पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नारदांकडून शापाचेही वरदानात रूपांतर करण्याची कला शिका

भाषा आणि वर्तनात काही शब्द आपला मूळ स्वर, स्वभाव आणि अर्थ गमावून बसतात. आज विनाकारण भटकणाऱ्या माणसाला आवारा समजले जाते. हळूहळू तर हा शब्द शिवीच बनला आहे. प्रत्यक्षात आवारा या शब्दाचा एक अर्थ फक्कड असाही आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. परंतु काही चुकीच्या आचरणाच्या लोकांशी हा शब्द जोडला गेला आणि त्याचा अर्थच बदलला. आपल्या शास्त्रांमध्ये नारदजी हे एक चरित्र आहे. त्यांचे नाव घेताच लोक समजतात की इकडची बातमी तिकडे पोहोचवणारे, भडकावणारे नारदजी आहेत. पण खरे तर नारदजी भांडण लावणारे व्यक्तिमत्त्व नाहीत; ते एक टाइमकीपर आहेत. परमात्म्याने लवकर अवतार घ्यावा आणि आपले उद्दिष्ट पूर्ण करावे, यासाठीच ते एका व्यक्तीची गोष्ट दुसऱ्याला सांगतात. त्यांचे एक फार मोठे वैशिष्ट्य असे आहे की त्यांना एक शाप मिळाला होता. दक्ष राजाने म्हटले होते की, तू एका ठिकाणी स्थिर राहणार नाहीस. नारदांनी त्या अस्थिरतेचेच वरदान करून घेतले. एखादा माणूस भरकटला असेल, तर त्याला योग्य मार्गावर आणा; त्याला आवारा म्हणून नाकारू नका.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *