
Pune : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) जागतिक महिला दिनानिमित्त आठ मार्चला महिला विशेष बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. शहरातील एकूण ३१ मार्गांवर धावणाऱ्या बसमध्ये हा लाभ घेता येणार आहे.
पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमपीआरडीए’ हद्दीत सेवा दिली जाते. त्यामध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महिला विशेष बस सुरू केल्या आहेत. सध्या ३३ बसच्या माध्यमातून ७६ महिला विशेष फेऱ्यांद्वारे ही सेवा दिली जात आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागांत महिला विशेष बसच्या माध्यमातून सेवा दिली जाते.
महिला विशेष बसचे मार्ग
स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर, मनपा भवन ते वडगाव शेरी, कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन, एनडीए गेट क्र.१० ते मनपा भवन, कात्रज ते शिवाजीनगर, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, धनकवडी ते न. ता. वाडी, कात्रज ते कोथरूड डेपो, हडपसर गाडीतळ ते वारजे माळवाडी, भेकराईनगर ते मनपा भवन, हडपसर ते निगडी भक्ती-शक्ती, हडपसर ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर गाडीतळ, हडपसर ते मांजरी बु., मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्थानक ते शिवाजीनगर, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्थानक ते पुणे स्टेशन, पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द, मनपा भवन ते मुकाई चौक किवळे, निगडी ते मेगापॉलिस हिंजवडी, मनपा भवन ते भोसरी, भोसरी ते हिंजवडी माण फेज ३, भोसरी ते निगडी, भोसरी ते पिंपरी गाव, भोसरी ते चिंचवड गाव, चिखली ते डांगे चौक, भेकराईनगर ते वाघोली, शेवाळेवाडी ते पिंपळे गुरव, शेवाळेवाडी ते कात्रज, मनपा भवन ते म्हाळुंगे गाव.
मेट्रोमध्ये महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी आता राखीव जागा
नवीन नियोजनानुसार प्रत्येक मेट्रो ट्रेनमध्ये महिलांसाठी ४६, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी आठ जागा राखीव असतील. पहिल्या डब्यात महिलांसाठी १४ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन जागा, मधल्या डब्यात महिलांसाठी १८ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चार, तर तिसऱ्या डब्यात महिलांसाठी १४ आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या आसनव्यवस्थेचा सविस्तर आराखडा पुणे मेट्रोच्या सर्व स्थानकांवर; तसेच अधिकृत मोबाइल ॲपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मेट्रोच्या डब्यांमध्ये दर्शविण्यात आलेल्या चिन्हांद्वारे राखीव जागा स्पष्टपणे दर्शविण्यात येणार असल्याने प्रवाशांना त्या सहज ओळखता येतील. या राखीव जागांच्या नियमांचे पालन करून महिला व ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन ‘महामेट्रो’ प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशने (महामेट्रो) मेट्रोच्या तिन्ही डब्यांत राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आठ मार्चपासून हा निर्णय लागू करण्यात येणार असल्याची माहिती पुणे मेट्रोकडून देण्यात आली.
वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गांवर सध्या मेट्रो धावत आहे. मेट्रोमधून सध्या दोन लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. यामध्ये महिला व ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील मोठी असते. त्यामुळेच पुणे मेट्रोच्या प्रत्येक ट्रेनमधील तिन्ही डब्यांमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आसनव्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे विशेषतः महिला प्रवासी आणि वृद्ध नागरिकांना गर्दीच्या वेळी बसण्याची सोय उपलब्ध होणार असून, त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यास मदत होणार आहे.
शहर
- पुणे: शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे अधिकृत उमेदवार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार मंगेश चिवटेंची माघार
- पुणे: एमपीएससी आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलेल्या दिपाली सय्यद यांना विद्यार्थ्यांच्या रोषाचा सामना; एका विधानामुळे प्रचंड गोंधळ
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- मुंबई: सोयीनुसार रंग बदलणं म्हणजे काँग्रेसचं राजकारण; मत चोरीच्या आरोपांवरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
महाराष्ट्र
- बीड: वडवणीत मन हेलावणारी दुर्घटना; सिमेंट मिक्सरमध्ये पडून १६ वर्षीय बालकामगाराचा जागीच मृत्यू, प्लांटवरील कर्मचारी फरार
- मुंबई: ७ लाख ९० हजार मतदार यादीतून गायब, हे मतदार गेले कुठे? निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतील घोळावरून आदित्य ठाकरेंचा घणाघात
- गोंदिया: भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; पितांबरटोला गावाजवळील घटनेने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
- अमरावती: शिक्षक मतदारसंघ निवडणूक एकूण २६ उमेदवार रिंगणात; पोहरादेवीच्या महंतांसह महायुतीच्या तिघांची माघार
गुन्हा
- भंडारा: पालकमंत्र्यांसमोर डोळ्यात पाणी आणून व्यथा मांडणाऱ्या हतबल शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!


























Subscribe to my channel



