जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एका कंपनीत काम करणाऱ्या माझ्या मित्राने या आठवड्याच्या मध्यात दुपारी सुमारे १२ वाजता मला फोन केला. मला आश्चर्य वाटले, कारण तो जिथे काम करतो तिथे रात्रीचे २.३० वाजले होते. त्याने आधी मला त्रास दिल्याबद्दल माफी मागितली आणि मग सांगितले की, या सोमवारी त्याला ले-ऑफची नोटीस मिळाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो आपल्या कुटुंबाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. सोसायटीतील लोक किंवा मित्र कामाबद्दल विचारतील, तेव्हा काय उत्तर द्यायचे याचाही तो विचार करत होता. महिन्याच्या अखेरीस त्याची नोकरी जाणार असल्याने त्याची चिंता वाढतच होती. इतके महिने मिळणाऱ्या पगारातूनच तो ईएमआय, मुलांची शाळेची फी आणि आई-वडिलांची वैद्यकीय बिले भरत होता, तसेच आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याची आशा बाळगत होता. पण आता सर्व काही अनिश्चित झाले आहे. एखादी व्यक्ती जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांपैकी एका कंपनीत काम करू शकते—ज्या कंपनीच्या कामगिरीचे, नफाक्षमतेचे आणि जागतिक पोहोचेचे कौतुक केले जाते—आणि तरीही तिला नोकरी गमावण्याचा धोका असू शकतो. नेटफ्लिक्सचेच उदाहरण घ्या. सब्स्क्रायबर्सच्या बाबतीत ही अजूनही आघाडीवर आहे. ती जगातील प्रमुख मनोरंजन आणि स्ट्रीमिंग कंपन्यांपैकी एक आहे. एवढे यश मिळूनही कंपनीने या सोमवारी जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. यातून मिळणारा धडा अस्वस्थ करणारा, पण महत्त्वाचा आहे. एखाद्या कंपनीचे यश तिच्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेची हमी देत नाही. व्यवसायाच्या प्राधान्यक्रमांमध्ये रातोरात बदल होऊ शकतात आणि एखाद्या कर्मचाऱ्याने प्रसिद्ध ब्रँडमध्ये काम करत असल्यामुळे आपले भविष्य आपोआप सुरक्षित होईल, असे मानू नये. याला नोकरकपातीचा धोका घोंघावत असलेला काळ म्हणता येईल. नायकी, स्टारबक्स, मेटा प्लॅटफॉर्म्स आणि अमेरिकेतील सर्वात मोठी सुपरमार्केट कंपनी क्रूगरसुद्धा नोकरकपात करत आहेत. काही कंपन्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी आपल्या गुंतवणूकदारांना ‘राइट-सायझिंग’बाबत ते गंभीर असल्याचे संकेत देत आहेत. दरम्यान, कर्मचाऱ्यांना अप्रत्यक्षपणे ‘कृपया तुम्हीही तयार राहा,’ असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत एखाद्या कर्मचाऱ्याची समंजस प्रतिक्रिया अशी असायला हवी की त्याने ना घाबरावे, ना डोळे झाकून आशावादी राहावे. कर्मचारी किती तयार असतो, हे महत्त्वाचे ठरते. कोणतीही अडचण येण्यापूर्वी तयारी करण्याचे काही मार्ग येथे दिले आहेत. यापैकी काही मार्ग जरी तुम्ही अवलंबले, तरी नोकरी जाण्यासारखी परिस्थिती उद्भवल्यावर धक्का बसल्यानंतर रणनीती आखण्याऐवजी तुमच्याकडे निदान सुरुवातीचा एक आधारबिंदू तरी असेल. 1. अफवांमध्ये न अडकता संकेत समजून घ्या : भरतीवरील स्थगिती, वारंवार होणाऱ्या पुनर्रचना, रद्द होणारे प्रकल्प, कमी होणारे बजेट, समान स्वरूपाच्या भूमिका आणि बदलणारी व्यावसायिक रणनीती यांकडे लक्ष द्या. यापैकी कोणतीही गोष्ट कर्मचारी कपात होणार असल्याचे सिद्ध करत नाही. मात्र अनेक संकेत एकाच वेळी दिसू लागले, तर पर्यायी योजना तयार करणे योग्य ठरेल. तुमच्या टीमच्या प्राधान्यक्रमांबद्दल योग्य प्रश्न विचारा आणि तुमचे योगदान स्पष्ट करा. ऑफिसमधील अफवांना पुरावा बनू देऊ नका. २. गरज पडण्यापूर्वीच प्लॅन-बी तयार ठेवा : आपण आधीच अशा नियोक्त्यांची, उद्योगांची आणि भूमिकांची ओळख करून ठेवणे नेहमीच चांगले असते, जिथे आपली कौशल्ये उपयोगी पडू शकतात. जुन्या सहकाऱ्यांशी बोला आणि योग्य ठिकाणी फ्रीलान्स किंवा कन्सल्टिंगच्या संधींचा शोध घ्या. नोटीस कालावधी, सेवा समाप्तीच्या अटी, विमा आणि नोकरीशी संबंधित इतर लाभांची माहिती ठेवा. ३. बाजारात ज्यांना मागणी आणि मोबदला मिळतो, अशा गोष्टी शिका : सध्याची नोकरी मिळवून देणाऱ्या केवळ त्याच कौशल्यांवर अवलंबून राहू नका. ऑटोमेशन, एआय आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा आपल्या उद्योगात कशा प्रकारे बदल घडवत आहेत, हे समजून घ्या. इतर संबंधित कौशल्ये शिका, समस्या सोडवण्याची क्षमता वाढवा आणि आपण परिस्थितीनुसार जुळवून घेऊ शकता, हे दाखवून द्या. वरिष्ठता आणि निष्ठा महत्त्वाची असतात; परंतु यापैकी कोणतीही गोष्ट आपली भूमिका कायमस्वरूपी अपरिहार्य राहील, याची हमी देत नाही. ४. आपले व्यावसायिक मूल्य दाखवत राहा : गरज पडण्यापूर्वीच आपला सीव्ही, लिंक्डइन प्रोफाइल आणि पोर्टफोलिओ अद्ययावत करून ठेवा. आपल्या उल्लेखनीय कामगिरी, पूर्ण केलेले प्रकल्प, वाढवलेला महसूल, वाचवलेला खर्च आणि सोडवलेल्या समस्यांची नोंद ठेवा. आपल्या सध्याच्या टीमबाहेरही व्यावसायिक संबंध जपून ठेवा. नेटवर्किंगचा अर्थ नोकरी मागणे नव्हे, तर गरज पडण्यापूर्वीच चांगले संबंध निर्माण करणे होय. मुद्दा असा आहे की नेटफ्लिक्सचे उदाहरण याची आठवण करून देते की कॉर्पोरेट यश हे स्वतःहून एखाद्या कर्मचाऱ्याच्या नोकरीच्या सुरक्षिततेची हमी देत नाही. तुम्ही कर्मचारी असाल, तर नेहमी आपल्या खिशात प्लॅन-बी घेऊन चला.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




