मुंबई/पुणे: आज दिनांक ८ सप्टेंबर २०२६ रोजी श्रावणातील शेवटचे अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र असे 'भौम प्रदोष व्रत' आले आहे. या शुभ योगावर ज्योतिषशास्त्रानुसार महादेव आणि संकटमोचन हनुमानजींची विशेष कृपा विविध राशींवर असणार आहे. आजच्या दिवशी चंद्र आणि गुरुची स्थिती तसेच विविध शुभ योगांचा प्रभाव सर्व १२ राशींच्या जातकांवर कसा राहील, याविषयीचे सविस्तर दैनिक राशिभविष्य खालीलप्रमाणे आहे:
मेष राशी (Aries):
आज तुम्हाला सर्वत्र खूप प्रशंसा मिळणार आहे. अनेक दिवसांपासून महत्त्वाची कामे प्रलंबित असतील तर ती आजच पूर्ण होऊ शकतात. तुम्ही उत्तम आर्थिक योजना बनवू शकाल. सरकार किंवा प्रशासकीय क्षेत्रातून तुम्हाला मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी प्राप्त होतील, मात्र घरगुती खर्चामध्ये वाढ होऊ शकते. आज तुमचे भाग्य ८५ टक्के सोबत राहील. पालकांचे आशीर्वाद घेणे शुभ ठरेल.
वृषभ राशी (Taurus):
आजचा दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही किरकोळ आव्हाने किंवा अडथळे समोर येऊ शकतात. परंतु, जर तुम्ही योग्य नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन केले तर प्रत्येक समस्येवर मात करणे शक्य होईल. व्यवसायात थोडी जोखिम पत्करणे फायदेशीर ठरू शकते, परंतु कोणताही मोठा निर्णय घेताना तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला अवश्य घ्यावा. एकाच वेळी अनेक कामे हातात घेतल्यामुळे थोडा मानसिक गोंधळ उडू शकतो, त्यामुळे एकाग्रता बाळगणे गरजेचे आहे.
मिथुन राशी (Gemini):
व्यवसायातील जुन्या व क्लिष्ट समस्या आज दूर होण्यास मदत होईल. विरोधकांवर मात करण्यात तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या कामाचा वेग वाढलेला असेल. वेळेचे योग्य नियोजन केल्यास प्रत्येक प्रोजेक्ट ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल. कुटुंबात वातावरण आनंदाचे राहील आणि घरातील अपूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न कराल.
कर्क राशी (Leo/Cancer):
आजचा दिवस अतिशय सकारात्मक असला तरी तुम्ही कामाच्या ताणामुळे थोडे व्यस्त आणि त्रस्त राहू शकता. अती कामामुळे किंवा दगदगीमुळे स्वभावथोडा चिडचिड होऊ शकतो, त्यामुळे संयम राखणे आवश्यक आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होण्यासाठी आणि आपुलकी वाढवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायाच्या विस्तारासाठी नवीन लोकांशी संपर्क वाढवाल.
सिंह राशी (Leo):
आजच्या दिवशी तुम्ही व्यावसायिक कामांमधून थोडा वेळ काढून स्वतःच्या आरोग्याकडे आणि वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ कामाच्या मागे धावणे योग्य नाही, तर कुटुंबाला व स्वतःच्या आवडीनिवडींनाही वेळ द्यावा. ऑफिसमध्ये कामाचा ताण अधिक असला तरी नशिबाची उत्तम साथ असल्यामुळे तुमचे रखडलेले प्रोजेक्ट पटापट मार्गी लागतील.
कन्या राशी (Virgo):
आज तुम्हाला तुमचे कौशल्य आणि कलागुण सर्वांसमोर दाखवण्याची उत्तम संधी मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी दिलेली जबाबदारी आणि प्रोजेक्ट वेळॆवर पूर्ण करणे हीच तुमची पहिली प्राथमिकता असली पाहिजे. कामाच्या अतिव्यस्ततेमुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. वैवाहिक व कौटुंबिक संबंध सुधारण्यासाठी आणि घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
तुळ राशी (Libra):
आजच्या दिवशी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. नोकरीत किंवा व्यवसायात सहकाऱ्यांचे व टीमचे म्हणणे ऐकून घेणे फायद्याचे ठरेल, जेणेकरून कोणतेही काम एकजुटीने व सुरळीत पार पडेल. कुटुंबातील सदस्यांना वेळ द्या आणि सर्वांसोबत प्रेमाने व नम्रतेने वागा. रागावर नियंत्रण ठेवणे आज अत्यंत आवश्यक आहे.
वृश्चिक राशी (Scorpio):
विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम यशाचा आहे. कला, साहित्य आणि सर्जनशील क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना मोठे टप्पे गाठता येतील. आरोग्याची स्थिती उत्तम राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी किंवा नवीन भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल असून वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.
धनु राशी (Sagittarius):
प्रेमजीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि विवाहाच्या संदर्भात सकारात्मक चर्चा पुढे सरकू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासावर आणि करिअरवर पूर्ण एकाग्रता ठेवावी. तब्येत ठीक ठाक राहील, परंतु खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे हिंमतीचे ठरेल.
मकर राशी (Capricorn):
वैवाहिक जीवनात गोडवा आणि सुसंवाद पाहायला मिळेल. जोडीदाराचा सल्ला किंवा मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. नोकरी व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग खुले होतिल. आर्थिक बाबतीत केलेली गुंतवणूक भविष्यात उत्तम परतावा देईल.
कुंभ राशी (Aquarius):
आजच्या दिवशी काही गुप्त शत्रू किंवा विरोधकांकडून त्रास किंवा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगा. मनोधैर्य खचू देऊ नका. कठीण प्रसंगात मित्रांची व कुटुंबीयांची भक्कम साथ तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. कायदेशीर बाबींमध्ये सावध राहावे.
मीन राशी (Pisces):
नोकरीत पदोन्नती किंवा चांगल्या सवलती मिळण्याचे योग जुळून येत आहेत. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला आणि कौशल्याला योग्य वाव मिळेल. आर्थिक क्षेत्रात धाडस किंवा मोठी गुंतवणूक करावयाची असल्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आरोग्य उत्तम राहील, मात्र आहारावर विशेष लक्ष द्या.
शहर
- पुणे: कात्रज चौकात जड वाहनांना बंदी! पुणे मेट्रोच्या कामामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग!
- पुणे: फटाके केवळ वाजवण्यावरच नाही, तर उत्पादन अन् विक्रीवरही पूर्ण बंदी घाला!; विद्यानंद बापट यांची सर्वोच्च न्यायालयाकडे मोठी मागणी!
- पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
महाराष्ट्र
- सोलापुर: भाजपचा शिंदे सेनेला मोठा धक्का! मंगळवेढा नगरपालिकेतील ५ नगरसेवकांसह २०० पदाधिकाऱ्यांचा कमळ हातात घेत भाजपमध्ये प्रवेश!
- कोल्हापुर: ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस! श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांची उडाली प्रचंड तारांबळ!
- कोल्हापूर: 'समान काम, समान वेतन'च्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! कोल्हापुरातील ९०० हून अधिक कर्मचारी आंदोलनात सहभागी, ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- राजस्थान: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणारी बस १५ फूट खोल नाल्यात कोसळून ८ जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी!
- उत्तर प्रदेश: ग्रेटर नोएडामध्ये थरारक घटना! चहा आणि मॅगी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील ५ जणांचा संशयास्पद मृत्यू; आई-वडील अन् ३ चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत!
- नवी दिल्ली: श्रेयासाठी आला असाल तर चुकीच्या पक्षात आहात ; नेहा बोरा यांच्यावरून रंगलेल्या वादावर राहुल गांधींनी सुनावले!
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!



























Subscribe to my channel




