पुणे: खडकवासला धरणातून ११,७०४ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे: खडकवासला धरणातील पाणीपातळीमध्ये होत असलेल्या झपाट्याने घट लक्षात घेऊन मंगळवारी (४ ऑगस्ट) सकाळी ९ वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. यापूर्वी सुरू असलेला १८,४१४ क्युसेक विसर्ग घटवून ११,७०४ क्युसेक करण्यात आल्याची माहित खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली.पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, पुढील काळात पावसाचे प्रमाण आणि धरणांमध्ये होणारी आवक यानुसार विसर्गामध्ये पुन्हा वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे मुठा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीपात्रात ठेवलेले साहित्य, वाहने किंवा जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सखल भागातील नागरिकांना याबाबत तत्काळ सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

दरम्यान, सकाळी ६ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार खडकवासला धरण १०० टक्के भरले असून आतापर्यंत धरणातून ९.७५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. खडकवासला धरण समूहातील चारही धरणांमध्ये एकूण २९.१० टीएमसी (९९.८३ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा २५.८४ टीएमसी (८८.६६ टक्के) इतका होता. चारही धरणांमध्ये सध्या २,१३६ एमसीएफटी पाण्याची आवक सुरू आहे. प्रशासनाने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 



शहर

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *