9 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

नीटची पुनर्परीक्षा पहिल्या अपयशानंतर अडचणीशिवाय पार पडली. मात्र भारतातील परीक्षा व्यवस्थेचे संकट केवळ पेपरफुटीपुरते मर्यादित नाही.त्याकडे व्यवस्थात्मक अपयश म्हणून पाहण्याची गरजआहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) 12 मे रोजीनीट-यूजी परीक्षा रद्द केली होती. त्याआधी काहीदिवसांपूर्वीच 22.7 लाख उमेदवारांनी ती परीक्षा दिलीहोती. दोन वर्षांत अशी घटना दुसऱ्यांदा घडली. काहीवेळा परीक्षा रद्द करणे अपरिहार्य असते. पण त्याचाफटका नियम पाळणाऱ्या विद्यार्थ्यांनाच बसतो.
आजही भारत जगातील सर्वात मोठ्या आणिमहत्त्वाच्या परीक्षा अशा व्यवस्थेद्वारे घेण्याचा प्रयत्नकरत आहे. ती सध्याचे प्रमाण, गुंतागुंत व आव्हानांनुसार अद्ययावत झालेली नाही. ही समस्या केवळ तात्पुरत्या देखरेखीच्या उपायांनी सुटणारी नाही. भारतामध्येएवढ्या परीक्षा घेतल्या जातात, त्याबाबतीत जगातदुसरे उदाहरण नाही. 2018 ते 2023 या काळात एनटीएने 244 परीक्षा घेतल्या. या कालावधीत उमेदवारांचीसंख्या सुमारे 67 लाखांवरून 1.22 कोटींवर पोहोचली. केवळ नीट परीक्षेतच एका वेळी 22 ते 24 लाखविद्यार्थी सहभागी होतात. 2024 मध्ये चीनच्यागाओकाओ परीक्षेसाठी 1.34 कोटी नोंदणीकृतउमेदवार होते, तर दक्षिण कोरियाच्या सीएसएटीपरीक्षेसाठी 2026 मध्ये सुमारे 5.54 लाख अर्जदार होते.भारतातील नीट परीक्षा गाओकाओपेक्षा लहान असली,तरी कोरियाच्या एकमेव राष्ट्रीय परीक्षेपेक्षा खूप मोठीआहे. शिवाय चीन किंवा कोरियाप्रमाणे भारतात दरवर्षीफक्त एकच केंद्रीय परीक्षा घेतली जात नाही. आपलीपरीक्षा व्यवस्था सातत्याने चालणारी, संघराज्यीय,बहुभाषिक आणि व्यापक स्वरूपाची आहे.
म्हणूनच चीन किंवा कोरियाचे मॉडेल भारतात तंतोतंतलागू होऊ शकत नाही. तेथे संपूर्ण सरकारी यंत्रणा एकानिर्णायक परीक्षेभोवती उभी राहू शकते; भारतात मात्रवर्षातून अनेकदा संपूर्ण व्यवस्था परीक्षा सुरक्षेसाठीवळवणे शक्य नाही. भारतीय परिस्थितीनुसार मजबूत,विभागीय पातळीवर कार्यक्षम, तंत्रज्ञानाधारित आणिमानकांमध्ये केंद्रीकृत अशी नवी प्रणाली आवश्यकआहे. 2024 मधील वादांनंतर डॉ. के. राधाकृष्णनयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या उच्चस्तरीयसमितीने हाच मुद्दा अधोरेखित केला. एनटीएमार्फतपरीक्षा अधिक पारदर्शक, सुरळीत आणि निष्पक्षपणेघेण्यासाठी व्यापक सुधारणांचा आराखडा समितीनेसुचवला. संदेश स्पष्ट होता—देशाला परीक्षांसाठीनव्या व्यवस्थेची गरज आहे. पहिली सुधारणासंस्थात्मक पातळीवर व्हायला हवी. तंत्रज्ञान कमकुवतसंस्थेची भरपाई करू शकत नाही; ते जास्तीत जास्ततिच्या उणिवांना डिजिटल स्वरूप देऊ शकते.एनटीएला सायकोमेट्रिक्स, सायबर सुरक्षा,लॉजिस्टिक्स, डेटा विश्लेषण, प्रश्नपत्रिका निर्मिती,विक्रेता व्यवस्थापन आणि कायदा अंमलबजावणीयांसारख्या क्षेत्रांत मजबूत अंतर्गत क्षमता असलेलीकायमस्वरूपी, व्यावसायिक आणि ध्येयाधारितमूल्यांकन संस्था बनवणे आवश्यक आहे. खासगीपुरवठादार, तात्पुरते निरीक्षक आणि बाह्य यंत्रणांवरमोठ्या प्रमाणात अवलंबून असलेली मर्यादित क्षमताअसलेली संस्था देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षांचाभार पेलू शकत नाही. दुसरी सुधारणा प्रश्नपत्रिका तयारकरण्याच्या प्रक्रियेत व्हायला हवी. कोणत्याही व्यक्तीनेपूर्णपणे पाहिलेली नसते. तीच सर्वात सुरक्षितप्रश्नपत्रिका असते. याच कारणामुळे यूपीएससी आणिजेईई अॅडव्हान्स्ड परीक्षांमध्ये मोठी व गोपनीय तज्ज्ञमंडळे, टप्प्याटप्प्याने विभागलेली प्रक्रिया, अनेकसमांतर प्रश्नसंच, खासगी मध्यस्थांना अत्यल्प प्रवेशयांसारख्या उपाययोजना प्रभावी ठरतात. त्यामुळे एखादीकडी तुटली तरी संपूर्ण परीक्षा धोक्यात येत नाही. तिसरीसुधारणा तांत्रिक असावी.राधाकृष्णन समितीनेसुचविल्याप्रमाणे 1 हजार केंद्रीय विद्यालये व इतरविश्वासार्ह सार्वजनिक संस्थांना सुरक्षित परीक्षा केंद्रेम्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव अमलात आणलापाहिजे. ओळख पडताळणी आणि देखरेख यंत्रणाहीअधिक मजबूत करावी लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचावापर न्यायवैज्ञानिक तपासासाठीही केला जाऊ शकतो. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)

एखाद्या विद्यार्थ्याचे भविष्य एकासकाळी होणाऱ्या एका परीक्षेवरअवलंबून असू शकत नाही. बहुपदरीपरीक्षा, अधिक संधी, प्रमाणित गुणांकनव पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्थाआवश्यक आहे. एका प्रश्नपत्रिकेचेकाळ्या बाजारातील मूल्य कमी करूनसंपूर्ण परीक्षा व्यवस्था अधिक सक्षमबनवू शकतो.

शहर
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- नागपूर: 'स्वयम्' योजनेचा मोठा दिलासा! आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट २०० कोटी; शिक्षणाला मिळाले नवे बळ
- अमरावती: उत्पन्न दाखल्यांसाठी नागरिकांची दमछाक; सेतू केंद्रांचा सर्व्हर डाऊन आणि तलाठ्यांच्या अनुपस्थितीमुळे कामांचा खोळंबा
- हिंगोली: जनावरे घरी परतली, पण दोन जिवलग मित्र कायमचे हरवले, कायाधू नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
- सातारा: आदरकी फाटा येथील 'वैद्यनाथ ऑईल स्टोअर'मध्ये १२.७४ लाखांची अफरातफर; बहीण-भावावर गुन्हा दाखल
गुन्हा
- महाराष्ट्र: 'कलम १५५'चा गैरवापर केल्याप्रकरणी १५ अधिकारी निलंबित; जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई.
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- ई-२० (E20) पेट्रोलबाबत केंद्र सरकारची झोप उडवणारा सर्व्हे; मायलेजमधील घट आणि इंजिन खराब होण्याच्या भीतीने जनता चिंतेत, एनडीए समर्थकही विरोधात
- हरमुझ सामुद्रधुनीत इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; भारतीय नाविक ठार, भारताने इराणच्या राजदूताला बजावले समन्स
- सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! आसाममधील २७ जणांना 'परदेशी' ठरवणारे उच्च न्यायालयाचे निर्णय रद्द; नागरिकत्वाचा निर्णय निष्पक्ष प्रक्रियेने घेण्याचे आदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

























Subscribe to my channel




