कामगार चळवळींच्या गौरवासाठी राखीव दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे. दरवर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; या दिवशी भारतात आणि भारतबाह्य अनेक देशांमध्ये या निमित्ताने कामगार बंधू भगिनींचा गौरव करण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. कामगार : व्याख्या चलन मुद्रा स्वरूप, वेतन, पगार, किंवा वस्तुरूपाने मोबदला मिळवून शारीरिक वा मानसिक श्रम करणाऱ्या व्यक्तीला कामगार (Worker/Labourer) असे म्हणतात. यामध्ये कारखान्यातील मजूर, कुशल-अकुशल श्रमिक आणि नोकरदार यांचा समावेश होतो.औद्योगिक कलह अधिनियम, १९४७ नुसार, व्यवस्थापकीय काम सोडून इतर सर्व प्रकारचे काम करणारे व्यक्ती कामगार या वर्गात मोडतात. कामगार आणि श्रमाचे महत्त्व : अर्थात कामगार हे स्वतः परिश्रम पुर्वक उपजीविका करतात. खरे तर कामगाराच्या श्रमावरच संपूर्ण जग चाललेलं आहे. कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही क्षेत्रामध्ये कामगार नसल्यास कुठलेही कार्य चालण्याची कल्पना केली जाऊ शकत नाही. संपूर्ण भौतिक जग आणि त्यांच्या गरजा या कामगाराच्या परिश्रमातूनच संपूर्ण होतात. म्हणूनच कामगार हा वर्ग पण मला सर्वात महत्त्वाचा वाटतो. श्रमाचे ५ महत्त्व आहेत : १ मे: कामगार दिनाची सुरुवात : या दिवसाची सुरुवात १९ व्या शतकात अमेरिकेतील एका कामगार चळवळीतून झाली. मार्क्सवादी आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने कामगारांना ८ तासांपेक्षा जास्त काम करण्यास भाग पाडू नये, अशी मागणी करणारा एक ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून हा एक महत्त्वाचा कार्यक्रम बनला व आजही १ मे रोजी 'कामगार दिन' म्हणून साजरा केला जातो. कामगारांचे हक्क , अधिकार : कामगार वर्गात जागतिक पातळीवर आणि भारतामध्ये घटनेने काही अधिकार व हक्क दिलेले आहेत. काही हक्कांचे कामगार कायद्यात रूपांतर झालेले आहे. काही मूलभूत हक्क आहेत जे कामगारांच्या मानवीय गरजेनुसार निर्माण केलेले आहेत. काही ठिकाणी काम करत असताना कामगारांना हे मूलभूत हक्क सहज मिळून जातात तर काही ठिकाणी मात्र त्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. ही शोकांतिका अनेक ठिकाणी घडत असताना दिसते. कामगार विषयी अनेक कायदे आहेत, या ठिकाणी काही महत्त्वाच्या कायद्यांचे अल्प विश्लेषण केले आहे. भारतातील कामगार हक्क कायदा कामगारांचे शोषण रोखण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित कामाची परिस्थिती, रास्त वेतन व सामाजिक सुरक्षा (PF, ESI) प्रदान करण्यासाठी बनवले आहेत. हे कायदे किमान वेतन, कामाचे तास, बोनस, आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करतात. आता सरकारने अनेक कायद्यांचे एकत्रीकरण करून ४ नवीन कामगार संहिता (Labour Codes) आणल्या आहेत, ज्यामध्ये वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यावसायिक सुरक्षा यावर भर दिला आहे. कामगारांचे प्रमुख हक्क आणि संबंधित कायदे: १ : किमान वेतन: सर्वांना कायद्याने ठरवून दिलेले किमान वेतन मिळणे हा हक्क आहे. २: कामाचे तास व सुट्ट्या: कारखान्यांच्या कायद्यानुसार (Factories Act, 1948) कामाचे निश्चित तास आणि साप्ताहिक सुट्टी मिळणे आवश्यक आहे. ३: बोनस: 'पेमेंट ऑफ बोनस ॲक्ट, १९६५' नुसार कामगारांना बोनस मिळण्याचा हक्क आहे. ४: भविष्य निर्वाह निधी (PF) आणि ESI: सामाजिक सुरक्षेसाठी PF आणि आरोग्य विम्यासाठी ESI सवलती. ५: महिला कामगार: 'मॅटरनिटी बेनिफिट ॲक्ट, १९६१' नुसार गर्भवती महिलांना पगारी सुट्टी आणि इतर लाभ मिळतात ६: बालकामगार बंदी: १८ वर्षांखालील मुलांना धोकादायक कामात लावण्यास 'बाल कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६' नुसार बंदी आहे. कामगार दिनाचा इतिहास १ मे ! हा दिवस कामगारांच्या सन्मानाचा, त्यांच्या अथक कष्टांचा आणि त्यागाचा दिवस आहे. १८८६ मध्ये अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांना दिवसाचे १२ ते १६ तास काम करावे लागत असे. या अन्यायाविरुद्ध कामगार एकत्र आले आणि त्यांनी "८ तास काम, ८ तास विश्रांती आणि ८ तास मनोरंजन" या मागणीसाठी संप पुकारला. या संघर्षात अनेक कामगारांना आपला जीव गमवावा लागला. त्या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. श्रमाचा सन्मान: पृथ्वीवरील सर्व वस्तूंना स्वरूप देणाऱ्या प्रत्येक हातांचा हा गौरव आहे. कारखान्यातील कामगार असो, शेतातील शेतकरी असो, रस्ते बांधणारा मजूर असो किंवा कार्यालयात काम करणारा कर्मचारी, सर्वांच्या कष्टानेच देश घडतो. आजची परिस्थिती:
आज कामगार दिन साजरा करताना, आपण कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. सुरक्षित कामाचे वातावरण, सन्मानजनक वेतन आणि सामाजिक सुरक्षा मिळणे हा प्रत्येक कामगाराचा हक्क आहे. म्हणूनच आजच्या दिवशी श्रमिक बांधवांच्या कष्टाला सलाम.
(संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
- पुणे: शाळेत विद्यार्थिनीशी शिक्षकाचे अयोग्य वर्तन; सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत नराधम शिक्षक जेरबंद!
- पुणे: उरुळी कांचनजवळ भीषण अपघात; चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू, दोन महिला जखमी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- रत्नागिरी: चिमुकल्या आयरिशचा जागतिक विक्रम; अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांच्या बालकाने १६ मिनिटांत १०० मीटर अंतर पोहून केला विक्रम!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांच्या दुःखाची थट्टा करू नका, ५ हजारात दिवाळी कशी होणार? काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर घणाघात!
- बीड: रस्तेरविना दुर्दैवी अंत; सर्पदंश झालेल्या १२ वर्षांच्या चिमुकलीचा उपचाराअभावी वाटेतच मृत्यू!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

राजगडावर मालकाचा मृत्यू; मृतदेहासोबत गड उतरणाऱ्या मुक्या जीवाने जिंकली मनं!
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात राजेंद्र शिंदेंची ९ तास चौकशी; जबाब नोंदवून सुटका!
अनुदान आणि वीज समस्येला कंटाळून शेतकऱ्याने केळीच्या उभ्या पिकात फिरवला रोटावेटर!
देश विदेश
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?
- बिहार: वैशाली बोट दुर्घटना: १७ वर्षीय चांदणी ठरली देवदूत; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले तिघांचे प्राण, पण दुर्दैवाने १३ जणांचा मृत्यू!
- नवी दिल्ली: नीट पेपर लीक रोखण्यासाठी नंदन नीलेकणींचा मोठा मास्टर प्लॅन! परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि संगणक चाचण्यांवर भर




























Subscribe to my channel




