
Pune : पुणे-मिरज दरम्यान २८० किलोमीटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात आहे. या प्रकल्पासाठी चार हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. मात्र, सध्या तरी या मार्गावरून दिवसाला फक्त सहा एक्स्प्रेस व तीन लोकल धावतात. त्यामुळे हजारो कोटींचा खर्च करून तयार केलेल्या या दुहेरी मार्गावरील प्रवासी गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.
काय आहे सद्यस्थिती?
मध्य रेल्वेने पुणे-मिरज या २७९ किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सन २०१६ मध्ये सुरू केले. हे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. या प्रकल्पासाठी चार हजार ८८२ कोटी रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सातारा व पुणे जिल्ह्यात भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या हरकती व इतर अडचणींमुळे कामाला वेळ लागत होता. करोना काळातही काही दिवस काम बंद असल्याचा फटका या कामाला बसला आहे. सध्या तारगाव-मसूर व मसूर-शिरवडे अशा दोन टप्प्यांतील १८ किलोमीटरचे दुहेरीकरण पूर्ण झाल्याने शिरवडे ते तारगाव दरम्यान वेगाच्या चाचणीत जास्तीत जास्त १३० किलोमीटर प्रतितास वेग गाठण्यात आला. ही चाचणी यशस्वी झाल्याने सुरक्षा आयुक्तांनी या मार्गावरून ताशी ९० किलोमीटर वेगाने गाड्या चालविण्यास मान्यता दिली आहे. उर्वरित ६३ किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणास आणखी सहा महिने कालावधी लागणार आहे. तयार झालेल्या २१७ किलोमीटर दुहेरी मार्गावरून माल व प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
|
Pune : बारामती विधानसभा उमेदवाराबद्दल खासदार सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य ! |
किती येणार खर्च?
मध्य रेल्वेने पुणे मिरज मार्गाच्या दुहेरीकरणासाठी चार हजार ८०० कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. त्यापैकी ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुणे ते मिरज दरम्यानचा मार्ग तयार होत आला आहे. मात्र, या मार्गावर गाड्यांची संख्याच खूपच कमी आहे. त्यामुळे हजारो कोटी रुपये खर्च करूनदेखील प्रवाशांना त्याचा काहीही फायदा होताना दिसत नाही. सध्या या मार्गावर कोयना एक्स्प्रेस, महालक्ष्मी आणि महाराष्ट्र एक्स्प्रेस व चार लोकल गाड्या धावतात; पण मार्गाची क्षमता मोठी असल्यामुळे तातडीने या मार्गावर गाड्या वाढविण्याची मागणी केली जात आहे.
पुणे-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर खूपच कमी गाड्या धावतात. या मार्गावरून दिवसाला १०० पेक्षा जास्त गाड्या धावण्याची क्षमता आहे. यामार्गे उत्तर भारतातदेखील गाड्या जाऊ शकतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता मार्ग केला आहे. तातडीने गाड्या वाढवाव्यात. मालवाहतुकीसाठी देखील या भागातील रेल्वे स्थानकाचा विकास करावा.
काय सांगते आकडेवारी?
- पुणे-मिरज मार्गावरून दररोज धावणाऱ्या एक्स्प्रेस व लोकल - ९
- पुणे-मिरज मार्गावरून आठवड्यातून एकदा धावणाऱ्या एक्स्प्रेस - ११
- पुणे-मिरज मार्गावर आठवड्यातून दोन व तीन वेळा धावणाऱ्या एक्स्प्रेस - २६
- पुणे-मिरज मार्गावरून एकूण धावणाऱ्या एक्स्प्रेस व लोकल - २७
दुहेरीकरणाचे काम किती?
- पुणे-मिरज रेल्वेमार्गाची एकूण लांबी : २७९.०५ किलोमीटर
- दुहेरीकरण पूर्ण : २१७ किलोमीटर (८७ टक्के)
- प्रकल्पाची एकूण किंमत : ४८८२.५३ कोटी
- आजपर्यंतचा खर्च : अंदाजे चार हजार कोटी
- आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाची प्रगती : ८७ टक्के
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा



























Subscribe to my channel



