अनेक दशकांपासून इस्रो हे देशाच्या वैज्ञानिक प्रतिष्ठेचा आधार राहिले आहे. मंगळ यानाच्या माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत हा पहिला देश ठरला, तर चांद्रयान-३ द्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवण्याचा ऐतिहासिक विक्रमही भारताने प्रस्थापित केला. हे सर्व इतक्या कमी बजेटमध्ये साध्य करण्यात आले, जेवढ्या खर्चात हॉलीवूडच्या एखाद्या अंतराळपटाच्या प्रसिद्धीचा खर्चही निघणे कठीण असते.मात्र, गेल्या एका वर्षात इस्रोच्या गौरवशाली कामगिरीवर तीन प्रमुख मोहिमांच्या अपयशाची सावली पडली आहे, ज्यामध्ये पीएसएलव्हीच्या सलग दोन अयशस्वी प्रक्षेपणांचा समावेश आहे. ‘किफायती नवोन्मेष’ आणि ‘अढळ विश्वासार्हता’ या दोन स्तंभांवर उभ्या असलेल्या कार्यक्रमासाठी हा केवळ तांत्रिक धक्का नाही, तर तो प्रतिमेचाही प्रश्न आहे. पीएसएलव्ही गेल्या ३० वर्षांपासून भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा मुख्य आधार राहिले आहे. याच रॉकेटने भारताला चंद्र आणि मंगळापर्यंत पोहोचवले आणि जवळपास ४०० परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करून जागतिक स्तरावर भारताला एक ओळख मिळवून दिली. पण अलीकडेच पीएसएलव्ही-सी ६१ (मे २०२५) आणि पीएसएलव्ही-सी ६२ (जानेवारी२०२६) या मोहिमांदरम्यान तिसऱ्या टप्प्यात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे पृथ्वी निरीक्षण आणि सामरिक महत्त्वाच्या उपग्रहांचे नुकसान झाले आहे. या दुर्घटना इस्रो आणि त्यांच्या मूळ उद्देशांमधील वाढते अंतर दर्शवतात. सुरुवातीच्या काळात भारताचा अंतराळ कार्यक्रम जनतेच्या गरजांवर आधारित होता. उपग्रह तंत्रज्ञानाला विकासाचे साधन बनवले, तर ते लोकांचे जीवन बदलू शकते, अर्थव्यवस्थेला बळ देऊ शकते आणि जगात भारताची स्थिती नव्याने परिभाषित करू शकते, असात्यामागील विचार होता. इस्रोने हे स्वप्न सत्यात उतरवले. त्यांनी उपग्रहांची एक भक्कम यंत्रणा विकसित केली, जी लाखो लोकांसाठी जीवनवाहिनी ठरली. भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली आणि त्यानंतरच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट मालिकेमुळे दुर्गम गावांपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचली. यामुळे वंचित लोकांसाठी टेलिमेडिसिन शक्य झाले आणि त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले, जे एरवी मागे राहिले असते.पंजाब आणि तामिळनाडूच्या शेतात शेतकरी‘रिसोर्ससॅट’सारख्या उपग्रहांच्या माहितीचा वापरपिकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि जलव्यवस्थापनासाठी करतात. चक्रीवादळाच्या काळात इस्रोच्या उपग्रहांकडून मिळणाऱ्या पूर्वसूचनांमुळे संवेदनशील भागातील लोकांना वेळेत सुरक्षित स्थळी हलवणे शक्य होते आणि लोकांचे प्राण वाचतात. मात्र, अलीकडील घटना असे संकेत देतात की, इस्रोची वाढती महत्त्वाकांक्षा आता गुणवत्ता नियंत्रण आणि पुरवठासाखळीवर ताण निर्माण करत आहे. समस्या संसाधनांचीही आहे. ज्या मर्यादित बजेटमध्ये भारताने आपली मागील यशाची शिखरे गाठली, तोच आता भारतासाठी सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. आज भारत अंतराळ क्षेत्रावर दरवर्षी सुमारे २ अब्ज डॉलर्स खर्च करतो, तर चीनचा खर्च १६ अब्ज डॉलर्स आणि अमेरिकेचा खर्च २५ अब्ज डॉलर्स आहे. सध्या भारत २१ सक्रिय निरीक्षण उपग्रह चालवत आहे, तर चीन १,००० हून अधिक उपग्रहांचे संचालन करत आहे, ज्यापैकी २५० उपग्रह केवळ संरक्षणासाठी समर्पित आहेत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, भारताचा अंतराळ कार्यक्रम ही चैनीची गोष्ट नाही तर ते आपल्या विकासाचे एक महत्त्वाचे साधन, नवोन्मेषाचा केंद्रबिंदू, सुरक्षेचा स्तंभ आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत आहे. सुदैवाने इस्रोनेयापूर्वीही अनेक आव्हानांवर मात केली आहे आणि त्यांच्या तांत्रिक क्षमतांबद्दल कोणतीही शंका नाही.(@प्रोजेक्ट सिंडिकेट) अंतराळ क्षेत्र केवळ वैज्ञानिक कुतूहलाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय सुरक्षेचे एक धोरणात्मक क्षेत्र बनत आहे. संसाधनांच्या टंचाईकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. यादिशेने आपल्याला धोरणात्मक पुनर्रचनाकरणे आवश्यक आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

मुंबई: शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांचे आंदोलन
मुंबई: शिवाजी पार्कमधील आंदोलनादरम्यान ७५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मुंबई: अभिनेता डिनो मोरिया यांची मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात चौकशी
देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?























Subscribe to my channel




