बुलढाणा: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील गंभीर समस्या, कोरडा दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे एक भव्य आणि धडाकेबाज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे व अपुऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने तातडीने दखल घेऊन मदत करावी, या मुख्य उद्देशाने हा मोर्चा काढण्यात आला.
खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर हजारो शिवसैनिक, शेतकरी आणि पक्षाचे पदाधिकारी रस्त्यावर उतरले. मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा यांसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आणि गावोगावहून मोठ्या संख्येने शेतकरी या ऐतिहासिक मोर्चान्मध्ये सहभागी झाले होते. बैलगाड्या, ट्रॅक्टर, महिला शेतकरी आणि युवक शेतकऱ्यांचा मोठा सहभाग हे या मोर्चाचे सर्वात मोठे आणि विशेष आकर्षण ठरले.
मोर्चातील प्रमुख मागण्या आणि निवेदनातील मुद्दे: जिल्हधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये शेतकऱ्यांच्या हिवाळयातील व दुष्काळी परिस्थितीशी संबंधित अनेक ज्वलंत मुंडे मांडण्यात आले आहेत:
-
हेक्टरी १ लाख मदत: शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी.
-
थकीत पीकविमा: मागील वर्षाची थकीत पीकविमा रक्कम विनाविलंब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी.
-
वीजपुरवठा व स्मार्ट मीटर: शेतीसाठी पूर्ण क्षमतेने आणि सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, तसेच शेतीवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तातडीने थांबवावी.
-
कर्जमाफी व अनुदान: कर्जमाफीच्या उर्वरित याद्या लवकरात लवकर जाहीर कराव्यात आणि नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे.
-
इतर मागण्या: विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करण्यात यावी, पशुधनासाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या रकमेत वाढ करावी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतजमिनींसाठी तातडीने पंचनामे न करता थेट मदत जाहीर करावी.
दिग्गजांची उपस्थिती आणि सरकारला कडक इशारा: या आंदोलनाला खासदार अरविंद सावंत, आमदार नितीन बापू देशमुख, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच प्रवक्त्या जयशीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, नगराध्यक्ष किशोर गारोळे, उपजिल्हाप्रमुख प्रा. आशिष राहते यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि विविध अंगीकृत संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. जर शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या येत्या काही दिवसांत पूर्ण केल्या नाहीत, तर तीव्र लढा उभारला जाईल आणि प्रसंगी समृद्धी महामार्ग जाम केला जाईल, असा सज्जड इशारा आयोजकांकडून देण्यात आला आहे. "शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष सुरूच राहील, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी एक पाऊल पुढे!" असा दृढ निर्धार यावेळी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत व्यक्त करण्यात आला.
शहर
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
- मुंबई: ठाण्यातील ॲमेझॉन एआय डेटा सेंटर आणि रिंग मेट्रो प्रकल्पांचा फेरविचार करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पुणेः आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्गमित्रांकडून १५ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन अल्पवयीन ताब्यात!
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
महाराष्ट्र
- मुंबई: मीरा-भाईंदर ही जैनांची नगरी आणि मिनी राजस्थान; भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वातावरण तापले
- पुणे: नवले पुलाखाली वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली; पोलिसांसमोरच झेब्रा क्रॉसिंगचे उल्लंघन सुरू
- मुंबई: ठाण्यातील ॲमेझॉन एआय डेटा सेंटर आणि रिंग मेट्रो प्रकल्पांचा फेरविचार करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पुणेः आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्गमित्रांकडून १५ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन अल्पवयीन ताब्यात!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




