
Manoj Jarange Patil says Bhujbal’s anger confirms Maratha quota GR : मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत, म्हणजे मराठा आरक्षणाचा जीआर पक्का आहे, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ते छत्रपती संभाजीनगरमधील रूग्णालयातून बोलत होते. पाच दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर गॅलेक्सी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना दोन आठवडे आराम कऱण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मराठा बांधवांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. कुणावरही विश्वास ठेवू नका. प्रत्येक मराठ्यांना आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना हमखास आरक्षण मिळणार असल्याचा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
मी फक्त नाममात्र, सर्व मेहनत समाजाची - जरांगे
शेवटी काहीही होऊ दे.. माझ्या मराठी बांधवानी ही लढाई जिंकली. अनेक शतकांपासूनची प्रतीक्षा होती. शेवटी त्या लढाईल मराठ्यांनी यश पदरात पाडून घेतलेय. ३ जीआरचे यश समाजाचे आहे, मी फक्त नाममात्र आहे. मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र... शब्दावर विश्वास ठेवा अन् ठेवलाय आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सर्व मराठे आरक्षणात जाणार म्हणाजे जाणार, त्यावर शंका ठेवायची नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत, म्हणून गॅझेटियर लागू करायचे आहे. १८८१ पासून सरकारने मराठ्यांच्या हिताची एकही ओळ लिहिली नव्हती. हक्काचे गॅझेट असूनही सरकारने एक ओळही दिली नव्हती. फक्त संयम आणि शांतता ठेवून शांत डोक्याने विचार करा. एकाद्या विदूषक, अविचारी माणासावर विश्वास ठेवून संयम ढसळून घ्यायचा नाही, असे जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ?
निर्णय घेताना मी एकटा निर्णय घेत नाही. सात कोटी गोरगरीब जनता आणि मी निर्णय घेतो. काहींचे पोट यासाठी दुखत असते, आता त्यांच्या हातातून सर्व गेले. ज्यांना आरक्षणावर, गॅझेटवर राजकारण करायचे होते, ज्यावर जीवन जगत होते, ते सर्व आता कोलमडायला लागले. मग आता काय करायचे, काहीतरी बोलायचे. हे कधीच आपल्या बाजूने बोलले नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. कुठलाही निर्णय सुरूवातीचे आठ ते १५ वाटते हे करायला पाहिजे नव्हते. पण मी मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणावाचून राहणार नाही, हे डोक्यात ठेवा अन् आनंदी राहा. कुणाचे ऐकूण आपलं भलं होणार नाही. आणखी खूप टोळ्या उठणार आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
ज्याच्या नोंदी नाही, त्याच्यासाठी तिघांची समिती केली. गाव स्तरावर, तालुका स्तरावर समिती करण्यात आली. हैदराबादमध्ये असणाऱ्या नोंदी म्हणजे मराठवाड्यातील मराठा हाच कुणबी आहे, याच्यासाठी तिघांची समिती केली. ज्यांच्याकडे जमीन नाही. त्यांनी कुणाची बटाईने जमीन केली असेल, त्याचे हमीपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र निघणार.. प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे, असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला..
ज्याच्याकडे जमीन आहे, त्याच्या सातबारावर.. तिघाजणांच्या सदस्यांनी ताबडतोड वर्ग करून प्रमाणपत्र दिले जाणार.. हैदराबाद गॅझेटेयरच्या नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्या यावे, यासाठी जीआर आहे. शंका, कुशंका डोक्यात ठेवण्याची गरज नाही. मी तुमचं का वाटोळं करेन. मराठा समाजाचे मी का वाटोळं करणं. मी आणि समाज सध्या आनंदी आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
कुणावरही विश्वास ठेवायचा नाही...
पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाडा आरक्षणात गेला तर खाली काय राहिले. आपल्याला बोलायला काहीच राहिले नाही. कुणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवायचा नाही. तुमचा आणि माझा विश्वास राहिला नाही पाहिजे असा काहींचा उद्देश आहे. तो तुम्ही ढळू देऊ नका. तुम्ही मोठं झालेले पाहिजे. गैरसमज असेलच तर मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेय, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




