पुणे: मुंबई-पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले ब्रिज ते भुमकर चौकादरम्यानच्या हरितपट्ट्यात साचलेल्या कचऱ्याची समस्या अखेर मार्गी लागली आहे. या समस्येबाबत 'लोकमत'ने सातत्याने वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्यानंतर महापालिका प्रशासनाने परिसरातील कचरा उचलून स्वच्छता केली. तसेच, पहिल्या टप्प्यात ५० झाडांचे रोपण करण्यात आले आहे. मात्र, स्वच्छतेनंतरही काही नागरिक आणि व्यावसायिकांकडून पुन्हा कचरा टाकला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नव्याने केलेली स्वच्छता आणि वृक्षारोपण टिकविण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
वृक्षारोपणानंतरही पुन्हा कचरा
स्वच्छतेनंतर महापालिकेने या हरितपट्ट्यात पहिल्या टप्प्यात ५० झाडे लावली आहेत. मात्र, काही चहा-नाश्त्याच्या टपऱ्या, फळविक्रेते आणि नागरिकांकडून पुन्हा कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा अस्वच्छता निर्माण होण्याची शक्यता आहे. वृक्षारोपण आणि स्वच्छतेसाठी केलेले प्रयत्न टिकवायचे असतील, तर कचरा टाकणाऱ्यांवर नियमित देखरेख आणि दंडात्मक कारवाई करणे आवश्यक आहे.
"चहा-नाश्त्याचे व्यावसायिक आणि फळविक्रेते यांच्याकडून परिसरात कचरा टाकला जात असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. सीसीटीव्हीच्या माध्यमातून संबंधितांची ओळख पटवून दंडात्मक कारवाई केल्यास पुन्हा कचरा टाकण्यास आळा बसेल. अनुया जोशी, नन्हेगाव
"प्रशासनाने परिसर स्वच्छ केल्यानंतर तो स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे. केवळ प्रशासनाकडून अपेक्षा न ठेवता नागरिकांनीही परिसरात कचरा टाकणे टाळले पाहिजे. डॉ. सुनील आंबेगावकर
प्रशासनाची भूमिका
पहिल्या टप्प्यात ५० झाडे लावण्यात आली आहेत. पुढील टप्प्यात आणखी वृक्षारोपण करून हा परिसर 'नो गार्बेज झोन' म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून नागरिकांनीही सहकार्य करावे. प्रज्ञा पोतदार, सहाय्यक आयुक्त, मनपा"
शहर
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- नाशिक: कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाला राष्ट्रपतींची उपस्थिती अभिमानास्पद; दुष्काळातही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार – एकनाथ शिंदे
- पुणे: जुन्नरमध्ये बनावट परदेशी मद्याचे मोठे रॅकेट उघड; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई करत ११.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त आणि तिघे अटकेत
- पुणे: इलेक्ट्रिक वाहनचालकांसाठी मोठी खूशखबर! महाराष्ट्रात ईव्ही चार्जिंगचे दर कमी करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरींचे संकेत
महाराष्ट्र
- पुणे: नाशिक महामार्गावरील आळेखिंड येथे मालवाहतूक ट्रकला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली मोठी दुर्घटना, केबिन जळून खाक
- नाशिक: कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाला राष्ट्रपतींची उपस्थिती अभिमानास्पद; दुष्काळातही शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार – एकनाथ शिंदे
- कोल्हापूर: गोकुळची समांतर सभा केवळ मनाच्या समाधानासाठी; पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची कडक टीका, अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरील तांत्रिक अडचणीवर स्पष्ट भाष्य
- पुणे: जुन्नरमध्ये बनावट परदेशी मद्याचे मोठे रॅकेट उघड; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई करत ११.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त आणि तिघे अटकेत
गुन्हा
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कानपूर: तीन बायका अन् एक पती! करवा चौथच्या दिवशी पहिली पूजा करण्यावरून तिघींमध्ये तुफान राडा, प्रकरण पोहोचले पोलिसांत"
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण


























Subscribe to my channel




