
Kokan Rain Update : कोकणात मान्सून सक्रीय झाला आहे. आज (शनिवार) सकाळपासूनच पावसाच्या दमदार सरी रत्नागिरी शहरात कोसळायला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताहेत. या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे.
आंबा घाटात दरड काेसळली
दरम्यान पहिल्याच पावसात आंबा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. आंबा घाटातील प्रसिद्ध गायमुख या ठिकाणी श्री गणेश मंदिराच्या छतावर दरड काेसळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या आंबा घाटातील वाहतुक सुरळीत सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
कोयना धरण परिसरात सुरु
कोयना धरण परिसरात मान्सूनने हजेरी लावलेली आहे. शुक्रवार दुपारपासूनच या भागात पावसाला सुरुवात झाली. आज देखील धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे धरण परिक्षेत्रात 14 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. नवजा या ठिकाणी 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरला मात्र पाच मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. ही आकडेवारी मान्सूनच्या आगमनाची चाहूल असल्याचे दर्शविले जात आहे
साता-यात पावसाची हजेरी
सातारा शहरात देखील आज (शनिवार) पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत एकच धांदल उडाली. अनेकांनी पावसापासून बचाव व्हावा यासाठी माेठ्या झाडांचा आधार घेतला.
काेयनेत दाेन वेळा झाली कमी साठ्याची नाेंद
कोयना धरणात सध्या 10.68 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. या धरणात उपयुक्त पाणीसाठा हा पाच टीएमसी इतका आहे. यापु्र्वी जून 1996 मध्ये धरणात 10.66 टीएमसी तर जून 2019 मध्ये 10.75 टीएमसी इतका कमी पाणी साठा हाेता अशी नाेंद असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.
दरम्यान सध्या काेयना धरणात पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ हाेणार आहे हे निश्चित.
शहर
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
महाराष्ट्र
- पुणे: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करा अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेऊ; धरणग्रस्त आणि कृती समितीचा आक्रमक इशारा
- मुंबई: ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर! निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य मोर्चा; राज आणि उद्धव ठाकरेंची घोषणा
- पुणे: दौंडमध्ये भरदिवसा धाडसी चोरी! दुचाकीवरून १ लाख ४० हजारांचे सिगारेटचे बॉक्स लंपास, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
- वर्धा: महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात निलंबित विद्यार्थ्यांसाठी तीव्र आंदोलन; प्रशासनासोबतची चर्चा निष्फळ
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!


























Subscribe to my channel



