राष्ट्रीय राजकारणात सध्या जे मंथन सुरू आहे, त्यालादोन बाजू आहेत. पहिली म्हणजे, लोकसभेत अल्पमतातअसूनही भाजपने भारताला जवळपास एकपक्षीयराजवटीचा देश बनवण्यात यश मिळवले आहे. दुसरीबाजू अशी की, हे काम प्रादेशिक पक्षांना फोडून केले जातआहे आणि आता काँग्रेस हाच एकमेव महत्त्वाचा, शाबूतविरोधी पक्ष उरला आहे. अशा प्रकारे भारतीय राजकारणदोनपक्षीय समीकरणात बदलले आहे. हे समीकरण अगदी साधे आणि सरळ असायला हवेहोते, अट फक्त इतकीच की काँग्रेसने एक दमदार आव्हानम्हणून समोर यायला हवे होते. मात्र, भाजपविरुद्धच्यालढतीत केवळ 10 टक्के विजयाचा दर गाठणाऱ्याकाँग्रेसला ते शक्य नाही. तसे, द्विपक्षीय व्यवस्था भाजपलापूर्णपणे सोयीची आहे. कारण त्यांना फक्त ताकदवानप्रादेशिक पक्षांशी लढावे लागते आणि अशा बहुतेकपक्षांना कमकुवत केले गेले आहे. अखिलेश यादव यांच्यासमाजवादी पक्षाची परीक्षा आगामी लढतीत योगीआदित्यनाथ यांच्याशी होणार आहे. आता 3 प्रश्न उपस्थित होतात. पहिला: भाजपलाकाँग्रेस इतका सोयीस्कर प्रतिस्पर्धी का वाटतो? दुसरा:काँग्रेसमध्ये अशी कोणती उणीव आहे की ज्यामुळे तो एकविश्वासार्ह पर्याय ठरू शकत नाही? तिसरा: काँग्रेसस्वतःला यातून कसे सावरणार? पहिल्या प्रश्नाचे उत्तरखूप सोपे आहे : भाजप चार इंजिनच्या जोरावर भरारी घेतआहे - हिंदुत्व, राष्ट्रवाद, जनकल्याणकारी कार्यक्रमांचीकुशल अंमलबजावणी आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणाराअवाढव्य पायाभूत सुविधांचा विकास. काँग्रेसकडे यासर्वांना उत्तर नाही, हे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे.काँग्रेसच्या मते भाजप जे करत आहे ते चुकीचे आहे, तरप्रश्न उरतो की, सत्तेत आल्यावर काँग्रेस स्वतः कायकरेल? अर्थव्यवस्था, धोरणात्मक प्रश्न आणि संरक्षणाच्या मुद्द्यांवर काँग्रेस भाजपपेक्षा वेगळे काय करेल?पाकिस्तान, चीन, अमेरिका आणि पश्चिमआशियासोबतचे व्यवहार ती कसे हाताळेल? संरक्षणावरती किती खर्च करेल? भाजपचा पर्याय म्हणून तिचे भविष्यातील चित्र काय आहे? भाजप जर त्यांच्या मते भांडवलशाहीवादी असेल आणि राष्ट्रीय हितांशी तडजोड करत असेल, तर काँग्रेस असे काय वेगळे करणार आहे?जर काँग्रेस स्वतःला एक पर्याय मानत असेल, ज्यालामतदार भाजपच्या जागी निवडतील, तर ती वेगळे कायदेत आहे? काँग्रेसला आधी या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. याव्यतिरिक्त, भाजपची भरारी उंचावणाऱ्या त्या चारइंजिनांना उत्तर शोधावे लागेल. सर्वात आधी हिंदुत्वाचाविषय घेऊ. या आघाडीवर भाजपकडे मुकाबलाकरण्याचा प्रयत्न काँग्रेसने करूच नये. ही जमीन आता जिंकली गेली आहे आणि काँग्रेस त्यात कोणताही बदलघडवू शकत नाही, मग त्यांच्या नेत्यांनी कितीही मंदिरांनाभेटी दिल्या तरीही. शिवसेनेनेही आता हा प्रयत्न सोडूनदिला आहे. खरं तर, उद्धव ठाकरे यांनी एकदा मलादार्शनिक अंदाजात सांगितले होते की, त्यांच्या वडिलांनीमहाराष्ट्रवादाचा मुद्दा सोडून हिंदुत्वाचा स्वीकार करणे हीचूक होती, कारण यामुळेच भाजपला शिवसेनेच्यामैदानात शिरण्याची आणि त्यावर ताबा मिळवण्याची संधीमिळाली. जनकल्याणाच्या मुद्द्यावर काँग्रेस जगातील सर्व सुखदेण्याचे आश्वासन देऊ शकते. कर्नाटक आणि तेलंगणाततसे करून त्यांनी यश मिळवले आहे. पायाभूतसुविधांच्या बाबतीत मात्र त्यांना समस्यांना सामोरे जावेलागू शकते. इतक्या वर्षांपासून अनेक मोठ्या प्रकल्पांनात्यांचा विरोध राहिला आहे, निकोबार प्रकल्प हे त्याचेताजे उदाहरण आहे. त्यामुळे धर्माचा मुद्दा त्यांच्याआवाक्याबाहेरचा आहे, जनकल्याण/विकासाचा मुद्दाइतका निर्विवाद आहे की त्यात भावना जोडता येत नाहीत.त्यामुळे काँग्रेसकडे शेवटी राष्ट्रवादाचा मुद्दाच शिल्लकराहतो. काँग्रेसने राष्ट्रवादाचा मुद्दा कशा प्रकारेनाकारला, हे 2014 नंतरच्या त्यांच्या राजकारणातीलसर्वात रहस्यमय पैलू आहे. त्यांचे काही नेते आज जरीयुरोपमधील पर्यावरणवादी नेत्यांसारखे दिसण्याचा प्रयत्नकरत असले, तरी खरी काँग्रेस रक्ताचे अश्रू ढाळणाऱ्याशांततावाद्यांचा पक्ष कधीच नव्हता. हा तोच पक्ष आहे,ज्याने इंदिरा गांधींच्या नेतृत्वात 1971 मध्ये पाकिस्तानचेदोन तुकडे केले आणि लालबहादूर शास्त्रींच्या काळात1965 चे युद्ध या अर्थाने जिंकले की, त्यांनी काश्मीरहडपण्याच्या इराद्याने हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला मागेरेटले होते. काँग्रेसने ईशान्येकडील बंडखोरांचाहीक्रूरतेने मुकाबला केला. 5 मार्च 1966 रोजी आयझॉललावेढा घातलेल्या बंडखोरांना सरकारी तिजोरी, आसामरायफल्सच्या बटालियनचे मुख्यालय आणि डेप्युटीकमिशनरच्या निवासावर ताबा मिळवण्यापासूनरोखण्यासाठी वायुसेनेची विमाने धाडली होती. ऑपरेशनब्लू स्टारअंतर्गत त्यांनी सैन्याला सुवर्णमंदिरात पाठवलेहोते. त्यानंतर ऑपरेशन ब्लॅक थंडरही केले होते. पहिली दोन ऑपरेशन्स इंदिरा गांधींच्या काळात आणिशेवटची दोन ऑपरेशन्स त्यांचे पुत्र राजीव गांधींच्याकाळात झाली. त्यानंतर काँग्रेसने काश्मीर खोरे आणिपंजाबमध्ये (1991-95) दहशतवाद आणिफुटीरतावादाच्या सर्वात रक्तरंजित पर्वाचा मुकाबलाकेला. हे पी. व्ही. नरसिंह राव यांच्या काळात झाले.इतकेच काय, जवाहरलाल नेहरूंच्या काळातही नागाबंडखोरांशी अत्यंत कठोर मार्गाने लढा दिला गेला होता.नेहरूंनी गोवा मुक्त करण्यासाठी सैन्य पाठवले होते.काँग्रेसला नेहरू घराण्याबाहेरील त्यांचे पंतप्रधान कदाचितआवडत नसतील, पण वास्तव हे आहे की त्यांचा एकहीनेता असा नव्हता जो राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कमकुवतहोता. म्हणूनच आश्चर्य वाटते की, राष्ट्रवादाचा मूळ पक्षरस्ता कसा विसरला. उरी कांडानंतरचा ‘सर्जिकल स्ट्राइक’ असो, पुलवामाकांडानंतर बालाकोटवर झालेला हवाई हल्ला असो, पूर्वलडाख/गलवानमधील संकट असो किंवा ऑपरेशनसिंदूर - या सर्वांवर प्रश्न उपस्थित करून आणि पुराव्यांचीमागणी करून काँग्रेसने स्वतःचेच नुकसान करून घेतलेआहे. ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत संसदेत राहुलगांधींच्या वक्तव्यात यावर जास्त भर होता की भारताचीकिती विमाने गमावली आणि का? त्यांच्या पक्षाच्यापंजाबमधील एका खासदाराने तर भारतीय वायुसेनेच्यापाडलेल्या विमानाचा एक तुकडाही प्रदर्शित केला होता.याला किती ‘स्मार्ट’ पाऊल म्हणता येईल? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) काँग्रेसला वाटले तर राष्ट्रवादावरसविस्तर चर्चा सुरू होऊ शकतेभारतीय राष्ट्रवाद हा आपल्या इतिहास, स्वातंत्र्यलढा आणि संविधानाबद्दलच्या सामायिकभावनांतून निर्माण झाला आहे. भाजपने याचेहिंदूकरण केले आहे. या मुद्द्यावर काँग्रेस चर्चाघडवून आणू शकते. मात्र, जर तिने आपले सध्याचेधोरण सुरू ठेवले, तर कुणीही त्यावर विश्वासठेवणार नाही.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
- पुणे: एमपीएससी पेपर लीक प्रकरण विद्यार्थ्यांचा संताप अनावर, अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी करत पुण्यात भव्य मोर्चाचा इशारा!
- पुणे: दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट! जुन्या सांगवीत लोखंडी कमान आणि डीजेचा सांगाडा अंगावर कोसळून ४५ वर्षीय महिलेचा करुण अंत!
महाराष्ट्र
- सांगली: जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम! आता विकासकामांसाठी लोकांकडूनही गोळा केल्या जाणार देणग्या
- मुंबई: दहीहंडी उत्सवात मोठी दुर्घटना! मालाडमध्ये विटांचा खांब अंगावर कोसळून ७ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू
- जालना: मराठा आरक्षणावरून मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर आणि दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे स्पष्टीकरण
- पुणे: छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळ: जागाबदलाच्या तांत्रिक अहवालामुळे पुण्यात मोठा वादंग निर्माण!
गुन्हा
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
- कोल्हापूर: कौटुंबिक प्रेमप्रकरणाच्या रागातून १७ वर्षीय तरुणाचा इन्स्टाग्रामवरून बोलावून निर्घृण खून, मृतदेह दरीत फेकत पोलिसांची दिशाभूल!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला
- केरळ: हायवेवर उभ्या असलेल्या लॉरीला कार धडकल्याने इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा करुण अंत!



























Subscribe to my channel




