
Pune News : पुणे तिथे काय उणे? ही म्हण अगदी खरी आहे. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गुंडांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत आहे. कधी कोणाची हत्या तर कधी कुठेतरी तोडफोडीच्या घटना सतत समोर येत आहेत. यावर उपाय म्हणून पुणे शहरात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही आठवड्यांपूर्वी गुन्हेगारांना इशारा दिला होता – “सात पिढ्यांना लक्षात राहील, अशी अद्दल घडवू.” मात्र प्रत्यक्षात मागील दीड महिन्याच्या काळात शहरात जो गुन्हेगारीचा उद्रेक झाला आहे, त्यावरून या इशाऱ्याचे प्रतिबिंब रस्त्यांवर कुठेच दिसून येत नाही. रात्रीच्या अंधारातच नव्हे तर उजेडातही कोयत्यांचे हल्ले, वाहनांची तोडफोड, घरफोडी आणि चोरीच्या घटनांनी पुणेकरांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे.
पुण्यातील विविध भागांमध्ये या घटना इतक्या वाढल्या आहेत की, कायदा-सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत वाढता सहभाग आणि कोयता गँगसारख्या टोळ्यांची वाढती दहशत हे सर्वात चिंताजनक चित्र उभं करत आहे. शहरातील प्रमुख भागांमध्ये सलग रात्रींमध्ये वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. कोंढवा, सहकारनगर, विश्रांतवाडी, हडपसर, भवानी पेठ, धनकवडी, कात्रज या परिसरांमध्ये दररोज नवे गुन्हे घडताना दिसत आहेत. काही घटनांमध्ये थेट हवेत गोळीबार झाला, कोयत्याने वार करण्यात आले आणि तलवारी घेऊन सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवण्यात आली.
गेल्या दीड वर्षांत पुण्यात 124 वाहन तोडफोडीच्या घटना समोर आल्या असून त्यातील 35 टक्के आरोपी अल्पवयीन आहेत. वर्षभरात ८९ प्रकरणे नोंद झाली असून, चालू वर्षातही ३५ नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वीच एमआयटी कॉलेज परिसर, हडपसर, कोंढवा आणि सदाशिव पेठ या ठिकाणी सातत्याने तोडफोड आणि हल्ल्याचे प्रकार घडले. काही घटनांमध्ये राजकीय नेत्यांचे नातेवाईक गुन्ह्यांमध्ये सामील असल्याचंही निष्पन्न झालं.
|
|
शहरात केवळ वाहन तोडफोडच नव्हे, तर चोरी आणि घरफोड्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मागील साडेचार वर्षांत तब्बल ४० कोटी २२ लाख रुपयांची वाहने चोरीला गेली, त्यापैकी केवळ १६ कोटींचीच वाहने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालं. घरफोड्यांच्या बाबतीतही हीच स्थिती आहे – ७३ कोटींहून अधिक रुपयांचा ऐवज चोरीला गेला असून केवळ १३ कोटींचा मुद्देमाल परत मिळवण्यात आला.
सामान्य पुणेकर या गुन्हेगारीचा थेट भुर्दंड सहन करत आहे. रात्रीचं पोलिसिंग अपुरं पडतंय, गुन्हेगारांची अरेरावी वाढतेय, आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याऐवजी ते खुलेआम रस्त्यावर दहशत माजवत आहेत. 'भयमुक्त गणेशोत्सव'च्या ग्वाही दिल्या जात असल्या, तरी पुणेकरांच्या मनातील असुरक्षिततेचं सावट घनदाट होत चाललं आहे. पोलिसांनी काही प्रमाणात अटक व कारवाई केली असली तरी अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या, गुन्ह्यांचे बदलते स्वरूप आणि ठोस नियंत्रण यंत्रणेअभावी या घटनांना रोखता येत नाहीये. परिणामी, ‘पुणेकर भयमुक्त कधी होणार?’ हा सवाल दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.
दीड वर्षात १२४ घटनांची नोंद
शहरात वाहन तोडफोडीच्या दीड वर्षात तब्बल १२४ घटना घडल्या असून, त्यामध्ये गेल्या वर्षी (२०२४) ८९ घटना घडलेल्या आहेत. त्यातील ८१ गुन्हे उघड असून, २५५ आरोपी आहेत. तर अल्पवयीन ८७ मुलांचा सहभाग होता. तर चालू वर्षात ३५ घटनांत ८२ आरोपीपैकी ५० मुले अल्पवयीन आहेत.
-
२८ जून: चतुः शृंगी पोलिसांच्या हद्दीत विधाते वस्ती येथे १५ जणांचा धुडगूस.
-
२८ जून : सिंहगड रस्त्यावर माणिकबाग येथे चौघांनी राडा घालून १५ वाहनांची तोडफोड केली.
-
३ जुलै : पूना कॉलेज येथे निकाल पाहण्यासाठी गर्दी झाल्यानंतर किरकोळ कारणावरून १० ते १५ जणांनी राडा घालून, एका तरुणाला धारदार हत्याराने मारहाण केली.
-
५ जुलै : वानवडीत मध्यरात्री दोन गट भिडले. दारूच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण.
-
१२ जुलै : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून येऊन हातात कोयते आणि तलवारी घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. एका तरुणावर हल्लाही केला.
-
२० जुलै : भवानी पेठ आणि कोंढवा येथे टोळक्याचा राडा.
-
२३ जुलै धनकवडी परिसरात गाड्यांची तोडफोड दहशत निर्माण करण्यासाठी तोडफोड
-
4 ऑगस्ट किटकटवाडी या ठिकाणी गोळीबारानी पैठणी गाड्यांची तोडफोड
-
5 ऑगस्ट दोन वाहन एकमेकांना वाचण्यावरून वाद; तरुणांकडून हवेत गोळीबार
-
5 ऑगस्ट हडपसर भागात गाड्यांची तोडफोड, कोयते आणि तलवारीने वार
-
6 ऑगस्ट पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सदाशिव पेठ भागात कोयत्याने वार गाड्यांची तोडफोड, राजकीय नेत्याच्या जावयाने गाड्यांची तोडफोड केली प्रकार
-
7 ऑगस्ट एमआयटी कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांचा राडा
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




