CM's Swift Sensitivity: Yoke Shifted from Landless Farmer's Wife's Shoulders in Latur; Family Gets New Bull & Immediate Compensation!

लोकमत'च्या बातमीने हलवले सरकार! लातूरच्या शेतकरी माऊलीच्या खांद्यावरून अखेर उतरले जू; मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेमुळे गायकवाड कुटुंबाला मिळाला बैल आणि तात्काळ मदत!

CM's Swift Sensitivity: Yoke Shifted from Landless Farmer's Wife's Shoulders in Latur; Family Gets New Bull & Immediate Compensation!मुंबई/वलांडी (जि. लातूर): लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील एका भूमिहीन गरीब शेतकरी कुटुंबाची मन हेलावून टाकणारी व्यथा समोर आली आहे. वीज पडून शेतीकामाचा मुख्य आधार असलेला बैल दगावल्यामुळे हतबल झालेल्या काशिनाथ गायकवाड या शेतकऱ्याला स्वतःसोबत आपल्या पत्नीला शेतात बैलाच्या जागी जुंपून खांद्यावर जू घ्यावे लागले होते. 'लोकमत'ने या गरीब कुटुंबाची ही अत्यंत बिकट परिस्थिती आणि व्यथा सोशल मीडिया व वृत्तपत्रातून मांडली.

या बातमीची थेट दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ आपल्या प्रशासनाला संवेदनशीलतेने पावले उचलण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

यानंतर केवळ काही तासांतच जिल्हा प्रशासनाच्या पशुसंवर्धन विभागाने तत्परता दाखवत गायकवाड यांच्या घरी जाऊन त्यांना एक नवीन बैल सुपुर्द केला. तसेच वीज पडून दगावलेल्या बैलाची कायदेशीर नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदतही त्यांच्या बँक खात्यावर मंजूर केली. यावेळी तहसीलदार सोमनाथ वाडकर, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. राजकुमार पडिले आणि साहाय्यक आयुक्त डॉ. श्रीधर शिंदे उपस्थित होते.

"शासनाकडून एवढ्या वेगाने मदत मिळाल्यामुळे मनाला खूप बरे वाटले. आता खरीप हंगामातील पेरणी आणि शेतीची कामे वेळेत पूर्ण होतील ही चिंता दूर झाली आहे, बैलही खूप चांगला मिळाला आहे," अशा भावना काशिनाथ यांच्या पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी प्रशासनाचे आभार मानताना व्यक्त केल्या.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *