वॉशिंग्टनच्या जॉइंट बेस अँड्र्यूजवर त्या दिवशी एकविलक्षण दृश्य दिसले. शी जिनपिंग विमानातून खालीउतरताच खुद्द ट्रम्प त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले.दुसऱ्या दिवशी व्हाईट हाऊसमध्ये दिलेले राजकीयमेजवानीचे आमंत्रण, मिळालेला लष्करी सन्मान आणिमुत्सद्देगिरीची आपुलकीची भाषा यांनी या दृश्यालाअधिक अर्थपूर्ण बनवले. पण या सगळ्यामागे एक गंभीरप्रश्न दडला होता- अमेरिका चीनची मनधरणी करत आहेका? आणि अमेरिकेला डॉलरची स्थिती सांभाळण्यासाठी चीनच्या सहकार्याची गरज असेल, तर बीजिंगइतक्या सहजासहजी दया दाखवेल का? हा प्रश्न यासाठी महत्त्वाचा आहे, कारण सप्टेंबर 2026मध्ये अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज 40.10 ट्रिलियनडॉलरच्या पार गेले. गेल्या एका वर्षात यात 2.67 ट्रिलियनडॉलरची भर पडली. अमेरिकेचे सार्वजनिक कर्ज,अल्पमुदतीच्या कर्जावरील वाढते अवलंबित्व जागतिकआर्थिक स्थिरतेसाठी धोक्याचे ठरत आहे, अशी तीव्रताकीद 1 ‘आयएमएफ''नेही दिली आहे. तरीही डॉलरचीजागतिक शक्ती अजूनही इतकी मजबूत आहे की,‘आयएमएफ''च्या आकडेवारीनुसार 2026 च्या पहिल्यातिमाहीत जगातील अधिकृत परकीय चलन साठ्यातडॉलरचा वाटा 57.13% होता. अमेरिकेच्या असामान्यशक्तीचा मोठा पाया म्हणजे तिचे चलन हे फक्त तिचेराहिलेले नाही. जगातील मध्यवर्ती बँका आपल्याकडेडॉलर ठेवतात. आंतरराष्ट्रीय व्यापार डॉलरमध्ये होतोआणि संकटाच्या वेळी अमेरिकन ट्रेझरी बॉण्ड्स हे सर्वातसुरक्षित मानले जातात. एप्रिल 2025 मध्ये जागतिकपरकीय चलन बाजारात रोज सुमारे 9.6 ट्रिलियन डॉलरचाव्यवहार झाला. यातील 89.2% व्यवहारांत एका बाजूलाडॉलर होता. याच व्यवस्थेने अमेरिकेला कित्येकदशकांपासून उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करण्याची मुभादिली. अमेरिका वस्तू आयात करते, व्यापार तूट सहनकरते. बदल्यात जग अमेरिकेची आर्थिक मालमत्ता खरेदीकरते. अमेरिका जगाकडून माल घेते आणि जग तिच्याकागदी दाव्यांची जपणूक करते. चीन हा अमेरिकेचा मोठाधोरणात्मक प्रतिस्पर्धी तर आहेच. पण तिच्या आर्थिकरचनेचा महत्त्वाचा भागही आहे. त्यामुळे चीनने अमेरिकनआर्थिक साठ्यातील भूमिका अचानक बदलली, तरत्याचा परिणाम फक्त अमेरिकेवरच नाही, तर संपूर्णजागतिक आर्थिक बाजारावर होऊ शकतो. ‘आयएमए''नुसार 2026 च्या पहिल्या तिमाहीत जागतिक अधिकृतसाठ्यात चीनी ‘रेनमिन्बी''चा वाटा फक्त 1.99% होता-जो डॉलरच्या 57.13% च्या तुलनेत खूपच कमी आहे.तरीही ‘बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटनुसार 2025 मध्येजागतिक परकीय चलन व्यवहारात रेनमिन्बीचा वाटा8.5% पर्यंत पोहोचला होता. अमेरिकेची अशी इच्छा आहेकी चीनने तिच्याकडून अधिक वस्तू खरेदी कराव्यात,जेणेकरून व्यापार तूट कमी होईल. डॉलर मजबूत राहील.दुसऱ्या बाजूला चीनच्या तांत्रिक क्षमतेला वेसणघालण्याचाही अमेरिकेचा प्रयत्न आहे. अमेरिकेलाचीनकडून ‘रेअर अर्थ एलिमेंट्स''चा पुरवठा तर हवाआहे. स्वतःचे प्रगत तंत्रज्ञान चीनपर्यंत पोहोचण्यापासून तीरोखत आहे. हा अमेरिकन धोरणाचा खरा विरोधाभासआहे. ट्रम्प यांनी विमानतळावर जाऊन शी जिनपिंग यांचेकेलेले स्वागत हे केवळ कूटनीतिक शिष्टाचार नव्हते; तरते बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेचे एक प्रतीक होते. याव्यवस्थेत अमेरिका सर्वाधिक शक्तिशाली खेळाडूनक्कीच आहे. पण आता ती मैदानात एकटी नाही. डॉलरअजून संकटात सापडलेला नाही. पण आता त्याची कथाअमेरिकेच्या शक्तीवर लिहिली जाणार नाही, हे मात्रतितकेच खरे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
- मुंबई: ठाण्यातील ॲमेझॉन एआय डेटा सेंटर आणि रिंग मेट्रो प्रकल्पांचा फेरविचार करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पुणेः आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्गमित्रांकडून १५ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन अल्पवयीन ताब्यात!
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
महाराष्ट्र
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
- बुलढाणा: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बुलढाण्यात महामोर्चा; हेक्टरी १ लाखांच्या मदतीसह विविध मागण्यांसाठी ठाकरे सेना आक्रमक
- मुंबई: ठाण्यातील ॲमेझॉन एआय डेटा सेंटर आणि रिंग मेट्रो प्रकल्पांचा फेरविचार करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पुणेः आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्गमित्रांकडून १५ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन अल्पवयीन ताब्यात!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




