तुम्ही तुमच्या लेनमध्ये वाहन चालवत आहात. सुरक्षितअंतर राखले आहे आणि वाहनही निर्धारित वेगात आहे.इतक्यात अचानक दुसरे एखादे वाहन कोणतीहीपूर्वसूचना न देता समोरून कट मारते. एखादादुचाकीस्वार चुकीच्या दिशेने येतो. एखादी कारमहामार्गावरील बाहेर पडण्याचा मार्ग चुकल्यानंतर तिथेचरिव्हर्स घेऊ लागते. एखादा ट्रक वेगवान वाहनांसाठीअसलेली लेन अडवून ठेवतो. इंडिकेटर केवळदिखाव्यासाठी वापरले जातात. समोरून येणाऱ्यावाहनांवर हाय-बीमचा प्रकाश टाकून त्यांना अक्षरशःदिपवले जाते. वाहन चालवताना मोबाईलचा वापरकेल्याने चालकाचे लक्ष रस्त्यावरून विचलित होते. ही दृश्ये इतकी सामान्य झाली आहेत की आता त्यांचेआश्चर्यही वाटत नाही. अनेक बाबतीत ती भारतातीलदैनंदिन वाहनचालक संस्कृतीचाच भाग बनली आहेत.एखादा गंभीर अपघात झाला की सार्वजनिक चर्चेचाकेंद्रबिंदू बहुतेक वेळा रस्त्यांभोवतीच फिरत असतो.रस्त्यावर खड्डा होता का? महामार्गाच्या रचनेत दोष होताका? सुरक्षेसाठी आवश्यक कठडे नव्हते का? हे प्रश्नमहत्त्वाचे आहेत. फलोदी अपघात प्रकरणात सर्वोच्चन्यायालयाने नुकतेच अशा अनेक मुद्द्यांकडे लक्ष वेधतमहामार्गांची सुरक्षा सुधारण्याचे निर्देश दिले. महामार्गव्यवस्थापन, अतिक्रमण, आपत्कालीन प्रतिसादव्यवस्था,अपघात प्रतिबंधक उपाय अशा अनेक बाबींवरन्यायालयाने विचार केला. हा हस्तक्षेप आवश्यकच होता.कारण चांगले रस्ते, सुरक्षित महामार्ग आणि जलदआपत्कालीन सेवा अनेकांचे प्राण वाचवू शकतात. मात्र,या निर्णयामुळे आणखी एक महत्त्वाचा प्रश्न पुढे येतो—आपण वाहनचालकांकडेही तेवढेच लक्ष देत आहोतका? रस्ते सुरक्षिततेची सुरुवात महामार्गांपासून होत नाहीतर एखाद्या व्यक्तीला वाहन चालविण्याचा परवानामिळतो तेव्हापासून होते. वाहनचालक परवाना हासरकारकडून दिला जाणारा महत्त्वाचा अधिकार आहे.कारण तो एखाद्या व्यक्तीला क्षणार्धात मोठी हानी घडवूशकणारे वाहन चालविण्याची परवानगी देतो. मात्रप्रत्यक्षात वाहनचालक परवाना मिळविण्याची प्रक्रियाकौशल्य, निर्णयक्षमता व जबाबदारी यांचे मूल्यमापनकरण्याऐवजी केवळ प्रशासकीय औपचारिकता बनलीआहे. लेन शिस्त पाळली जात नाही. चुकीच्या बाजूनेओव्हरटेक करणे सामान्य झाले आहे. हे केवळशिस्तभंगाचे प्रकार नाहीत. अनेक वाहनचालकांना हेनियम का आहेत, याचे योग्य प्रशिक्षणच मिळालेले नसते.वाहन सुरू करणे, गिअर बदलणे, रिव्हर्स घेणे किंवापार्किंग करणे ही यांत्रिक कौशल्ये आहेत. मात्र सुरक्षितवाहनचालक होण्यासाठी जागरूकता, निर्णयक्षमताआणि शिस्त आवश्यक असते. संभाव्य धोके ओळखणे,सुरक्षित अंतर राखणे, लेन शिस्त पाळणे, ब्लाइंडस्पॉट्सची जाणीव ठेवणे आणि आपल्या प्रत्येकनिर्णयाचा इतरांच्या सुरक्षिततेवर परिणाम होतो, याचीजाणीव असणे महत्त्वाचे आहे. भारतात 2024 मध्ये 4.68 लाख रस्ता अपघात झाले.त्यात 1.75 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. पैकी61 टक्क्यांहून अधिक अपघात अतिवेगामुळे झाले तर 26टक्के अपघात धोकादायक किंवा निष्काळजीवाहनचालक आणि चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेककेल्यामुळे घडले. बहुतांश अपघातांना ही दोन कारणेचजबाबदार आहेत. अनेक वर्षे आपण रस्ते कसे असावेत,यावर चर्चा केली. आता वाहनचालक परवाना हा खऱ्याअर्थाने पात्रतेचा पुरावा ठरेल. याची खात्री करण्याची वेळआली आहे. वाहनचालक प्रशिक्षण व्यवस्थाही सक्षमहवी. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




