आज अनेक कंपन्या कठीण काळातून जात आहेत आणि नेतृत्वासाठी आपल्या लीडर्सकडे पाहत आहेत. प्रत्येक सीईओवर सर्वांचे लक्ष केंद्रित आहे. त्यांना आपल्या कंपनीचे व्हिजन आणि मिशन अधिक बळकट करावे लागेल. असे असूनही ते अपयशी ठरू शकतात. मग अपयशी ठरत असलेल्या सीईओची ओळख कशी करावी, त्यांची जागा कशी घ्यावी आणि कंपनीला संकटातून कसे बाहेर काढावे? काही काळापूर्वी माझ्या व्यावसायिक कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाच्या चर्चांपैकी एक झाली. एका कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीने अत्यंत वरिष्ठ स्तरावरील एका एक्झिक्युटिव्हची नियुक्ती केली होती. जवळपास वर्षभरानंतर त्यांना लक्षात आले की ते या पदासाठी योग्य नाहीत. भरती प्रक्रियेत त्यांच्याकडून कुठे चूक झाली? त्यांची रिक्रूटमेंट स्ट्रॅटेजीच चुकीची होती का? खाली दिलेल्या मुद्द्यांवर आपल्या बोर्ड आणि वरिष्ठ व्यवस्थापन टीमसोबत चर्चा करा. आपली कंपनीही यापैकी एखाद्या श्रेणीत येऊ शकते, हे मान्य करा. त्यानंतर त्यानुसार आवश्यक बदल करा. सीईओची नियुक्ती करताना बोर्डकडून होणारी सर्वांत मोठी चूक म्हणजे ते चुकीच्या व्यक्तीची नियुक्ती करतात. पूर्णविराम! त्यांनी दुसऱ्या कोणाची तरी नियुक्ती करायला हवी होती. या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. तुम्ही चुकीच्या व्यक्तीची नियुक्ती केली, कारण तुम्हाला नेमक्या कोणत्या प्रकारच्या व्यक्तीची गरज आहे हे तुम्ही स्पष्ट आणि अचूक शब्दांत परिभाषित केले नव्हते. तुमच्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये गरजेपेक्षा जास्त निकष आणि अनेक प्रकारचे सर्वसाधारण शब्द समाविष्ट होते. प्रत्येक सीईओमध्ये प्रामाणिकपणा, नैतिक मूल्ये आणि मजबूत कार्यनिष्ठा असायलाच हवी. या गुणांबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही. मात्र, त्यांचा जॉब डिस्क्रिप्शनमध्ये समावेश करण्याचे कोणतेही औचित्य नाही. चांगला सीईओ तो असतो, ज्याच्याकडे विशिष्ट कौशल्ये, अनुभव आणि असे व्यक्तिमत्त्व असते, जे संस्थेसाठी मूल्यवर्धक ठरते. तो कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन संस्थेला खरोखर कशाची गरज आहे हे समजू शकतो. तसेच, तो आपले म्हणणे अशा प्रकारे मांडू शकतो की ते बोर्डाच्या आदर्शांशी आणि मूल्यांशी सुसंगत असेल. मुलाखतीदरम्यान तुमची भेट वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांच्या अनेक उमेदवारांशी होईल. प्रत्येक उमेदवाराच्या अनुभवाची सखोल माहिती घ्या. त्याच्या मागील अनुभवातून मिळालेली कोणती कौशल्ये तुमच्या कंपनीसाठी उपयुक्त ठरू शकतात, हे समजून घ्या. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या (सीईओ) कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी काही निकष निश्चित करा. पहिल्या वर्षात त्याच्याकडून काय अपेक्षित असेल आणि त्याने कोणते परिणाम साध्य करणे आवश्यक असेल, हेही आधीच ठरवून त्याला स्पष्टपणे सांगा. ही उद्दिष्टे विशिष्ट, अचूक, अल्पकालीन आणि ठोस असावीत. सीईओला ही अल्पकालीन उद्दिष्टे साध्य करण्याची क्षमता असल्याचे सिद्ध करावे लागेल. तसे न झाल्यास वरिष्ठ व्यवस्थापन संघातील इतर सदस्य त्याचा आदर करणार नाहीत. सीईओच्या मागील अनुभवाचाही लाभ घ्या. त्या अनुभवाशी संबंधित कौशल्यांचा आपल्या मूल्यमापनाच्या निकषांमध्ये समावेश करा आणि कामाच्या नव्या वातावरणात तो कशी कामगिरी करतो, हे पाहा. समस्या जितक्या लवकर ओळखाल, तितकेच चांगले. खराब कामगिरीचा अर्थ सीईओला तात्काळ बडतर्फ केले पाहिजे, असा होत नाही. सुरुवातीच्या टप्प्यातच त्याच्यासोबत काम करा, पुढे तो समस्यांमध्ये इतका अडकण्यापूर्वी की त्याला मदत करणेही कठीण होऊन बसेल. आज व्यवसायाच्या जगात आपण अनेक प्रकारचे प्रचलित शब्द वापरतो. ‘भूमिका’ आणि ‘जबाबदारी’ हेही असेच शब्द आहेत, जे प्रत्येक नोकरीच्या अर्जात दिसून येतील. पण तुमच्या पुढील सीईओप्रमाणेच, या शब्दांनाही तुमच्या संस्थेच्या गरजांनुसार घडवावे लागेल. जर तुम्ही नियुक्तीची प्रक्रिया याच विचाराने पुढे नेली, तर उमेदवारांच्या समूहातून योग्य व्यक्ती उठून दिसेल. आणि त्या व्यक्तीकडे तुमच्या कंपनीला कठीण काळातून बाहेर काढून पुढे नेण्यासाठी आवश्यक क्षमता असतील. सीईओची नियुक्ती करताना संचालक मंडळाकडून होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे चुकीच्या व्यक्तीची नियुक्ती करणे. आणि असे यासाठी होते की, त्यांना नेमकी कोणत्या प्रकारची व्यक्ती हवी आहे, हे ते स्पष्ट आणि अचूक शब्दांत ठरवत नाहीत.
(हे लेखकाचे स्वतःचे विचार आहेत)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- नाशिक: लुटणाऱ्यांनाच तुम्ही निवडून देता, तुमचे रक्त का खवळत नाही; खड्डे, दूषित पाणी आणि वृक्षतोडीवरून सुजात आंबेडकरांचा संताप
- ठाणे: शहापुरात संतापजनक घटना: ओळखीच्या तरुणाचे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोटदुखीतून धक्कादायक प्रकार उघड
महाराष्ट्र
- कोल्हापूर: महिन्याला २६ कोटींहून अधिक उलाढालीची झेप! गोकुळच्या दूध दरवाढीच्या निर्णयावेळी चार अशासकीय सदस्य अनुपस्थित
- पुणे: बोर्ड तोडूनच दाखवा! लक्ष्मी रस्त्यावरील कारवाईवरून फत्तेचंद रांका आक्रमक; महापालिका अधिकाऱ्यांशी जोरदार बाचाबाची
- नागपूर: कायदा फक्त विरोधकांसाठीच का? महेश बालगींच्या शिक्षेवरून आणि जंगलतोडीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारला खडा सवाल
- महाराष्ट्र: लोकसहभागातून जलसंधारणाला वेग; चार गावांत वनराई बंधाऱ्यांची उभारणी
गुन्हा
- नाशिक: निवृत्त आरटीओ अधिकारी हेमंत हेमाडे यांची राहत्या घरात गोळी झाडून आत्महत्या
- जळगाव: गावी परतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत लग्नातील वादातून २१ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून; १५ संशयित पोलिसांच्या ताब्यात
- रत्नागिरी: चिपळूणमध्ये खळबळ! रात्री घरातून बाहेर पडलेल्या सांगलीच्या तरुणाची दगडाने ठेचून हत्या, वालोपे परिसरात आढळला मृतदेह"
- गोंदिया: उदमांजर शिकारप्रकरणी सहा जण जेरबंद; गोंदिया वनविभागाची धडक कारवाई, कामठा परिसरातील घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १७ नोव्हेंबर २०२६: सूर्य आणि मंगळ करणार राजयोग निर्माण, या राशींचे नशीब फळफळणार!
- आजचे राशिभविष्य १४ नोव्हेंबर २०२६: बुधादित्य योग आणि शनिकृपेमुळे या राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगते तुमचे भविष्य!
- आजचे राशिभविष्य १३ नोव्हेंबर २०२६: जाणून घ्या तुमचे आजचे ग्रहमान आणि भविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ नोव्हेंबर २०२६: गुरु बनवणार पॉवरफुल योगाचा संयोग, या राशींच्या हातात खेळणार पैसा!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: युधिष्ठिर सेतूवर भरधाव एसयूव्हीची ऑटोला धडक; पळण्याच्या नादात सहा जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू
- नवी दिल्ली: ५० वर्षांहून जुनी इमारत कोसळल्याने चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू; मी १० वर्षांपूर्वीच घर सोडण्याचा सल्ला दिला होता, म्हणत मामाला अनावर झाले अश्रू!
- गोवा: लोकशाहीच्या रक्षणासाठी भाजपने पणजीत काढली 'लोकशाही बचाव' पदयात्रा!
- उत्तर प्रदेश: लग्नापूर्वीच तिरंग्यात परतला अलीगढ़चा शिपाई; नायक करन चौधरी यांच्या अंगावर काटा आणणारी बलिदान गाथा


























Subscribe to my channel




