मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा ६२ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात अत्यंत दिमाखात संपन्न झाला. या शानदार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा व कलाकारांचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे अभिनंदन केले आणि उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठी अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक याचं तोंडभरुन कौतुक केलं, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांकडून प्रसाद ओकचे मोठे कौतुक: ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी अभिनेता प्रसाद ओकला 'चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारा'नं गौरवण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद ओक याने 'धर्मवीर' चित्रपटात साकारलेल्या आनंद दिघे यांच्या ऐतिहासिक भूमिकेबाबत भरभरून भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले की, "विष्णुपंत पागनीस म्हणजे संत तुकाराम... निळू फुले म्हणजे अत्यंत इरसाल असा राजकारणी... तसंच आता, प्रसाद ओक म्हणजे धर्मवीर आनंद दिघे..." मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे शब्द उच्चारताच सभागृहात एकच दाद मिळाली आणि अभिनेता प्रसाद ओक स्वतः जागेवरून उठून उभा राहिला व मुख्यमंत्र्यांसमोर हात जोडून नतमस्तक झाला.
प्रसाद ओक यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "आपल्या सर्वांचे लाडके प्रसाद ओक, जे एक उत्कृष्ट दिग्दर्शक आणि सुंदर कलावंत आहेत... मला असं वाटतं की, कलेच्या क्षेत्रात एक प्रकारे '३६० डिग्री मॅन' म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात ते परीक्षक म्हणून जे काम करतात, ते खरोखरच विलक्षण आहे. ज्यांनी धर्मवीर आनंद दिघेंना प्रत्यक्ष पाहिलं नसेल, त्यांच्यासाठी आयुष्यभर प्रसाद ओक यांनी साकारलेली ती प्रतिमा इतकी सुंदर आणि हुबेहूब आहे की, त्यांच्याकरता आता तेच खरे धर्मवीर आनंद दिघे ठरले आहेत. इतकं सुंदर आणि सजीव काम त्यांनी या भूमिकेत केले आहे."
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिश्कीलपणे असेही म्हटले की, "आत्ताच त्यांनी सांगितलं की त्यांनी १२५ सिनेमे केले आहेत... पण प्रसाद ओक, तुम्ही काळजी करू नका, एवढ्या लवकर तुम्हाला जीवनगौरव दिला जाणार नाही, कारण अजून खूप मोठे पुरस्कार तुम्हाला घ्यायचे आहेत. त्यामुळे ही सेवा तुम्ही सातत्यानं सिनेसृष्टीसाठी अविरतपणे सुरू ठेवली पाहिजे."
इतर दिग्गजांचाही सन्मान व शासनाचे धोरण: या पुरस्कार सोहळ्यात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना 'चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला 'राज कपूर विशेष योगदान पुरस्कार' आणि दिग्गज सलीम खान यांना 'राज कपूर जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला होता (प्रकृती अस्वस्थतेमुळे सलीम खान यांच्या वतीने त्यांची पत्नी अभिनेत्री हेलन यांनी हा पुरस्कार स्वीकारला).
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटसृष्टीसाठी शासनाच्या आगामी योजनांची माहिती दिली. महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची कलात्मक गुणवत्ता जपतानाच आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त अशी 'चित्रनगरी' विकसित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा, विविध प्रकारच्या सेट्सची उपलब्धता एकाच ठिकाणी करून दिली जाईल. तसेच, मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे (Theaters) उपलब्ध करून देण्याचा एक सर्वसमावेशक आराखडा लवकरच जाहीर केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मराठी चित्रपटांचे आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही त्यांची खरी वैशिष्ट्ये असून मराठी रसिक आणि कलाकारांनी ही परंपरा उच्च स्तरावर नेऊन ठेवली आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
शहर
- पुणे: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! राज्यातील २६५ तालुक्यांतील दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ, राज्य बोर्डाचा मोठा निर्णय!
- नागपूर: पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यावरणपूरक 'सोलर बोट सफारी' सुरू वाघ पाणी प्यायला येणार आणि तुम्ही नदीत असणार! पर्यटकांसाठी नवीन पर्व.
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक: कोणती जागा कुणी लढवायची हे ठरवण्याचा अधिकार नेत्यांचाच; महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू!
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी नवभारततर्फे हत्येपूर्वी किंवा स्थलांतरास टाळाटाळ करणाऱ्या रहिवाशांचे ट्रान्झिट रेंट (भाडे) घटवले, नवीन दर जाहीर!
महाराष्ट्र
- मुंबई: ओबीसी समाजाच्या विकासासाठी मोठा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी शासकीय जागा मिळणार केवळ १ रुपयात!
- सातारा: जिल्ह्यात सापडले अत्यंत दुर्मिळ लांब मानेचे मऊ पाठीचे कासव; वन्यजीवप्रेमींमध्ये कुतूहल आणि आश्चर्याचे वातावरण!
- पुणे: दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! राज्यातील २६५ तालुक्यांतील दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क माफ, राज्य बोर्डाचा मोठा निर्णय!
- नागपूर: पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यावरणपूरक 'सोलर बोट सफारी' सुरू वाघ पाणी प्यायला येणार आणि तुम्ही नदीत असणार! पर्यटकांसाठी नवीन पर्व.
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई


























Subscribe to my channel



