पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी लोकसभेत इशारा दिला की पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेले जागतिक अडथळे यापुढेही सुरू राहू शकतात. कोविड काळाप्रमाणेच आताही देशवासीयांनी तयार व एकजूट राहावे, असे आवाहन त्यांनी केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी राज्यसभेतही याचीच पुनरावृत्ती केली आणि गरीब, मजूर, स्थलांतरित तसेच इतर गरजूंना मदत व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्यांकडे सहकार्य मागितले. कोविडच्या संकटात देशाने कशा प्रकारे एकजुटीने आव्हानाचा सामना केला होता, याची त्यांनी आठवण करून दिली. ते म्हणाले की, आजही तशाच प्रयत्नांची गरज आहे. आणि बुधवारी सरकारने हळूहळू नियम कठोर करण्यास सुरुवात केली, ज्यापैकी एक आपल्या स्वयंपाकाच्या गॅसशी संबंधित होता. सरकारने घोषणा केली की, जर तुमच्या घरापर्यंत पीएनजीची (पाइप्ड नॅचरल गॅस) लाइन असेल आणि तरीही तुम्ही कनेक्शन घेतले नाही, तर तीन महिन्यांनंतर सरकार तुमचा एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) पुरवठा खंडित करू शकते. युद्धाच्या परिणामी आयात प्रभावित झाल्याने एलपीजीचा तुटवडा निर्माण होत असताना सरकारचे हे पाऊल समोर आले आहे. भारत आपला 6०% एलपीजी आयात करतो, ज्यातील 9०% पश्चिम आशियातून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो, जे सध्या संघर्षाचे केंद्र बनले आहे. असे करून सरकारने संकेत दिले की, या संकटातून बाहेर पडण्यासाठी विचार बदलणे आवश्यक आहे. ‘नेहमीप्रमाणे काम सुरू राहील’ हा दृष्टिकोन चालणार नाही. उद्योजक व आर्थिक घडामोडी चालवणाऱ्या शीर्ष लोकांनी हा संकेत सर्वात आधी ओळखला आहे. गेल्या 3 दिवसांत मी उद्योजकांसोबत काही बैठकांमध्ये सहभागी झालो, जिथे सर्वांचे म्हणणे होते की, ‘येणारे काही महिने खूप उलथापालथीचे राहतील.’ त्यांनी आधीच त्यांच्या एचआर प्रमुखांना कंबर कसण्याचे संकेत दिले आहेत. काही काळ भरती संथ करा किंवा थांबवा. नवीन आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये होणाऱ्या वेतनवाढीच्या पार्श्वभूमीवर एचआरला निर्देश दिले गेले आहेत की, पगारवाढीसाठी नावे पाठवण्यापूर्वी कामगिरीचे मूल्यमापन करावे आणि ‘नॉन-परफॉर्मिंग’ तसेच ‘अनावश्यक’ पदे काढून टाकावीत. सध्याचे वातावरण कर्मचाऱ्यांना स्पष्ट संदेश देत आहे. आपल्यासारख्या बहुतांश मिड-लेव्हल कर्मचाऱ्यांसाठी हा केवळ आणखी एक व्यग्र सीझन नाही, तर स्वतःचे महत्त्व सिद्ध करण्याची आणि संस्थेत आपले स्थान बळकट करण्याची एक महत्त्वाची संधी आहे. यासाठी काही सूचना खालीलप्रमाणे आहेत: 1. तुमचा आउटपुट आणि फोकस दुप्पट करा: अतिरिक्त जबाबदाऱ्या स्वीकारून आणि उच्च दर्जाचे निकाल देऊन, एखादा कर्मचारी केवळ ‘दहापैकी एक’ राहण्याऐवजी त्या दहांपैकी सर्वात महत्त्वाचा बनून संस्थेसाठी एक आवश्यक ‘अॅसेट’ बनू शकतो.
2. ’वर्क फ्रॉम होम’ला नकार द्या: जरी ‘वर्क फ्रॉम होम’ आता सामान्य व्यवस्था असली तरी सध्याच्या परिस्थितीत धोरणात्मकदृष्ट्या ऑफिसमध्ये उपस्थित राहण्याची गरज आहे. जिथे निर्णय घेतले जातात आणि आव्हानांचा सामना केला जातो, तिथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे तुमची बांधिलकी आणि एकजूट दर्शवते. व्हिडिओ कॉलवर हे दाखवणे कठीण असते. कठीण काळात तुम्ही कंपनीत टिकून राहण्यासाठी आणि वाढीसाठी समर्पित आहात, हे यातून नेतृत्वाला समजते.
3. तुम्ही त्याग करू शकता हे दाखवून द्या: तुम्ही लाँग वीकेंड जोडून कुटुंबासोबत ब्रेक प्लॅन करू शकता, जसे की रामनवमी, नंतर चौथा शनिवार-रविवार आणि लगोलग महावीर जयंतीची ऐच्छिक सुट्टी. अनेक लोक असा लांबचा ब्रेक घेऊ शकतात. परंतु यात आणखी एक कॅज्युअल किंवा मेडिकल रजा जोडल्याने केवळ तुमच्या बॉसलाच नव्हे, तर टॉप मॅनेजमेंटलाही चुकीचा संदेश जाऊ शकतो.
4. तुमची उत्पादकता दाखवा: गरजेपेक्षा जास्त गाजावाजा न करता अतिशय कुशलतेने तुमचे वास्तविक काम संस्थेतील योग्य लोकांपर्यंत पोहोचवा. फंडा हा आहे की, जेव्हा आपण एका ‘कठीण काळातून’ जात आहोत, तेव्हा आपल्या ‘जॉब डिस्क्रिप्शन’च्या पुढे जा आणि कंपनीसाठी हे अशक्य करून दाखवा की ते तुमच्याशिवाय कामाचा विचारही करू शकतील.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




