीमुळे या ठिकाणी दररोज छोटे-मोठे अपघात घडत असून, वाहनचालक आणि पादचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमकी व वादावादीचे प्रकार वाढले आहेत.
नवले पुलाखालील या महत्त्वाच्या चौकात चार वेगवेगळ्या दिशांनी वाहनांची नेहमीच मोठी येजा सुरू असते. कात्रज, सिंहगड रस्ता, महामार्ग आणि नऱ्हे या प्रमुख भागांतून येणाऱ्या आणि जाणारी वाहने याच चौकातून मार्गस्थ होतात, ज्यामुळे येथे नेहमीच प्रचंड वर्दळ असते. अशा अत्यंत संवेदनशील आणि धोक्याच्या ठिकाणी कडक व शिस्तबद्ध वाहतूक नियंत्रणाची नितांत गरज असते. मात्र, प्रत्यक्षात येथील परिस्थिती अत्यंत विदारक आणि उलट आहे.
नियम पायमल्लीचे नेमके चित्र काय? सिग्नल लाल असतानाही अनेक वाहनचालक आपली वाहने थांब्याची मर्यादा सोडून थेट झेब्रा क्रॉसिंगच्याही पुढे आणून थांबवतात. परिणामी, समोरून किंवा बाजूच्या रस्त्यावरून वळून येणाऱ्या वाहनांना सुरक्षितपणे मार्गक्रमण करण्यासाठी पुरेशी जागाच उरत नाही. त्यात भर म्हणून, जेव्हा सिग्नल हिरवा होतो, तेव्हा सर्व वाहनांमध्ये जणू काही शर्यत लागल्यासारखी स्थिती निर्माण होते, ज्यामुळे पादचारी आणि इतर वाहनचालक अक्षरशः जीव मुठीत धरून रस्ता ओलांडतात.
वाहतूक पोलिसांसमोरच नियमांचा बडगा गायब? घटनास्थळी वाहतूक पोलीस कर्मचारी तैनात असूनही त्यांच्या डोळ्यादेखत हा नियमभंग सुरू असतो. पोलिसांकडून योग्य कारवाई किंवा वचक निर्माण होत नसल्याने वाहनचालकांचे धाडस अधिकच वाढले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि त्रस्त वाहनधारकांकडून प्रशासनाकडे तातडीने कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली जात आहे.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




