नागपूर: एमआयडीसीतील गजबजलेल्या चौकात सायंकाळी अचानक एकच गोंधळ उडाला. आठ ते दहा जणांचे टोळके दोन युवकांवर अचानक तुटून पडले आणि भररस्त्यात त्यांना बेदम मारहाण करू लागले. या थरारक घटनेदरम्यान टोळक्यातील एका आरोपीने कंबरेला खोचलेली संशयास्पद वस्तू बाहेर काढण्याचा वारंवार प्रयत्न केला. ते पाहून मारहाण सहन करणाऱ्या युवकांच्याच नव्हे, तर घटनास्थळी उभ्या असलेल्या नागरिकांच्याही काळजाचा ठोका चुकला. मात्र, समोरच सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे लक्षात येताच आरोपीच्या साथीदाराने त्याला रोखले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. चौकात वाढणारी गर्दी पाहून आरोपींनी त्या जखमी युवकांना बळजबरीने एका ऑटोत कोंबले आणि वेगाने तिथून पसार झाले. या घटनेमुळे काहीतरी भयंकर घडणार याची कल्पना आल्याने अनेकजण प्रचंड शहारले होते.
मात्र, एका 'अज्ञात हिरो'ने अत्यंत सजग नागरिकाचे कर्तव्य पार पाडले आणि काही वेळेतच चोहोबाजूने पोलिसांच्या गाड्या घटनास्थळांकडे धावल्या. हे पोलिसांचे चित्रपटाला शोभेल असे सिनेस्टाइल धाडस पाहून आरोपी त्या जखमी तरुणांना तिथेच सोडून पळून गेले. एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा हा घटनाक्रम शुक्रवारी सायंकाळी ४ ते ५ च्या सुमारास एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणांची नावे अभय आणि राजा अशी आहेत. महिनाभरापूर्वी एका कुख्यात गुन्हेगारासोबत या दोघांचे भांडण झाले होते, ज्याची खुन्नस मनात ठेवून आज या गुन्हेगाराच्या टोळीने एमआयडीसीतील चौकात त्यांना घेरले आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. सलग पावसामुळे आधीच वातावरण अंधारलेले होते, त्यात या थरारक घटनेने वातावरण आणखीनच गंभीर झाले.
अनेक आरोपी दारूच्या नशेत धिंगाणा घाजत असल्याने त्यांची देहबोली पाहून ते या दोघांसोबत काहीही करू शकतील, अशी भीती गर्दीतील अनेकांना वाटत होती. मात्र, त्यांना रोखण्याचे धाडस कुणीच दाखवले नाही. दरम्यान, घटनास्थळी सीसीटीव्ही असल्याने आणि गर्दी वाढत असल्याने आरोपींनी या दोन्ही तरुणांना उचलून ऑटोत कोंबले. काही आरोपी ऑटोत बसले तर काही इतर वाहनांनी सुसाट वेगाने शांतीनगरातील एका भंगाराच्या गोदामाकडे निघून गेले. मोठा गुन्हा घडणार असल्याची कुणकुण लागताच गर्दीतील एका सजग नागरिकाने तातडीने पोलिसांना याची गोपनीय माहिती दिली.
ही माहिती वरिष्ठांच्या कानावर जाताच अतिरिक्त विनिता साहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल, झोन १ चे डीसीपी ऋषिकेश सिंगारेड्डी आदी अधिकारी लगेच ॲक्शन मोडवर आले. त्यांनी कंट्रोल रूमच्या माध्यमातून एमआयडीसी तसेच आजूबाजूच्या ठाण्यातील पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे कडक आदेश दिले. एकाच वेळी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन खणखणल्याने पोलिसांची अनेक वाहने त्या भंगाराच्या गोदामाकडे सुसाट धावली. पोलिसांचा हा मोठा फौजफाटा आणि 'सिनेस्टाइल ॲक्शन' पाहून गुन्हेगारांचे ते टोळके भयभीत झाले आणि तिथून सटकले.
या प्रकरणाची नोंद पोलिसांकडे झाली असली, तरी जखमी तरुण पोलिस ठाण्यात पोहोचले असता त्यांना रात्रीपर्यंत ताटकळत बसवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत अधिकृत गुन्हा दाखल झाला नव्हता. मारहाण आणि अपहरणाचा हा संतापजनक प्रकार एका स्थानिक भंगारवाल्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने केल्याची प्राथमिक माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणात दोषींवर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
Disclaimer: या पोस्टमधील माहिती उपलब्ध वृत्तस्रोत व अधिकृत माहितीनुसार प्रकाशित करण्यात आली आहे. तपास किंवा अधिकृत प्रक्रियेनुसार तथ्यांमध्ये बदल होऊ शकतो.
या पोस्टचा उद्देश केवळ माहिती देणे असून अंतिम सत्यता संबंधित शासकीय यंत्रणा व न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून आहे.
शहर
- मुंबई: ठाण्यातील ॲमेझॉन एआय डेटा सेंटर आणि रिंग मेट्रो प्रकल्पांचा फेरविचार करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पुणेः आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्गमित्रांकडून १५ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन अल्पवयीन ताब्यात!
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
महाराष्ट्र
- बुलढाणा: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बुलढाण्यात महामोर्चा; हेक्टरी १ लाखांच्या मदतीसह विविध मागण्यांसाठी ठाकरे सेना आक्रमक
- मुंबई: ठाण्यातील ॲमेझॉन एआय डेटा सेंटर आणि रिंग मेट्रो प्रकल्पांचा फेरविचार करा; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- पुणेः आंबेगाव बुद्रुक परिसरात वर्गमित्रांकडून १५ वर्षीय शाळकरी मुलावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला; दोन अल्पवयीन ताब्यात!
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप


























Subscribe to my channel




