
Raigad : जुळे बाळ घरी आल्याच्या आनंदात न्हालेल्या कुटुंबावर काही तासांतच दु:खाचा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना रायगड जिल्ह्यात घडली. अलिबाग वनविभागातील तिनविरा येथे कार्यरत असलेले वनरक्षक सुरज सारंगे यांचा शुक्रवारी (दि. ६) रात्री उशिरा रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाला. रेवस–रेड्डी मार्गावर खोदून ठेवलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असून वनविभागात शोककळा पसरली आहे.
अपघात कसा घडला?
मुरूड तालुक्यातील सर्वे येथील रहिवासी असलेले सुरज सारंगे हे अलिबाग वनविभागाच्या तिनविरा येथे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. शुक्रवारी रात्री ते आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना रेवस–रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदून ठेवलेल्या मोरीत त्यांची मोटारसायकल अचानक कोसळली. खड्डा खोल असल्याने दुचाकीचा तोल जाऊन सारंगे खाली पडले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
काही तासांत आनंदाचे रूपांतर शोकात
या घटनेतील सर्वांत वेदनादायी बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच सुरज सारंगे यांना जुळे अपत्य झाले होते. शुक्रवारीच ही दोन्ही बाळे हॉस्पिटलमधून घरी आली होती. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. या आनंदाचा क्षण त्यांनी आपल्या मोबाईल स्टेटसवरही व्यक्त केला होता. मात्र काही तासांतच नियतीने क्रूर घाला घातल्याने आनंदाचे वातावरण क्षणात शोकात बदलले. जुळ्या अपत्याच्या स्वागताची तयारी करणाऱ्या कुटुंबाला त्यांच्या अकाली निधनाने मोठा धक्का बसला आहे.
रस्त्यावरील निष्काळजीपणाचा आरोप
दरम्यान, रेवस–रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या कामादरम्यान खोदलेला खड्डा तसेच उघडी मोरी योग्य प्रकारे सुरक्षित करण्यात आली नव्हती. त्या ठिकाणी कोणतेही बॅरिकेट्स, सूचना फलक, रेडियम पट्ट्या किंवा रात्री वाहनचालकांना दिसण्यासाठी लाल दिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हा अपघात निष्काळजीपणामुळे घडल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या प्रकाराबाबत संतापाची भावना व्यक्त होत आहे.
कारवाईची मागणी
या घटनेनंतर महाराष्ट्र वनरक्षक–वनपाल संघटना, शाखा अलिबागचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. रस्त्याच्या कामादरम्यान आवश्यक सुरक्षाव्यवस्था न ठेवल्यामुळे एका कर्तव्यदक्ष वनरक्षकाला जीव गमवावा लागल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित प्राधिकरण आणि कंत्राटदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
वनविभागात शोककळा
सुरज सारंगे हे कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू स्वभावाचे कर्मचारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अकाली निधनाने वनविभागातील सहकारी तसेच मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. जुळ्या अपत्यांच्या आगमनाचा आनंद साजरा करण्याआधीच कुटुंबातील कर्ता पुरुष हिरावला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



