
OBC Reservation : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र, दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर ज्या जालन्यात मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केलं होतं, त्याच जालन्यात उद्या (17 नोव्हेंबर) ओबीसी नेत्यांची जाहीर सभा होणार आहे. विशेष म्हणजे याच सभेत मंत्री छगन भुजबळ यांची तोफ देखील धडाडणार आहे. त्यामुळे, आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी उपोषण केलं होतं. आता त्याच आंतरवाली सराटीपासून काही अंतरावर असलेल्या धाईत नगर येथील पाचोड रोडवर आरक्षण बचाव एल्गार सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या या सभेत मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वेडट्टीवार, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्यासह राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित असणार आहे. तर, 'जो ओबीसी हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा' अशी टॅगलाईन या सेभासाठी देण्यात आली आहे.
|
Bank Interest Tax Free : सहकारी बँकांमधील गुंतवणुकीवरील व्याज करमुक्त; हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल |
सभेचे बॅनर फाडले...
जालन्यातील अंबड तालुक्यातील धाईत नगर येथे उद्या ओबीसी नेत्यांची भव्य सभा होणार आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, काही अज्ञात लोकांनी हे बॅनर फाडल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
जालना पाठोपाठ हिंगोलीची सभा विक्रमी होणार
जालना जिल्ह्यातील अंबड पाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात देखील ओबीसी समाजाची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जालना पाठोपाठ हिंगोलीमधील सभा देखील विक्रमी होणार असल्याचा दावा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केलाय. तर, मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध आहे. तसेच मारवाडी, जैन समाजात देखील कुणबी नोंदी आढळत आहेत. मग त्यांनाही ओबीसीमध्ये घेणार का? असा सवाल शेंडगे यांनी केलाय.
मनोज जरांगेंची प्रतिक्रिया...
दरम्यान, ओबीसी सभेवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीने सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्यामुळे कोणी सभा घेल्यास आमची कोणतेही हरकत नाही. आमच्या आरक्षणाच्या मागणीला सर्वसामान्य ओबीसींचा देखील पाठींबा मिळत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी आमचे शांततेत सुरु असलेले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




