मुंबई: १ जून २०२६ पासून देशात घरगुती स्वयंपाकाच्या गॅस (LPG) आणि पाईप गॅस (PNG) वापराच्या नियमांमध्ये अत्यंत मोठे आणि महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत. गॅस सिलेंडरची होणारी साठेबाजी, अवैध विक्री आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने 'एक घर, एक गॅस कनेक्शन' हा नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) आपला डिजिटल डेटाबेस अपडेट केला असून, नवीन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन थेट ब्लॉक केले जाणार आहे.
१ जून २०२6 पासून बदललेले ५ प्रमुख नियम खालीलप्रमाणे आहेत:
१. एक घर, एक गॅस कनेक्शन (No Dual Connection): नव्या नियमानुसार एकाच निवासी पत्त्यावर आता फक्त एकच ॲक्टिव्ह गॅस कनेक्शन ठेवण्याची परवानगी असेल. एकाच घरात एकापेक्षा जास्त कनेक्शन आढळल्यास कारवाई केली जाईल.
२. पीएनजी (PNG) धारकांना एलपीजी सिलेंडर नाही: ज्या ग्राहकांच्या घरांमध्ये पाईपद्वारे गॅस (PNG) जोडणी उपलब्ध आहे, त्यांना आता घरगुती एलपीजी सिलेंडर वापरता येणार नाही. जर तुमच्याकडे दोन्ही सुविधा असतील, तर तुमचे एलपीजी कनेक्शन तात्पुरते किंवा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
३. सिलेंडर सरेंडर करणाऱ्यांसाठी 'ट्रान्सफर व्हाउचर': ज्या ग्राहकांकडे पीएनजी सुविधा आल्यामुळे ते आपले जुने एलपीजी कनेक्शन सरेंडर (परत) करतील, त्यांना गॅस एजन्सीकडून 'ट्रान्सफर व्हाउचर' दिले जाईल. भविष्यात जर हे ग्राहक पीएनजी नसलेल्या दुसऱ्या भागात राहायला गेले, तर या व्हाउचरचा वापर करून त्यांना कोणत्याही त्रासाशिवाय पुन्हा नवीन एलपीजी कनेक्शन मिळवता येईल.
४. गॅस रिफिलिंगसाठी नवा 'लॉक-इन पिरियड': बाजारपेठेतील गॅसची टंचाई आणि साठेबाजी लक्षात घेता दोन सिलेंडर रिफिल करण्याच्या कालावधीत मर्यादा घालण्यात आली आहे. नवीन नियमानुसार, शहरी भागातील ग्राहकांना २५ दिवसांच्या आधी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना ४५ दिवसांच्या आधी दुसरा गॅस सिलेंडर बुक किंवा रिफिल करता येणार नाही.
५. व्यावसायिक सिलेंडर महागला, घरगुती दरात दिलासा:१ जून रोजी ऑईल कंपन्यांनी घरगुती वापराच्या (१४.२ किलो) सिलेंडरच्या दरात कोणताही बदल न केल्याने गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, हॉटेल आणि व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या व्यावसायिक (Commercial) सिलेंडरच्या दरात ४२ रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर ५ किलोच्या छोट्या एफटीएल सिलेंडरच्या किमतीत ११ रुपयांची वाढ झाली आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



