मुंबई: भारतीय जनता पार्टीचे (भाजप) वादग्रस्त आमदार नरेंद्र मेहता यांनी मिरा-भाईंदर शहरासंदर्भात दिलेले एक मोठे विधान सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा आणि वादाचा विषय ठरले आहे. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष जैन धार्मिक कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मेहता यांनी, "मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी असून हे एक प्रकारचे 'मिनी राजस्थान'च आहे," असा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मिरा-भाईंदरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नव्या राजकीय वादाची ठिणगी पडली आहे.
आमदारांनी दिला नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा दाखला: आपल्या विधानाचे समर्थन करताना आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितले की, या शहराचे प्रतिनिधित्व करणारे आमदार स्वतः जैन आहेत, शहराचे प्रथम नागरिक म्हणजेच महापौरपद देखील जैन व्यक्तीकडेच होते आणि पालिकेत तब्बल नऊ नगरसेवक हे जैन समाजातून निवडून आले आहेत. या सर्व आकडेवारीचा आणि वस्तुस्थितीचा दाखला देत त्यांनी मिरा-भाईंदर हे जैनबहुल आणि जैन संस्कृतीचे प्राबल्य असलेले शहर असल्याचा पुनरुच्चार केला.
शाळेतील 'कांदा-लसूण बंदी' वादावरही स्पष्टोक्ती: याच कार्यक्रमात बोलताना मेहता यांनी त्यांच्या मालकीच्या मिरा रोड येथील 'सेव्हन स्क्वेअर अकॅडमी' शाळेमध्ये पर्युषण पर्वाच्या काळात विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा, लसूण, बटाटा आणि कंदमुळांच्या भाज्या आणण्यावर घातलेल्या बंदीवरून निर्माण झालेल्या वादानंदर्भातही उघडपणे भाष्य केले. शाळेच्या या निर्णयाविरोधात मोठा विरोध व रोष व्यक्त झाल्यानंतरही आपण आपल्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. "जे होईल ते बघून घेऊ," असे अत्यंत आक्रमक शब्दांत सुनावत त्यांनी शाळेच्या नियमात किंवा भूमिकेत कोणताही बदल केला जाणार नाही, असे थेट संकेत दिले. तसेच, राज्यभरात जैन मुनींच्या पदयात्रेसाठी रस्त्यांवर आखण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर बोलताना, मिरा-भाईंदरमध्ये असा कोणताही वाद उभा राहू दिला नसल्याचे सांगत जैन समाजाच्या हिनासाठी व सोयीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिल्याचे सांगितले.
मनसे आक्रमक; तीव्र इशारा: भाजप आमदाराच्या या विधानानंतर मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) आक्रमक झाली असून तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसेचे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांनी नरेंद्र मेहता यांच्या विधानावर कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे. "मिरा-भाईंदर ही कोणतीही एका विशिष्ट समाजाची जहागिरी नसून ती येथील भूमिपुत्र आगरी-कोळी आणि सर्वसामान्य मराठी बांधवांची पवित्र भूमी आहे. अशाप्रकारची विधाने करून समाजात व शहरात तेढ निर्माण करण्याचे आणि वाद वाढवण्याचे उद्योग तातडीने बंद करावेत," असा थेट आणि सज्जड इशारा मनसेने दिला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मिरा-भाईंदरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात यावर आणखी तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहर
- मुंबई: ठाण्यातील ॲमेझॉन एआय डेटा सेंटर आणि रिंग मेट्रो प्रकल्पांचा फेरविचार करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पुणेः आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्गमित्रांकडून १५ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन अल्पवयीन ताब्यात!
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
महाराष्ट्र
- अंबरनाथ: पालिकेची सभा सुरू असताना नाट्यगृहाबाहेर कारमध्ये सापडली तलवार व शस्त्रे; दोघांना ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
- बुलढाणा: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बुलढाण्यात महामोर्चा; हेक्टरी १ लाखांच्या मदतीसह विविध मागण्यांसाठी ठाकरे सेना आक्रमक
- मुंबई: ठाण्यातील ॲमेझॉन एआय डेटा सेंटर आणि रिंग मेट्रो प्रकल्पांचा फेरविचार करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




