पुणे: नाशिक राष्ट्रीय महामार्गावर जुन्नर तालुक्यातील आळेखिंड परिसरात शनिवारी सकाळी एका मालवाहतूक ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. या भीषण आगीमध्ये ट्रकच्या केबिनसह पुढील संपूर्ण भाग जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु, चालकाने अत्यंत कठीण प्रसंगी दाखवलेले अभूतपूर्व प्रसंगावधान आणि दाखवलेली सतर्कता यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून चालक पूर्णपणे सुखरूप बचावला आहे.
प्राप्त झालेल्या सविस्तर माहितीनुसार, एक मालवाहतूक ट्रक पुणे-नाशिक महामार्गावरून नियमित वेगाने प्रवास करत असताना अचानक या वाहनाच्या केबिनमधून अचानक धूर बाहेर येऊ लागला. चालकाच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने परिस्थितीचे गांभीर्य तात्काळ ओळखले. कोणतीही भीती न बाळगता त्याने आपले वाहन रस्त्याच्या सुरक्षित कडेला थांबवले आणि क्षणाचाही विलंब न करता स्वतःला ट्रकमधून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी घेतले. चालकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र, चालकाने बाहेर पडल्यानंतर काही क्षणांतच आगीने प्रचंड रौद्र रूप धारण केले आणि देखते देखता आगीच्या प्रचंड ज्वालांनी ट्रकचा पुढील केबिनचा भाग पूर्णपणे वेढून टाकला. आगीमुळे निर्माण झालेले काळ्या धुराचे मोठे लोट या परिसरामध्ये दूरवर पसरले होते, ज्यामुळे काही काळ महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक अंदाजानुसार, वाहनात झालेला शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाड यामुळे ही आग लागली असावी, असा कयास वर्तवला जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झाले नाही.
या अचानक घडलेल्या आगीच्या सत्रामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती आणि महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय मदत पथकाने तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. आग पूर्णपणे आटोक्यात आणल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि पूर्ववत करण्यात आली. जरी या दुर्घटनेत ट्रकला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असले, तरी चालकाच्या समयसूचकतेमुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
शहर
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
महाराष्ट्र
- कोल्हापूर: महिन्याला २६ कोटींहून अधिक उलाढालीची झेप! गोकुळच्या दूध दरवाढीच्या निर्णयावेळी चार अशासकीय सदस्य अनुपस्थित
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- महाराष्ट्र: लोकसहभागातून जलसंधारणाला वेग; चार गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा


























Subscribe to my channel




