मुंबई: अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर म्हणजेच बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एक महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत १३२ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी उभारण्याच्या प्रकल्पात बाधित होणारी तब्बल ८४७ खारफुटीची (Mangroves) झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाने महापारेषणला (MahaTransco) मंगळवारी अधिकृत परवानगी दिली. हा प्रकल्प देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व राष्ट्रीय महत्त्वाचा असल्याचे नमूद करत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडने (महापारेषण) डहाणू सब-स्टेशनपासून प्रस्तावित अंबेसराई ट्रॅक्शन सब-स्टेशनपर्यंत १३ किलोमीटर लांबीची वीजवाहिनी उभारण्यासाठी व सरोद परिसरातील जंगलात खारफुटीची झाडे व वनजमीन वळवण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकल्पासाठी ३.३५ हेक्टर वनजमीन, ज्यामध्ये सुमारे १.९६ हेक्टर खारफुटी क्षेत्राचा समावेश आहे, ती बाधित होत आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण व अटी:
प्रारंभी, या झाडांच्या मोबदल्यात शेकडो किलोमीटर दूर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात भरपाई वनीकरण (Afforestation) केले जाणार असल्याचे समोर आल्यावर न्यायालयाने तीव्र आश्चर्य व्यक्त केले होते. दूरवर रोपे लावल्यामुळे स्थानकि परिसराचा पर्यावरणीय समतोल साधला जात नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले. त्यानंतर महापारेषणने महाधिवक्ता मिलिंद साठे यांच्यामार्फत प्रतिज्ञापत्र सादर करत, मूळ नियमानुसार सोलापूरमध्ये ७,४५७ बिगर-खारफुटीची झाडे लावली जाणार असली, तरी स्थानिक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील पंचाळी, देहाणे व आसनगाव परिसरात तब्बल २६,६६४ नवीन खारफुटीची रोपे व लागवड केली जाईल आणि सुरक्षेसाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या जातील, अशी हमी दिली.
ही वीजवाहिनी आणि ट्रॅक्शन सब-स्टेशन बुलेट ट्रेन प्रकल्पाचा अविभाज्य भाग असल्याने आणि हा प्रकल्प राष्ट्रीय महत्त्वाचा असल्यामुळे न्यायालयाने हा निर्णय अपवादात्मक उपाय म्हणून दिला आहे. तसेच, या निकालाचा भविष्यातील इतर प्रकल्पांसाठी पायंडा (Precedent) म्हणून आधार घेता येणार नाही, अशी स्पष्ट तंबीही न्यायालयाने दिली आहे.
राज्य सरकारची कानउघाडणी:
दरम्यान, भरपाई वनीकरणाबाबत जमीन बँक तयार करणे, पोर्टलवर माहिती देणे आणि देखरेखीसाठी पारदर्शक यंत्रणा उभारणे यांसारख्या मुद्द्यांवर ९ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्देशांचे राज्य सरकारने पालन न केल्याबद्दल उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासकीय उदासीनतेची गंभीर दखल घेत न्यायालयाने मुख्य सचिवांना या निर्देशांची अंमलबजावणी चार आठवड्यांच्या आत करण्याचे कडक आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे बुलेट ट्रेनच्या वीज पुरवठा यंत्रणेचा मार्ग मोकळा झाला असला, तरी पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




