पुणे, दि. ८ ऑक्टोबर २०२६: पुण्यातील हडपसर परिसरातील प्रसिद्ध ‘श्री गणेश मोबाईल शॉपी’ मधून सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे महागडे मोबाईल लांबवणाऱ्या एका अट्टल चोराला हडपसर पोलिसांनी अत्यंत धडाकेबाज कारवाई करत थेट अमरावती जिल्ह्यातून अटक केली आहे. संकेत रामराव राठोड (वय २८ वर्ष, रा. मु. वाकज पो. काळी, ता. महागाव, जि. यवतमाळ) असे या अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि घटना: पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी अमित रवींद्र भोंगळे (रा. कामठे मळा, फुरसुंगी, पुणे) यांचे हडपसर येथे ‘श्री गणेश मोबाईल शॉपी’ नावाचे मोबाईलचे दुकान आहे. गत २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:५५ वाजण्याच्या सुमारास आरोपी संकेत राठोड हा दुकानात आला. त्याने दुकानात कामावर राहण्याच्या बहाण्याने गोड बोलून प्रवेश मिळवला. काही वेळ दुकानात रेकी केल्यानंतर, दुकानात कोणीही नसल्याची संधी साधून आणि मालकाचे लक्ष नसताना त्याने दुकानातील सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे महागडे सॅमसंग कंपनीचे मोबाईल चोरले आणि तेथून पोबारा केला.
या अचानक घडलेल्या प्रकारामुळे दुकान मालकाने तात्काळ हडपसर पोलीस ठाण्यात येऊन चोरीची फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करून तपासाची चक्र वेगाने फिरवली.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे अमरावतीत आवळले मुसक्या: गुन्हा दाखल झाल्यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनखाली तपास पथकातील पोलीस उप-निरीक्षक शुभम शिंदे व त्यांच्या पथकाने तपासाची तांत्रिक बाजू मजबूत केली. आरोपीने गुन्ह्यानंतर त्याचा मोबाईल फोन बंद ठेवला होता, त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु, पोलिसांनी हार न मानता उपलब्ध तांत्रिक विश्लेषणाचा (Technical Analysis) कसून वापर केला.
तपासादरम्यान आरोपी संकेत राठोड हा अमरावती जिल्ह्यात लपून बसल्याची पक्की माहिती पोलिसांच्या हाती लागली. माहिती मिळताच हडपसर पोलिसांचे एक विशेष पथक तातडीने अमरावतीसाठी रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपी संकेत राठोड हा त्याच्या सासुरवाडीत लपून बसल्याचे निष्पन्न करून त्याला जेरबंद केले. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवताच त्याने गुन्ह्याची संपूर्ण कबुली दिली.
कर्जबाजारीपणामुळे उचलले पाऊल: चौकशीदरम्यान आरोपीने सांगितले की, तो मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला होता. डोक्यावर झालेल्या कर्जाचा डोंगर आणि तात्काळ पैशांची निकड भासल्यामुळेच त्याने कामावर लागण्याच्या बहाण्याने मोबाईल चोऱ्या करण्याचा हा मार्ग निवडला होता. हडपसर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण ७५,०००/- रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा माल हस्तगत केला असून जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास हडपसर पोलीस करत आहेत.
शहर
- मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- पुणे: पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा वानवा; महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील आरोग्य केंद्रच पडले 'आजारी'!
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
महाराष्ट्र
- मुंबई: सर्वांना समान संधी देणारे तंत्रज्ञान विकसित करून वाहन धोरण राबवा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न
- मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- नांदेड: शरद पवारांचा एक कॉल अन् फिरला निकाल! मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामागील रंजक रणनीती
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!



























Subscribe to my channel




