मुरादाबाद (उत्तर प्रदेश): "प्रेम आंधळं असतं" असं अनेकदा म्हटलं जातं, पण उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये याच प्रेमापोटी एका मुलीने आपल्याच कुटुंबाचा विश्वासघात केल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. मुरादाबादमधील एका मोठ्या पितळ व्यापाऱ्याच्या घरावर पडलेल्या सव्वा कोटी रुपयांच्या सशस्त्र दरोड्याचा पोलिसांनी छडा लावला असून, या संपूर्ण गुन्ह्याची मास्टरमाईंड दुसरी कोणी नसून त्या व्यापाऱ्याची पोटची मुलगी अरीबा असल्याचे उघड झाले आहे.
७ वर्षांचे प्रेम आणि सव्वा कोटींची लूट:
मिळालेल्या माहितीनुसार, मुरादाबादच्या नागफनी भागातील अकबर कंपाउंडमध्ये राहणारे प्रसिद्ध पितळ व्यापारी मोहम्मद इम्रान यांच्या घरात ११ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास एका टोळीने सशस्त्र दरोडा टाकला होता. या हायप्रोफाईल दरोड्याचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती जे सत्य लागले, त्याने सर्वांनाच हादरवून सोडले. व्यापारी इम्रान यांची मुलगी अरीबा हिचे अरशद नावाच्या तरुणासोबत गेल्या ७ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोघांची जात वेगळी असल्याने त्यांच्या लग्नाला कुटुंबाचा विरोध होता. हा विरोध झुगारून प्रियकरासोबत पळून जाणे आणि ऐषारामात नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी अरीबाने स्वतःच्याच घरात दरोडा टाकण्याची धक्कादायक योजना आखली.
बापाच्या घराची चावी प्रियकराच्या हाती!
अरीबाने अत्यंत हुशारीने आणि थंड डोक्याने महिनाभरापूर्वीच तिच्या घराच्या मुख्य गेटची चावी प्रियकर अरशदच्या स्वाधीन केली होती. ११ मे च्या पहाटे ४ वाजता जेव्हा संपूर्ण कुटुंब गाढ झोपेत होते, तेव्हा अरीबाने आतून घराचा 'डिजिटल लॉक' उघडला आणि दरोडेखोरांना थेट घरात प्रवेश दिला. अरशद आणि त्याच्या साथीदारांनी घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत घरातील सर्वांना ओलीस ठेवले आणि कपाटात ठेवलेले कोट्यवधींचे दागिने आणि रोख रक्कम लुटून फरार झाले.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने फुटले बंड:
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जेव्हा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींची तपासणी केली, तेव्हा त्यांना धक्कादायक धागेदोरे मिळाले. दरोडेखोर घरात घुसताना मुख्य दरवाजावर कोणत्याही तोडफोडीच्या खुणा नव्हत्या, ज्यामुळे पोलिसांचा संशय घरातीलच कोणावरतरी गेला. पोलिसांनी जेव्हा अरीबाची कसून चौकशी केली, तेव्हा ती गडबडली आणि तिने आपला गुन्हा कबूल केला.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मास्टरमाईंड मुलगी अरीबा, तिचा प्रियकर अरशद आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांना वेढा घालून अटक केली आहे. त्यांच्याकडून लुटलेला बहुतांश ऐवज हस्तगत करण्यात आला असून, स्वतःच्याच मुलीने केलेल्या या कृत्यामुळे अब्जाधीश पितळ व्यापारी आणि त्यांचे कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले आहे.
शहर
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
- नाशिक: "राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ" सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संत-महंतांशी संवाद; बाधितांच्या पुनर्वसनाची दिली मोठी हमी!
- नाशिक: गोदाकाठी विश्वविक्रमी शंखनाद; ५१७ जणांनी एकाच वेळी शंख फुंकत नाशिकमध्ये मोडला अमेरिकेचा जुना विक्रम!
महाराष्ट्र
- नागपूर: टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम..नागपुरात बनावट नोटा आणि ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा गुन्हेगारांना थेट इशारा!
- धुळे: पुणे थेट रेल्वे सेवा लवकरच सुरू होणार का? माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेत मांडली अत्यंत महत्त्वाची मागणी!
- चंद्रपूर: ना हार्ड कॉपी, ना कार्यालयाचे खेटे; आता जात प्रमाणपत्र पडताळणी होणार पूर्णत: पेपरलेस, विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी पायपीट वाचणार!
- मुंबई: "भिकाऱ्यासारखी भीक मागत आहेत" वित्त खात्याच्या मागणीवरून संजय राऊतांचे अजित पवार गटावर अत्यंत खालच्या पातळीवर टीकास्त्र; राजकीय वर्तुळात खळबळ!
गुन्हा
- पुणे: भरवस्तीत तरुणीला बळच उचलून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे टळला अनर्थ, संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला पकडून दिला पोलिसांच्या हातांत
- रत्नागिरी: लांजा तालुक्यात खळबळ! घरात एकट्या असलेल्या वृद्धेचा संशयास्पद मृत्यू, हातातील सोन्याच्या बांगड्या बळजबरीने चोरल्याने मोठी सनसनाटी
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: भाजपने पक्षातील निष्ठावानांची कदर करावी; मगोप नेते सुदिन ढवळीकर यांचा मित्रपक्षाला मोलाचा सल्ला
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!


























Subscribe to my channel




