डेंग्यूचा ताप उतरला म्हणजे धोका पूर्णपणे टळला, असा समज करून घेणे रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. उलटपक्षी, ताप उतरल्यानंतरचे पुढील ४८ तास डेंग्यू रुग्णांसाठी सर्वाधिक महत्त्वाचे आणि धोकादायक असतात, असा महत्त्वपूर्ण इशारा पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आला आहे. याच काळात रुग्andची प्रकृती अचानक खालावण्याची शक्यता असते, त्यामुळे योग्य वेळी आवश्यक तपासण्या करून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाचे महत्त्वाचे सविस्तर मुद्दे व मार्गदर्शक सूचना:
-
केवळ प्लेटलेट्स नव्हे, एकूण प्रकृती महत्त्वाची: डेंग्यूच्या आजारात केवळ प्लेटलेट्सची संख्या पाहून रुग्णाची गुरुत्व किंवा गंभीरता ठरवता येत नाही. काही रुग्णांची प्लेटलेट्स कमी असूनही त्यांची प्रकृती स्थिर राहू शकते, तर काहींमध्ये प्लेटलेट्स तुलनेने जास्त असूनही गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे रक्तदाब, रक्तस्रावाची लक्षणे, उलट्या, पोटदुखी, अशक्तपणा आणि इतर वैद्यकीय निकषांचा एकत्रित विचार करून उपचार करणे आवश्यक आहे.
-
उशिरा उपचार आणि इतर आजार: अनेक रुग्ण प्रकृती गंभीर झाल्यानंतरच रुग्णालयात दाखल होतात. काहींना यकृत, मूत्रपिंड, हृदय किंवा मेंदूशी संबंधित अन्य गंभीर आजारही असू शकतात. त्यामुळे डेंग्यूची चाचणी पॉझिटिव्ह आली म्हणून प्रत्येक मृत्यूचे कारण डेंग्यूच आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
-
डेंग्यूची धोक्याची लक्षणे: तीव्र पोटदुखी, सतत उलट्या होणे, नाक किंवा हिरड्यांतून रक्तस्राव होणे, उलटी किंवा शौचातून रक्त जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अतिअशक्तपणा किंवा अस्वस्थता, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा लघवीचे प्रमाण कमी होणे, ही लक्षणे आढळल्यास विलंब न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही वेदनाशामक (Painkiller) औषधे घेऊ नयेत, कारण अशा औषधांमुळे रक्तस्रावाचा धोका वाढू शकतो.
-
रुग्णालये आणि नागरिकांनी घ्यायची दक्षता: डेंग्यूचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याला मच्छरदाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, जेणेकरून इतर डासांमार्फत संसर्गाचा प्रसार रोखता येईल. तसेच, घराच्या आसपास पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे, पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करणे आणि डासांपासून संरक्षण करणारी साधने वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




