नागपूर : राज्य सरकारने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' जाहीर करून राज्यातील ५५ लाख ७२ हजार पीककर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पूर्ण कर्ज माफ केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असले, तरी या कर्जमाफीच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता एक वेगळीच वस्तुस्थिती समोर येत आहे. घोषणा जरी ५५ लाख शेतकऱ्यांसाठी असली, तरी प्रत्यक्ष पूर्ण २ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा फायदा फक्त ५ लाख शेतकऱ्यांनाच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे योजनेचे गणित? राज्य सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत एकूण ५५ लाख ७२ हजार शेतकरी पात्र ठरत आहेत. मात्र, या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज सारखे नाही. कर्जमाफीच्या एकूण लाभार्थ्यांपैकी बहुतांश शेतकऱ्यांचे कर्ज हे अतिशय कमी रकमेचे आहे.
-
५० हजार रुपयांपर्यंत कर्ज असणारे शेतकरी: पात्र शेतकऱ्यांपैकी सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांचे पीककर्ज हे ५० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्यांना ५० हजारांच्या आतच कर्जमाफी मिळेल.
-
५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी: अंदाजे १५ लाख शेतकरी या गटामध्ये मोडतात, ज्यांचे कर्ज ५० हजार ते १ लाख रुपयांच्या दरम्यान थकबाकीत आहे.
-
१ लाख ते २ लाख रुपयांपर्यंतचे शेतकरी: पूर्ण २ लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीच्या परिघात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या केवळ ५ लाखांच्या आसपास आहे.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना मर्यादित लाभ या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, राज्यातील बहुतांश शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यांची कर्ज घेण्याची क्षमता आणि बँकांकडून मिळणारे पीककर्ज हे मुळातच ५० हजार रुपयांच्या आसपास असते. त्यामुळे दोन लाख रुपयांच्या मर्यादेची घोषणा झाली असली, तरी तब्बल ३५ लाख शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या कर्जमाफीवरच समाधान मानावे लागणार आहे. परिणामी, संपूर्ण २ लाख रुपयांच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष आणि कमाल लाभ मिळणारे शेतकरी केवळ ५ लाख म्हणजेच एकूण लाभार्थ्यांच्या फक्त १० टक्क्यांच्या आसपास असणार आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




