9 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

मी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा(एनडीएमए) सदस्य राहिलो आहे. त्यामुळे मीनेपाळमधील संकटाकडे या विषयातील तज्ज्ञाच्यादृष्टिकोनातून पाहतो. जेव्हा हिमालयाच्या एखाद्या खोऱ्यातपाणी, चिखल आणि मोठे दगड अचानक खाली येतात,तेव्हा आपला पहिला अंदाज ढगफुटीचाच असतो. हे खरेआहे की, पर्वतीय भागात ढगफुटी ही एक सर्वसामान्यनैसर्गिक घटना आहे. यामुळे विनाशकारी पूर येतो. पणनेपाळच्या पार्श्वभूमीवर, हिमालयाच्या उंचावर नेमकेकाय घडत आहे, हे अधिक काळजीपूर्वक पाहिले पाहिजे.
प्रत्येक अचानक येणारा पूर केवळ अतिवृष्टीमुळे येतनाही. कधीकधी त्याचा उगम खूप उंचावर असतो. तिथेबर्फ, खडक, पाणी, तापमान आणि गुरुत्वाकर्षण अशीकाही परिस्थिती निर्माण करतात, जी समजून घ्यायलाआपण अजून शिकत आहोत.
फेब्रुवारी 2021 मध्ये उत्तराखंडमधील ऋषिगंगा-तपोवन आपत्तीने हे अत्यंत भयंकर पद्धतीने दाखवून दिले. ती हिवाळ्यातील एक स्वच्छ सकाळ होती. पण खोऱ्यात खूप उंचावर खडक आणि बर्फाचा एक मोठा भाग तुटला. तोवेगाने खाली आला आणि त्याचे एका विनाशकारी ढिगाऱ्याच्या प्रवाहात रूपांतर झाले. या घटनेत 200 हूनअधिक लोक मरण पावले किंवा बेपत्ता झाले. ऑक्टोबर2023 मध्ये सिक्कीममधील दक्षिण ल्होनाकच्या घटनेतएक वेगळीच प्रक्रिया पाहायला मिळाली. खूप जड ढिगाराहिमनदीच्या सरोवरात (ग्लेशियल लेक) पडला. यामुळेमोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि पाणी अडवून ठेवणारानैसर्गिक अडथळा तुटला. यानंतर अत्यंत विनाशकारीवेगाने तिस्ता खोऱ्यात पूर आला. नेपाळची घटना याचाआणखी एक वेगळा प्रकार सांगते. सुरुवातीच्याअहवालांमध्ये भूकंपामुळे हिमनदी फुटण्याची शक्यतावर्तवण्यात आली होती. पण नंतरच्या वैज्ञानिकमूल्यांकनातून असे संकेत मिळाले की, हिमनदीफुटल्यामुळेच कदाचित भूकंपासारख्या हालचाली निर्माणझाल्या असाव्यात. उंच बर्फाळ पर्वतावरून खडक आणिबर्फाचा मोठा भाग तुटून वेगाने खाली पडला. यातून तयारझालेला ढिगारा आणि पाणी नदीच्या प्रवाहात मिसळले. यातीनही घटनांमधून एक महत्त्वाचा धडा मिळतो. खालीसारखाच दिसणारा विध्वंस असू शकतो, पण उंचावरत्याची कारणे अगदी वेगळी असू शकतात.
आणखी एक नैसर्गिक घटना आहे, जिच्याबद्दललोकांमध्ये अधिक जागृती होण्याची गरज आहे. तीम्हणजे ‘पर्माफ्रॉस्ट’. ही अशी खडकाळ जमीन असते,जी किमान सलग दोन वर्षे गोठलेलीच असते. खूपउंचावरील भेगांमध्ये असलेला बर्फ पर्वताच्या खडकांनाएकमेकांशी जोडून ठेवण्यास मदत करू शकतो.तापमानातील बदल, वारंवार गोठण्याची आणिवितळण्याची प्रक्रिया, तसेच पर्माफ्रॉस्टची हळूहळू होणारीझीज या नैसर्गिक जोडणीला कमकुवत करू शकते. याचाअर्थ असा नाही की, हिमालयाचे पर्वत आता सगळीकडेतुटून पडणार आहेत. पण हवामान बदलाच्या काळातआपल्याला पर्वतांच्या स्थिरतेचाही गांभीर्याने अभ्यासकरावा लागेल.
पाणी आणि ढिगारा खाली जाण्यासाठी सर्वात सोपारस्ता शोधतात. खोरी ही पाणी, बर्फ, दगड आणि गाळयांच्या अमर्याद ऊर्जेला एका मर्यादित मार्गात वळवतात.दुर्दैवाने, मानवी हालचालीही नेमक्या याच ठिकाणीहोतात. नद्यांच्या खोऱ्यालगत रस्ते बांधले जातात. याचनद्यांवरून पूल बांधले जातात. जलविद्युत प्रकल्पही याचखोऱ्यांवर अवलंबून असतात. पिढ्यान््पिढ्या गावेनद्यांच्या काठावरच वसलेली आहेत. भाविक, पर्यटकआणि ट्रेकिंग करणारेही याच मार्गावरून जातात. अशावेळी अनेक किलोमीटर दूर आणि हजारो मीटर उंचीवरसुरू झालेली आपत्ती अचानक या लोकांसाठी धोका बनूशकते. आपत्तीला खालपर्यंत आणू शकणारा हा संपूर्णखालचा प्रवाह (डाउनस्ट्रीम कॉरिडॉर) आपण समजूनघेण्याची गरज आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)

प्रत्येक अचानक येणारा पूर केवळअतिवृष्टीमुळे येत नाही. कधी कधीत्याचा उगम खूप उंचावर असतो. तिथेबर्फ, खडक, पाणी, तापमान आणिगुरुत्वाकर्षण अशी काही परिस्थितीनिर्माण करतात, जी समजून घ्यायलाआपण अजून शिकत आहोत.

This post was originally published on this site.
शहर
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
- पुणे: सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत सहाय्यक फौजदाराचा जागीच मृत्यू!
- पुणे: मोठी कारवाई! आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोहगावमधील ११ विनापरवाना पीजी-हॉस्टेल सील!
महाराष्ट्र
- मुंबई: लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान मोठी दुर्घटना; २५ वर्षीय जयदीप नेमाडे तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
- पुणे: राजगुरूनगरमध्ये भीषण हत्याकांड! उपचारासाठी आलेल्या आजारी मामाची भाच्याकडून धारदार शस्त्राने हत्या, नंतर स्वतःही संपवले जीवन!
- सातारा: जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका!
- नांदेड: दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी मिळायला नको दुष्काळी स्थितीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!


























Subscribe to my channel




