सुखवीर सिंह यांचा कॉलम:जगाची कहाणी आता फक्त अमेरिकेच्या शक्तीने लिहिली जाणार नाही‎

‎‎‎‎‎‎‎‎‎‎वॉशिंग्टनच्या जॉइंट बेस अँड्र्यूजवर त्या दिवशी एक‎विलक्षण दृश्य दिसले. शी जिनपिंग विमानातून खाली‎उतरताच खुद्द ट्रम्प त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले.‎दुसऱ्या दिवशी व्हाईट हाऊसमध्ये दिलेले राजकीय‎मेजवानीचे आमंत्रण, मिळालेला लष्करी सन्मान आणि‎मुत्सद्देगिरीची आपुलकीची भाषा यांनी या दृश्याला‎अधिक अर्थपूर्ण बनवले. पण या सगळ्यामागे एक गंभीर‎प्रश्न दडला होता- अमेरिका चीनची मनधरणी करत आहे‎का? आणि अमेरिकेला डॉलरची स्थिती सांभाळण‎्यासाठी चीनच्या सहकार्याची गरज असेल, तर बीजिंग‎इतक्या सहजासहजी दया दाखवेल का?‎ हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे, कारण सप्टेंबर 2026‎मध्ये अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज 40.10 ट्रिलियन‎डॉलरच्या पार गेले. गेल्या एका वर्षात यात 2.67 ट्रिलियन‎डॉलरची भर पडली. अमेरिकेचे सार्वजनिक कर्ज,‎अल्पमुदतीच्या कर्जावरील वाढते अवलंबित्व जागतिक‎आर्थिक स्थिरतेसाठी धोक्याचे ठरत आहे, अशी तीव्र‎ताकीद 1 ‘आयएमएफ''नेही दिली आहे. तरीही डॉलरची‎जागतिक शक्ती अजूनही इतकी मजबूत आहे की,‎‘आयएमएफ''च्या आकडेवारीनुसार 2026 च्या पहिल्या‎तिमाहीत जगातील अधिकृत परकीय चलन साठ्यात‎डॉलरचा वाटा 57.13% होता. अमेरिकेच्या असामान्य‎शक्तीचा मोठा पाया म्हणजे तिचे चलन हे फक्त तिचे‎राहिलेले नाही. जगातील मध्यवर्ती बँका आपल्याकडे‎डॉलर ठेवतात. आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये होतो‎आणि संकटाच्या वेळी अमेरिकन ट्रेझरी बॉण्ड्स हे सर्वात‎सुरक्षित मानले जातात. एप्रिल 2025 मध्ये जागतिक‎परकीय चलन बाजारात रोज सुमारे 9.6 ट्रिलियन डॉलरचा‎व्यवहार झाला. यातील 89.2% व्यवहारांत एका बाजूला‎डॉलर होता. याच व्यवस्थेने अमेरिकेला कित्येक‎दशकांपासून उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्याची मुभा‎दिली. अमेरिका वस्तू आयात करते, व्यापार तूट सहन‎करते. बदल्यात जग अमेरिकेची आर्थिक मालमत्ता खरेदी‎करते. अमेरिका जगाकडून माल घेते आणि जग तिच्या‎कागदी दाव्यांची जपणूक करते. चीन हा अमेरिकेचा मोठा‎धोरणात्मक प्रतिस्पर्धी तर आहेच. पण तिच्या आर्थिक‎रचनेचा महत्त्वाचा भागही आहे. त्यामुळे चीनने अमेरिकन‎आर्थिक साठ्यातील भूमिका अचानक बदलली, तर‎त्याचा परिणाम फक्त अमेरिकेवरच नाही, तर संपूर्ण‎जागतिक आर्थिक बाजारावर होऊ शकतो. ‘आयएमए‎''नुसार 2026 च्या पहिल्या तिमाहीत जागतिक अधिकृत‎साठ्यात चीनी ‘रेनमिन्बी''चा वाटा फक्त 1.99% होता-‎जो डॉलरच्या 57.13% च्या तुलनेत खूपच कमी आहे.‎तरीही ‘बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटनुसार 2025 मध्ये‎जागतिक परकीय चलन व्यवहारात रेनमिन्बीचा वाटा‎8.5% पर्यंत पोहोचला होता. अमेरिकेची अशी इच्छा आहे‎की चीनने तिच्याकडून अधिक वस्तू खरेदी कराव्यात,‎जेणेकरून व्यापार तूट कमी होईल. डॉलर मजबूत राहील.‎दुसऱ्या बाजूला चीनच्या तांत्रिक क्षमतेला वेसण‎घालण्याचाही अमेरिकेचा प्रयत्न आहे. अमेरिकेला‎चीनकडून ‘रेअर अर्थ एलिमेंट्स''चा पुरवठा तर हवा‎आहे. स्वतःचे प्रगत तंत्रज्ञान चीनपर्यंत पोहोचण्यापासून ती‎रोखत आहे. हा अमेरिकन धोरणाचा खरा विरोधाभास‎आहे. ट्रम्प यांनी विमानतळावर जाऊन शी जिनपिंग यांचे‎केलेले स्वागत हे केवळ कूटनीतिक शिष्टाचार नव्हते; तर‎ते बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेचे एक प्रतीक होते. या‎व्यवस्थेत अमेरिका सर्वाधिक शक्तिशाली खेळाडू‎नक्कीच आहे. पण आता ती मैदानात एकटी नाही. डॉलर‎अजून संकटात सापडलेला नाही. पण आता त्याची कथा‎अमेरिकेच्या शक्तीवर लिहिली जाणार नाही, हे मात्र‎तितकेच खरे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *