
Aahilyanagar (जामखेड): नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात उघडकीस आली आहे. अवघ्या साडेतेरा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच नराधम पित्याने आणि एका हॉटेल चालकाने वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत झालेल्या आरोग्य तपासणीत ही चिमुरडी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळल्यानंतर या अमानुष कृत्याचा पर्दाफाश झाला.
अत्याचाराची धक्कादायक साखळी
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी संगमनेर तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिक्षण घेत आहे. या घटनेचा घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे:
हॉटेल चालकाचा प्रताप: ऑक्टोबर २०२५ मध्ये दिवाळीच्या सुट्टीत पीडिता आपल्या कुटुंबासह ऊसतोडणीसाठी जामखेडमधील सरदवाडी परिसरात आली होती. तिथे पाणी भरण्यासाठी गेली असता, आरोपी जयदत्त सदाशिव कात्रजकर (नाना) याने तिला धाक दाखवून शेतात नेले आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केला. कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती.
नराधम पित्याचे कृत्य: नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ या काळात पीडितेचे कुटुंब बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे ऊसतोडणीसाठी गेले होते. तिथे तिच्या स्वतःच्या जन्मदात्या पित्यानेच तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केले.
असा झाला खुलासा
एप्रिल २०२६ मध्ये वार्षिक परीक्षेसाठी पीडिता पुन्हा आपल्या आश्रमशाळेत परतली. ९ एप्रिल रोजी शाळेत विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे समजले. या माहितीने शाळा प्रशासन हादरले आणि त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला.
दोन्ही आरोपींना बेड्या
जामखेड पोलीस स्टेशनच्या सपोनि वर्षा जाधव यांनी पीडितेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता, तिने आपल्यासोबत झालेला हा भीषण अनुभव सांगितला.
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने १४ एप्रिल रोजी रात्री नराधम पिता आणि हॉटेल चालक जयदत्त कात्रजकर या दोघांनाही अटक केली.
दोन्ही आरोपींवर पोक्सो (POCSO) आणि बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट असून, अशा विकृत मानसिकतेच्या गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.
शहर
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
महाराष्ट्र
- शिरुर पोलिसांची धडक कारवाई; रेणुकामाता मंदिर परिसरात गावठी पिस्तूल व काडतुसासह आरोपी गजाआड!
- पुणे: पुण्यातील १५ ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळल्याने खळबळ; बॉम्बशोधक पथकाच्या कसून तपासणीनंतर अफवा असल्याचे स्पष्ट!
- पुणे: दिवेआगर समुद्र दुर्घटना: आळंदीतील 'त्या' ८ मृत विद्यार्थ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; राज्य सरकारकडून ४० लाखांचा निधी मंजूर!
- छत्रपती संभाजीनगर: संविधान जिवंत ठेवण्यासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू; छत्रपती संभाजीनगरमधून कन्हैयाकुमार यांचा सरकारवर हल्लाबोल!
गुन्हा
- पुणे: बहिणीला भेटण्यासाठी आला अन् काळाने घातला घाला; मोशीतील शेततळ्यात बुडून मामा-भाच्याचा मृत्यू!
- पुणे: ५० हजारांची सुपारी, मध्य प्रदेशातून पिस्तूलांची खरेदी अन् अक्षय चव्हाणच्या घरी रचला कट; मंदार किवळे कोर्ट हल्ल्यात धक्कादायक खुलासे!
- परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!
- पुणे: नंबरप्लेट नसलेली मोपेड, एका गाडीवर तिघे अन् कात्रज ते शिवाजीनगर थेट प्रवास! वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गुरुवार राशिभविष्य २६ नोव्हेंबर २०२६: दत्तगुरु व स्वामींच्या कृपेने करिअर, पैसा आणि प्रगतीचे शुभ योग!
- केंद्र योग आणि मंगळाची कृपा: २५ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींना मिळणार आर्थिक लाभ आणि प्रगतीची सुवर्णसंधी? वाचा सविस्तर राशिभविष्य!
- त्रिपुरारी पौर्णिमेला ग्रहांचा शुभ संयोग, महादेवाच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार? वाचा २४ नोव्हेंबर २०२६ चे सविस्तर राशिभविष्य!
- कुलदेवतेची लाभणार खंबीर साथ; २३ नोव्हेंबर २०२६ रोजी कोणत्या राशींची रखडलेली कामे मार्गी लागणार आणि कोणाच्या नशिबाचे दार उघडणार?
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!
- गोवा: दोन नेत्यांचे मनोमीलन आणि रंगली लंच पे चर्चा; २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपची मोठी रणनीती, केंद्रीय नेतेही होते उपस्थित!
- नवी दिल्ली: जे शिवसेनेला जमलं नाही ते अकाली दलाने केले! २०२७ च्या पंजाब निवडणुकीसाठी सुखबीर बादल यांच्या २ प्रमुख अटी भाजपने मान्य केल्याची चर्चा
- पाटणा: राजकीय विरोध बाजूला ठेवून राजशिष्टाचार! विधान परिषद शपथविधीत सम्राट चौधरींनी तेजस्वी यादवांसाठी मंत्र्याला उठवले खुर्चीवरून; चर्चेला उधाण!

























Subscribe to my channel




