महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातील आणि जगभरातील मराठी बांधवांना मनापासून शुभेच्छा. आज कामगार दिनसुद्धा आहे. सर्व कामगार बंधू, भगिनींनाही मन:पूर्वक शुभेच्छा. महाराष्ट्र केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेले राज्य नाही. महाराष्ट्र म्हणजे इतिहास, भूगोल आणि संस्कृतीचा समुच्चय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेली स्वराज्याची प्रेरणा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेला न्याय आणि प्रज्ञेचा पाया, संतांच्या अभंगवाणीचा दिव्य वारसा, महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पेटवलेली शिक्षण, समतेची मशाल, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी जागवलेली राष्ट्रभावना, देशासाठी अनन्यसाधारण यातना सहन करण्याची ताकद देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्यांच्या विचारांचा एकत्रित संगम म्हणजे महाराष्ट्र. केवळ भौगोलिक रचनेत महाराष्ट्र व्यक्त होत नाही तर महाराष्ट्र धर्मातून महाराष्ट्र प्रकट होतो. सर्वांवर हा महाराष्ट्र धर्म जगभर वर्धिष्णू करण्याची जबाबदारी आहे. यंदाचा महाराष्ट्र दिन विशेष आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या 200 व्या जयंतीचे हे वर्ष आहे, संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीचे वर्ष आहे. चवदार तळ्याच्या ऐतिहासिक लढ्याचे शताब्दी वर्ष आहे. हे वर्ष आपण समता,सामाजिक समरसता वर्ष म्हणून साजरे करतो आहोत. आज जग आखाती देशांतील संघर्षाची झळ सोसत आहे. त्याच वेळी आपले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी, पर्यायी तेल स्रोतांसाठी व सौर ऊर्जेच्या विस्तारासाठी केलेल्या कामांमुळे अन्य देशांना ज्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले तसे भारतात झाले नाही. महाराष्ट्राची जगातील 30 वी अर्थव्यवस्था म्हणून झेप जगात कितीही आव्हाने असताना महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे. महाराष्ट्र देशाच्या जीडीपीमध्ये 13.5 टक्क्यांहून अधिक योगदान देत आहे. 2024-25 मध्ये महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली. हे प्रमाण देशातील एकूण एफडीएच्या 39 टक्के इतके आहे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्राने 30 लाख कोटींचे सामंजस्य करार केले.यातून 40 लाख रोजगार निर्माण होतील. जगात आर्थिक समस्या असताना महाराष्ट्राने जगातील 30 वी अर्थव्यवस्था म्हणून झेप घेतली आहे. हेच आपल्या राज्याचे सामर्थ्य आहे. हा विकास समतोल असावा. म्हणूनच गडचिरोली, धुळे, नंदुरबार अशी शहरेही गुंतवणुकीच्या नकाशावर आली आहेत. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामांना गती या वर्षी एल निनो परिस्थितीमुळे 2026 च्या हंगामातील पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आपला खरीप हंगाम पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे हा अंदाज गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. पेरणीची घाई करू नका. कृषी विभागाकडून येणाऱ्या प्रत्येक सूचनांकडे लक्ष द्या. त्यातून या संकटापासून बचाव करणे सोपे जाईल. त्याच वेळी मला शेतकरी बांधवांना आश्वस्त करायचे आहे की, राज्य शासन म्हणून आम्ही आधीपासूनच पाणी, चारा याचे नियोजन प्रारंभ केले आहे. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवारच्या कामांना गती देण्यास तसेच त्यासाठी प्राधान्याने निधी देण्यास सांगण्यात आले आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांचा जास्तीत जास्त वापर करा. पाण्याची बचत हे तसेही आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. राज्यात खते आणि बियाण्यांची कोणतीही कमतरता नाही. लिंकिंग करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. घाबरण्याचे काम नाही. राज्य शासन तुमच्यासोबत आहे. शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना गेल्या वर्षी पूर आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर 15,576 कोटी रुपये जमा केले गेले. शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आपण जाहीर केली आहेच. शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे, आता सौरऊर्जेचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नैसर्गिक कितीही संकटे आली तरी महाराष्ट्राच्या विकासाचा रथ थांबणार नाही. विकसित महाराष्ट्राचा आराखडा आपण तयार केला आहे. महाराष्ट्राला 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे स्वप्न आणि त्या दिशेने आपण आत्तापासूनच काम सुरू केले आहे वाढवण येथे चौथे मुंबई बंदर विकसित केले जाणार महाराष्ट्र आज देशातच नाही, जगातही पायाभूत सुविधांच्या निर्मितीत आघाडीवर आहे. सध्या मुंबई, पुणे व नागपूरमध्ये 173 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका कार्यरत आहेत. दरवर्षी 50 किमीची मेट्रो सेवेत येईल, असे नियोजन आहे. समृद्धीच्या साथीला शक्तिपीठ येतो आहे. वाढवण येथे चौथे मुंबई बंदर विकसित केले जाणार आहे. ते जगातील ‘टॉप टेन’ पैकी असेल. आज महाराष्ट्रदिनी मला अत्यंत आनंदाची बातमी सांगायची आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील 13.3 किमीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आज जनतेसाठी खुला होत आहे. यामुळे दोन शहरांमधील अंतर सुमारे 6 किमीने आणि प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे. आमच्यासाठी विकास केवळ रस्ते आणि मेट्रोपुरता नाही, तर विकास म्हणजे प्रत्येक माणसाचे जीवन उंचावणे हा आहे. लखपती दीदींची संख्या या वर्षी 50 लाखांपर्यंत नेण्याचे नियोजन 40 लाखांहून अधिक महिला आता ‘लखपती दीदी’ झाल्या आहेत. उमेद अभियानांतर्गत 64 लाखांहून अधिक कुटुंबांना बँक कर्ज उपलब्ध करून दिले आहे. लखपती दीदींची संख्या या वर्षी 50 लाखांपर्यंत नेण्याचे नियोजन आहे. लाडकी बहीण योजनेतून आमच्या बहिणींना मदत केली जाते आहे. महिला असोत की विविध समाजघटक, प्रत्येक घटकासाठी ठोस योजना आहेत. सारथी, बार्टी, महाज्योती, आर्टी, वनार्टी, अमृत अशा विविध संस्थांच्या माध्यमातून समावेशकतेची पायाभरणी केली जाते आहे. उद्योजक आणि स्टार्टअप्सना साहाय्य युवांसाठी कौशल्य प्रशिक्षणाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नवी मुंबईत आलेली सहा ख्यातिप्राप्त जागतिक विद्यापीठे असोत, आयआयटीच्या धर्तीवर आयआयसीटीसारख्या संस्था कौशल्य क्रांतीत नवी भर टाकणार आहेत. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्ससारख्या क्षेत्रात विस्तार केला आहे. महाराष्ट्राने स्टार्टअप, उद्योजकता आणि नावीन्यता धोरणाद्वारे पुढील पाच वर्षांत 1.25 लाख उद्योजक आणि 50 हजार स्टार्टअप्सना साहाय्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. युवकांसाठी स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुप्रशासनासाठी अनेक पावले उचलण्यात आली असून शासनाच्या सर्व सेवा व्हॉट्सअॅपवर देण्यासाठी मोठा पुढाकार घेण्यात आला आहे. गडचिरोली नक्षलमुक्त झाले आहे आणि पोलाद शहर म्हणून नावारूपास येण्यासाठी वेगाने पाऊले टाकते आहे. महाराष्ट्रातील 11 किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची जगाने घेतलेली ही दखल आहे. महाराष्ट्र अधिक मजबूत आहे. अधिक आत्मनिर्भर आहे. अधिक महत्त्वाकांक्षी आहे. शेतकरी, कामगार, महिला, तरुण, उद्योजक प्रत्येकासाठी या राज्य शासनाने आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 च्या स्वप्नात महाराष्ट्र सर्वात पुढे राहील, हे माझे महाराष्ट्रदिनी आपल्याला वचन आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- मुंबई: मेक्सिकन पर्यटकाला लुटणे चालकाला पडले महागात! अवघ्या २ किमी प्रवासासाठी मागितले ५०० रुपये, पर्यटकाचे अस्खलित हिंदी उत्तर ऐकून ड्रायव्हरची उडाली दांडी!
- इलॉन मस्क: भारतातील ११,२५६ गावांना स्टारलिंक जोडणार! इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागांसाठी मोठी घोषणा!
महाराष्ट्र
- पुणे: मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; ट्रॅव्हल बसची ४ वाहनांना धडक, १० जण जखमी
- नवी मुंबई: अंतराळ तंत्रज्ञानात जगाला जे जमले नाही, ते भारताने करून दाखवले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भारतीय शास्त्रज्ञांचे कौतुक
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांप्रमाणे आता मच्छिमारांनाही मिळणार कर्जमाफी? मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे तयार करणार कर्जमाफीची सविस्तर रूपरेषा!
- साखर: तब्बल १० वर्षांनंतर भारतात होणार आयात! देशांतर्गत वाढत्या किंमती रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, १० लाख टन कच्ची साखर मागवण्यास मंजुरी!
गुन्हा
- मुंबई: लोकलमध्ये संतापजनक प्रकार जागेवरून झालेल्या वादानंतर धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याने दिव्यांग वृद्धाचा मृत्यू!
- रत्नागिरी: ॲप डाउनलोड करून शुभेच्छा कार्ड तयार करणे पडले महागात; रत्नागिरीतील वृद्धाची साडेआठ लाखांची फसवणूक!
- पुणे: कोथरूडच्या एआरएआय टेकडीवर रक्ताच्या थारोळ्यात आढळला तरुणाचा मृतदेह
- नाशिक: १६ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडीदाराची प्रियकराच्या मदतीने गळा चिरून हत्या, मृतदेह थेट कसारा घाटात फेकला
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशीभविष्य: १९ ऑगस्ट २०२६, ग्रह नक्षत्रांचा तुमच्या राशीवर काय होईल परिणाम?
- आजचे राशिभविष्य १५ ऑगस्ट २०२६: शनिदेवाची कृपा, या राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ!
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: बाळासाठी सोडली कॉर्पोरेट नोकरी वाटलं करिअर संपलं, स्निग्धाने होमस्टे व्यवसायातून उभा केला २१ लाखांचा महसूल!
- हैदराबाद: भरधाव 'ॲस्टन मार्टिन' कारची धडक, इनऑर्बिट मॉलबाहेर २६ वर्षीय तरुणीचा दुःखद अंत; आंध्र प्रदेशच्या राज्यसभा खासदाराच्या मुलावर गुन्हा दाखल!
- नवी दिल्ली: "आम्ही त्यांना आजच अपात्र घोषित करू शकतो का?" शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मोठे सवाल
- चेन्नई: "ना डावे, ना CJP, कुणाच्याही आंदोलनात विद्यार्थी सहभाग नको"; तामिळनाडू सरकारच्या कठोर निर्देशाने तापले राजकारण!


























Subscribe to my channel



