मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:दहा वर्षांमध्ये देशाचा जीडीपी‎ तीनपटीने वाढू शकतो का?

‎‎‎‎‎‎‎‎‎‎जेपी मॉर्गनचे सीईओ जेमी डिमॉन यांनी 21-22 सप्टेंबर‎दरम्यान भारत दौऱ्यावर असताना एक टिप्पणी केली‎होती. ती टिप्पणी सध्या चर्चेत आहे. डिमॉन म्हणाले ,‎भारताचा जीडीपी 10 वर्षांत 4.2 ट्रिलियन डॉलरवरून‎वाढून 12.5 ट्रिलियन डॉलर होईल. जगातील अत्यंत‎शक्तिशाली आणि अभ्यासू बँकरमध्ये डिमॉन यांची‎गणना होते. त्यामुळे त्यांच्या या अंदाजावर सर्वांनाच‎आश्चर्य वाटले. मात्र, एका वर्तमानपत्राने विविध तक्ते व‎गणितांच्या आधारे डिमॉन यांच्या अंदाजावर प्रश्न‎उपस्थित केले. डिमॉन यांच्या आकड्यांपर्यंत ‎‎पोहोचण्यासाठी भारताला दरवर्षी किती विकासदर हवा ‎‎असेल, याचे स्वतःचे गणित त्यांनी मांडले.‎ वृत्तपत्राचे वरिष्ठ असोसिएट एडिटरने डिमॉन यांचे ‎‎जीडीपीचे गणित समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ‎‎2036 मधील भारताच्या अर्थव्यवस्थेचा स्वतःचा अंदाज ‎‎वर्तवला. त्यांच्या मते, डिमॉन यांची 10 वर्षांची मुदत‎लक्षात घेतली तर भारताची अर्थव्यवस्था 4.2 ट्रिलियन ‎‎डॉलरवरून 12.5 ट्रिलियन डॉलर करण्यासाठी जीडीपी ‎‎दरवर्षी 11.6% दराने वाढावा लागेल. हे अशक्य दिसते. ‎‎कारण गेल्या 12 वर्षांत भारताचा सरासरी विकासदर‎6.2% इतकाच राहिला आहे. हाच 6.2% विकासदर‎असाच सुरू राहिला, तर 2036 मध्ये भारताचा जीडीपी‎7.6 ट्रिलियन डॉलर असेल. 12.5 ट्रिलियन डॉलर नाही.‎पण या विश्लेषणात तीन मोठ्या चुका होत्या.‎ पहिली चूक म्हणजे, त्यांचे गणित नॉमिनल जीडीपीवर‎(वास्तविक जीडीपी अधिक महागाईचा दर) आधारित‎आहे. पण 2036 मध्ये 7.6 ट्रिलियन डॉलरच्या‎निष्कर्षावर पोहोचण्यासाठी त्यांनी नॉमिनल नव्हे, तर‎गेल्या 12 वर्षांतील 6.2% या सरासरी वास्तविक‎विकासदराचा वापर केला. दुसरी चूक ही की, त्यांनी 12‎वर्षांतील सरासरी विकासदर कमी करणाऱ्या कोरोनाच्या‎दोन वर्षांचा प्रभाव दुर्लक्षित केला. कोणतेही स्पष्टीकरण‎न देता त्याच आधारावर भविष्याचे अंदाज बांधले.‎तीसरी चूक म्हणजे रशिया-युक्रेन आणि इराणमधील‎युद्धे संपली. बराच काळ प्रलंबित भारत-अमेरिका‎व्यापार करार झाला आणि कच्च्या तेलाचे दर पुन्हा‎65-70 डॉलर प्रति बॅरलवर आले, तरीही जीडीपी 8%‎पेक्षा जास्त वाढणार नाही, असे गृहीत धरले. आता हे‎समजून घेऊ की, जर डिमॉन यांनी या तीन चुका टाळून‎अंदाज लावला असेल, तर त्यांचे गणित कसे दिसते.‎पहिली गोष्ट म्हणजे, 2020-22 च्या कोरोनानंतर गेल्या‎चार वर्षांत (2022-26) भारताचा सरासरी नॉमिनल‎जीडीपी विकासदर 10.5% पेक्षा जास्त राहिला आहे.‎यात 8% वास्तविक विकासदर , 2.5% महागाई दराचा‎समावेश आहे. दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही युद्धे संपली,‎तेलाचे दर खाली आले. भारत-अमेरिका व्यापार करार‎झाला तर भारत वापरावर आधारित विकासदर वाढून‎8.5% होण्याची अपेक्षा करू शकतो. यात 3% महागाई‎दर जोडल्यास भारताचा नॉमिनल जीडीपी विकासदर‎11.5% होईल. मग हे गणित आपल्याला 12.5 ट्रिलियन‎डॉलरपर्यंत पोहोचवेल का?‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सुरुवात सध्याच्या 4.2 ट्रिलियन डॉलरपासून करूया.‎11.5% च्या नॉमिनल विकासदराने वाढणारा जीडीपी दर‎सहा वर्षांनी जवळपास दुप्पट होतो. म्हणजेच 2032 पर्यंत‎भारताचा जीडीपी 8.4 ट्रिलियन डॉलर होईल. नंतर‎2036 पर्यंत आणखी चार वर्षे शिल्लक राहतात. 11.5%‎दराने या चार वर्षांत जीडीपी सुमारे 50 टक्क्यांनी‎आणखी वाढेल. अशा प्रकारे 2036 मध्ये तो वाढून 12.6‎ट्रिलियन डॉलर होईल. पण रुपया कमकुवत होत‎राहिला, तर हे अंदाज चुकू शकतात का? तसे होण्याची‎शक्यता फार कमी आहे. कारण युद्ध व व्यापाराशी‎जोडलेले संकट टळले, तर पुढच्या वर्षी ''ला-निना''चा‎सकारात्मक प्रभाव चांगला मान्सून आणू शकतो. तसेच‎2028 मध्ये ट्रम्प यांचा कार्यकाळ संपेल, तेव्हा रुपया‎स्थिर राहू शकतो आणि तो अधिक मजबूतही होऊ‎शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे)‎ युद्धे संपली, तेलाचे दर घसरले आणि‎भारत-अमेरिका व्यापार करार पूर्ण‎झाला, तर आपल्या वापरावर आधारित‎वास्तविक विकासदर 8.5% वर‎पोहोचण्याची आशा करू शकतो. यात‎3% महागाई दर जोडल्यास नॉमिनल‎जीडीपी 11.5% होईल. हे गणित‎आपल्याला 12.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत‎सहज पोहोचवेल.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *