
NHAI Rule : देशाच्या विकासात रस्ते, महामार्ग महत्त्वाचे घटक असून महामार्ग मोठ्या प्रमाणात निर्माण केली जात आहेत. परंतु चांगले महामार्ग बनवूनही रस्ते अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांवर राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटी ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केलीय. अपघाताची समस्या सोडवण्यासाठी एनएचएआयकडून द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वामुळे रस्ते अपघातांना आळा बसणार आहे. मोठे अपघातही टाळता येतील. या नव्या नियमानुसार दर १० किलोमीटरवर मोठे फलक लावण्यात येणार आहेत.
रस्ता चिन्हे आणि चिन्हांची माहिती माहित असणे आवश्यक
फेब्रुवारी २०२५ पासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. नॅशनल हायवेवर १० किलोमीटरच्या अंतरावर साइन बोर्ड लावण्यात येईल. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने याबाबत सांगितलं की, सुरक्षित ड्राइव्हिंगसाठी रस्तांची चिन्हं आणि सांकेतिक चिन्ह खूप महत्त्वाची असतात. रस्त्यांची भाषा माहिती प्रत्येक चालकाला माहिती असणं आवश्यक आहे. यामुळे परिवहन मंत्रालयाने रस्त्यांच्या मालकीच्या कंपन्यांसाठी नियम जारी केले आहेत. यात प्रत्येक १० किमी अंतरावर फूटपाथवर वाहनांच्या वेगाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
५ KM वर हेल्पलाइन क्रमांक लिहिला जाणार
NHAIने यासंदर्भात म्हटलं की, वाहनांची वेगमर्यादा प्रत्येक ५ किमीवर लिहावी लागेल. तसेच महामार्ग आणि एक्स्प्रेस वेच्या मालकीच्या कंपन्यांना वाहनचालकांना माहिती देण्यासाठी दर ५ किमीवर नो पार्किंगचे संकेत बसवावे लागतील. प्रत्येक ५ किमी अंतरावर आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक लिहावा लागेल, असेही या मार्गदर्शक तत्त्वात म्हटलंय. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कोणालाही त्रास होणार नाही.
|
|
राष्ट्रीय महामार्गांवर गुरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि प्रवास सुरक्षित करण्यासाठी NHAI नेही निर्णय घेतलाय. त्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या प्रकल्पांतर्गत महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर प्राण्यांसाठी निवारे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे रस्ते अपघात तर कमी होतील तसेच प्राण्यांच्या सुरक्षा होईल. या प्रकल्पांतर्गत जनावरांसाठी चारा आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
यासोबतच जखमी जनावरांवरही उपचार केले जाणार आहेत. दरम्यान जगभरात रस्ते अपघात होण्याचे सर्वाधिक प्रमाण भारतात आहे. वर्ष २०२१ मध्ये देशात रस्ते अपघातात एकूण १,५३,९७२ लोकांचा मृत्यू झाला. तर २०२२ मध्ये ही संख्या वाढली असून १,६८,४९१ इतकी झाली.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




