नागपूर: नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जिथे मुले ज्ञानाचे धडे गिरवतात, त्याच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील तब्बल ५८८ वर्गखोल्या अतिशय धोकादायक आणि जीर्ण स्थितीत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो विद्यार्थ्यांचा जीव मुठीत धरून या मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये शिक्षण घेण्याची वेळ आली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नागपूर जिल्हा परिषदेच्या एकूण १५१२ शाळा असून या शाळांमध्ये सुमारे ७२,००० विद्यार्थी आपले शिक्षण घेत आहेत. परंतु, यातील ५८८ शाळांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात या शाळांमधून पाण्याची गळती होणे, भिंतींना ओल येणे, आणि छताचे स्लॅब किंवा कौले कोसळण्याचा मोठा धोका सातत्याने कायम असतो. अनेक ठिकाणी शाळांचे छत किंवा भिंत कोसळण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत, तरीही प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून विचारला जात आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आणि अनास्था: शाळांची ही दुरवस्था केवळ वर्गखोल्यांपुरती मर्यादित नाही. जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये विद्युतीकरण व्यवस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांना विजेच्या धक्क्याचा (Electric Shock) धोका नेहमीच असतो. याशिवाय, अनेक शाळांना सुरक्षेसाठी संरक्षण भिंत (Compound Wall) नाही, ज्यामुळे वर्दळीच्या रस्त्यांवरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे किंवा परिसरातील जनावरांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न बिकट बनला आहे. दुसरीकडे, विद्यार्थ्यांच्या नावाखाली शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे साहित्य खरेदी केले जाते, परंतु ते अनेकदा वापराशिवाय धूळखात पडलेले असते. मग जीर्ण झालेल्या आणि धोकादायक शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी का उपलब्ध होत नाही, असा थेट सवाल संतप्त पालकांकडून केला जात आहे.
धोकादायक व आवश्यक आकडेवारी एका नजरेत:
-
धोकादायक वर्गखोल्या: ५८८
-
आवश्यक नव्या वर्गखोल्या: १९०
-
मोठ्या दुरुस्तीची गरज असलेल्या वर्गखोल्या: १०९
-
आवश्यक किचन शेड: १०९
-
योग्य विद्युतीकरण नसलेल्या शाळा: १३४
-
संरक्षण भिंत नसलेल्या शाळा: ६६३
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि बांधकाम विभागाने ताраड S.T. ऑडिट (स्ट्रक्चरल ऑडिट) करून त्वरित ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. जर लवकरात लवकर जीर्ण शाळांची दुरुस्ती व नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम हाती घेतले नाही, तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
शहर
- मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- पुणे: पायाभूत सुविधा आणि सुरक्षेचा वानवा; महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरीतील आरोग्य केंद्रच पडले 'आजारी'!
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
महाराष्ट्र
- मुंबई: सर्वांना समान संधी देणारे तंत्रज्ञान विकसित करून वाहन धोरण राबवा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक संपन्न
- मुंबई: ठाण्यात मोठी राजकीय घडामोड! प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या वादात शिवसेना महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदेंचा पदाचा राजीनामा
- पुणे: नागपूरच्या पराभवाची जबाबदारी माझीच...मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी कबुली, काँग्रेस नेते रवींद्र धंगेकरांनाही सुनावले
- नांदेड: शरद पवारांचा एक कॉल अन् फिरला निकाल! मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयामागील रंजक रणनीती
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!



























Subscribe to my channel




