डॉ. नरेश त्रेहान यांचा कॉलम:‎‎‎‎‎‎‎‎‎‎हृदयविकार पूर्वसूचना न देता ‎दीर्घकाळ लपलेला असू शकतो‎

हार्ट अटॅकला अचानक घडणारी अनपेक्षित घटना‎मानले जाते. पण यामागे नेहमीच एक पार्श्वभूमी असते. ती‎अनेकदा कोणत्याही पूर्वसूचनेविना दीर्घकाळ लपलेली‎असू शकते. कोरोनरी आर्टरी डिसीज ही एक संथ आणि‎शांत प्रक्रिया आहे. लक्षणे दिसण्याच्या कित्येक वर्षे किंवा‎दशके आधीपासून ती शरीरात विकसित होत असते.‎जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात ही स्थिती‎अधिक स्पष्टपणे दिसून येते. जगभरात‎‘कार्डिओव्हॅस्कुलर’ आजारांमुळे (हृदय व‎रक्तवाहिन्यांचे आजार) होणाऱ्या मृत्यूंपैकी 20% मृत्यू ‎‎भारतात होतात. भारतीयांमध्ये पाश्चिमात्य लोकांच्या‎तुलनेत जवळपास एक दशक आधीच हे आजार‎विकसित होतात. कमी वयात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत‎आहे. वास्तव हे आहे की, बहुतांश लोक या धोक्याची‎जाणीव नसतानाही या आजारांसोबत जगत आहेत.‎ आजकाल आपण 30 वर्षांच्या तरुणांमध्येही हार्ट‎अटॅकचे प्रमाण पाहत आहोत. 2000 ते 2024 या‎काळातील आरोग्यविषयक डेटाचे विश्लेषण केल्यास एक ‎‎गोष्ट समोर येते. त्यानुसार, शहरी भागातील सुमारे 12%‎भारतीय कोणत्या ना कोणत्या कार्डिओव्हॅस्कुलर‎आजाराने ग्रस्त होते. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या 2022‎च्या अहवालात हार्ट अटॅकमुळे 32 हजारांहून अधिक‎मृत्यूंची नोंद झाली. ही आकडेवारी दरवर्षी 12 टक्क्यांहून‎अधिक वाढ दर्शवते. भारतीय पुरुषांमध्ये होणाऱ्या हार्ट‎अटॅकपैकी सुमारे 25% घटना 40 वर्षांच्या आधीच‎घडतात. तर, वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत हा आकडा 50‎टक्क्यांपर्यंत पोहोचतो.‎ हृदयाच्या आजारांची प्रकरणे वेळेवर का ओळखता‎येत नाहीत? याचे कारण आपल्या शरीराच्या मूळ‎रक्तवाहिन्यांच्या रचनेत दडलेले आहे. एथेरोस्क्लेरोसिस‎म्हणजेच रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होणे. यामुळे त्या‎हळूहळू अरुंद होतात. या प्रक्रियेत स्वतःहून कोणत्याही‎वेदना होत नाहीत. कारण, रक्तवाहिन्यांमध्ये वेदना‎जाणवून देणारे रिसेप्टर्स नसतातच. या प्रक्रियेतील तीन‎सर्वात मोठे घटक म्हणजे उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलची‎समस्या आणि मधुमेह. या तिन्ही समस्या शरीरात अत्यंत‎शांतपणे काम करतात. एखादी व्यक्ती धोकादायक‎पातळीवर वाढलेला रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉल घेऊनही‎अनेक वर्षे जगू शकते. तरीही तिला एकदम सामान्य वाटू‎शकते. जेव्हा रक्तवाहिनी खूप जास्त ब्लॉक होते, तेव्हाच‎साधारणपणे लक्षणे दिसतात. पण तोपर्यंत आजार खूप‎वाढलेला असतो. छातीत दुखणे, प्लाक रेप्चर, धाप लागणे‎किंवा थकवा येणे अशा लक्षणांची वाट पाहणे चुकीचे‎आहे. ही वाट पाहणे म्हणजेच शरीराची यंत्रणा निकामी‎होण्याची वाट पाहण्यासारखे आहे.‎ भारतात कमी वयातच हृदयविकार वेगाने वाढत आहेत.‎हे लक्षात घेता, या आजाराच्या धोक्याचे परीक्षण 30-35‎व्या वर्षी किंवा त्याआधीच व्हायला हवे. परदेशाप्रमाणे‎पारंपरिक पद्धतीने 40-45 वर्षांनंतर ते करणे योग्य नाही.‎विशेषतः वयाची 30 वर्षे ओलांडल्यावर ‘बेसिक लिपिड‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎प्रोफाइल’, ब्लड प्रेशर आणि ब्लड ग्लुकोजची तपासणी‎करणे गरजेचे आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या नियमित‎आरोग्य तपासणीचा हा भाग असला पाहिजे. ज्या‎लोकांच्या कुटुंबात हृदयविकार, मधुमेह किंवा इतर‎धोक्यांचा इतिहास आहे, त्यांनी ‘इमेजिंग’ आधारित‎तपासण्या कराव्यात. यामुळे कोणताही मोठा आजार समोर‎येण्याच्या आधीच रक्तवाहिन्यांमधील प्लाक शोधता येतो.‎ नोकरी देणाऱ्या कंपन्यांनीही वार्षिक ‘कार्डिॲक रिस्क‎स्क्रीनिंग’ला कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेइतकेच‎गांभीर्याने घेतले पाहिजे. विमा कंपन्यांनाही प्रोत्साहन दिले‎पाहिजे. त्यांनी आजार झाल्यानंतर उपचाराचा खर्च‎उचलण्यापेक्षा प्रतिबंधात्मक तपासण्यांनाही विमाकवच‎द्यावे. कारण, आजाराचे लवकर निदान होणे हा नेहमीच‎अधिक किफायतशीर मार्ग आहे.‎ (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारतीयांमध्ये हृदयविकार पाश्चिमात्य‎देशांतील लोकांच्या तुलनेत एक दशक‎आधीच विकसित होतो. कमी वयात‎हार्ट अटॅकचे प्रमाण वाढत आहे. अनेक‎लोक या धोक्यापासून अनभिज्ञ असूनही‎या आजारांसोबत जगत असण्याची‎शक्यता आहे.‎‎

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *