Pune Traffic : वेगात गाडी चालवली तर थेट ट्रॅप! पोलिसांची नवी मोहीम, प्रथमच लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर

Pune : वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी प्रथमच लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे. सहा महिन्यांच्या पायलट प्रकल्पांतर्गत हा उपक्रम शनिवारपासून लोणावळा, वडगाव-मावळ आणि यवत पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात सुरू करण्यात आला आहे.

‘ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी’अंतर्गत भागीदार असलेल्या ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ‘जीआरएसपी’चे वरिष्ठ रोड पोलिसिंग सल्लागार पॉल सिमकॉक्स यांनी ‘टूकॅम’ लेझर स्पीड कॅमेरे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्याकडे सुपूर्द केले.

या कॅमेऱ्यांद्वारे दिवस आणि रात्री दोन्ही वेळेस वाहनांचा वेग अचूकपणे मोजता येणार असून, ते ताशी ३२० किलोमीटरपर्यंतचा वेग नोंदवू शकतात. हे कॅमेरे हातात धरून, ट्रायपॉडवर बसवून किंवा पोलिस वाहनांमध्ये बसवूनही वापरता येतात.


पुणे ग्रामीण रस्ते सुरक्षा अहवाल २०२२-२०२३नुसार, जिल्ह्यातील प्राणघातक अपघातांपैकी सुमारे ५७ टक्के अपघात पुणे ग्रामीण भागात नोंदवले गेले आहेत. सन २०२३मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात ९८३ रस्ते अपघातांमध्ये मृत्यूची नोंद झाली असून, ही संख्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढली आहे. या अपघातांमध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वार आणि पादचारी बाधित होत असल्याचे अहवालात नमूद आहे.

दरम्यान, या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठी मे २०२५मध्ये सुमारे ४० पोलिस अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणात कॅमेऱ्यांची मांडणी, प्रत्यक्ष अंमलबजावणी, पुरावा व्यवस्थापन आणि रस्त्याच्या कडेला सुरक्षित कारवाई याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर लोणावळा आणि वडगाव-मावळ पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नोव्हेंबर २०२५ आणि फेब्रुवारी २०२६मध्ये अतिरिक्त प्रशिक्षण सत्रेही घेण्यात आली. पायलट प्रकल्पादरम्यान मिळणाऱ्या आकडेवारीच्या आधारे भविष्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात रस्ते सुरक्षा उपाययोजना अधिक व्यापक स्तरावर राबविण्याचा मानस असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

1 thought on “Pune Traffic : वेगात गाडी चालवली तर थेट ट्रॅप! पोलिसांची नवी मोहीम, प्रथमच लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर”

  1. Woop ass jokeAsian male and black femaleNipple masturbationNicole shemale
    tubesFan fiction lesbian svuGood god those sexy girlsHeterogeneous calcification of breastHanna hilton getting
    fuckedVegetables for masturbationCollar sex movie xnxx
    Boob eezJuliet shaw nudeAfrican american teen nude picsFree insertion lesbian sample
    videoGay morganton ncWife has no sex desireSailormoon und
    hentaiAdult 3d sex comics xnxxporn.win How to get pregnant sexual positionsSoccer team pornInterracial rimming tubeGirl fucking her stick shiftSex club peoria illinoisUnsuspecting cumshotYounf teenYoung nude redheadsSame sex marriages debate xnxx Teen cheerleader
    titsTricked into blowjobGay clubs costa ricaRockabilly pin ups nudeMickey mouse watch
    adult sizeHelen hunt in nudePhilip k dick
    do androids dream of electric sheepItchy vagina and brown dischargeNude redhaired daughter
    and motherNaked girl gets shit onSexy pussy licking lesbian threesomeFree sex machine clipsCute japan sex teen

    Also visit my blog post: homepage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *