पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देशातील मनुष्यबळाचा‎ आता योग्य उपयोग व्हावा‎

आपल्या देशासमोरील मोठ्या समस्यांपैकी लोकसंख्या ही एक‎महत्त्वाची समस्या आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत आता जगात‎पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विषयावर तज्ज्ञांची मते वेगळी‎आहेत. काहींच्या मते धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास लोकसंख्या‎वाढीत असमतोल असून भविष्यात त्याचे धोके वाढू शकतात.‎आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाहणाऱ्यांचे मते यात चिंतेचे कारण नाही.‎ मात्र, सामान्य नागरिकांना नेमके काय हवे आहे.देशातील मानवी ‎भांडवलाचा योग्य व परिणामकारक वापर व्हावा. प्रत्येकाला अन्न‎मिळावे. प्रत्येकाच्या क्षमता व गुणवत्तेचा पुरेपूर उपयोग व्हावा. भगवान‎श्रीकृष्णांनी प्रजेचे संरक्षण, विकासासाठी द्वारकेची उभारणी करून एक‎आदर्श प्रयोग केला होता. त्यात सर्वजण सुरक्षित राहतील. प्रत्येकाचा‎विकास होईल. शासक प्रगती करत असेल तर त्याच्यासोबत समाजही‎पुढे गेला पाहिजे. राजासोबत प्रजेचीही कीर्ती वाढली पाहिजे. आजच्या‎काळातही भारताच्या वाढत्या लोकसंख्येला ओझे न मानता तिचे‎सामर्थ्य म्हणून सर्वसमावेशक विकासाच्या प्रयोगांची गरज आहे.

This post was originally published on this site.



महाराष्ट्र

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *