
Raju Shetti : गेल्यावर्षीच्या ऊस हंगामातील चारशे रुपये दिल्याशिवाय चालू हंगामात ऊसाच्या कांडाला हात लावू देणार नाही असा गर्भित इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आक्रोश पदयात्रेचा कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी चांगला धसका घेतल्याचे दिसत आहे.
राजू शेट्टी यांनी उसाच्या कांडाला हात लावू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर झालेली कोंडी फोडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आणि विशेष करून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील चार साखर कारखान्यांकडून विनाकपात 3100 रुपये दर देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एकंदरीत राजू शेट्टी यांच्याकडून सुरू असलेल्या आक्रोश यात्रेचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.
|
|
चार कारखान्यांची विनाकपात 3100 रुपये दर देण्याची घोषणा
ज्या चार कारखान्यांनी विनाकपात 3100 रुपये दर देण्याची घोषणा केली आहे, गुरुदत्त, जवाहर, दत्त आणि शरद साखर कारखान्यांचा समावेश आहे. या चार साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांचे पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. दरम्यान, साखर हंगाम समाप्तीनंतर रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युलानुसार निघणारा अंतिम दर साखर आयुक्तांच्या मान्यतेनं देणार असल्याचे यामध्ये म्हटले आहे. नेमक्या याच मुद्द्यांव शेट्टी यांनी साखर कारखानदारांना धारेवर धरलं आहे.
'आरएसएफ' फॉर्मुला हा साखर कारखानदार आपल्या मनमानी पद्धतीने वापरत असल्याचा आरोपी त्यांनी आक्रोश यात्रेमधून केला आहे. दरम्यान, सीमावर्ती भागामध्ये एफआरपीनुसार 3564 रुपये दर देण्याचा घोषित करण्यात आला असला तरी त्यात तोडणी, ऊस वाहतूक खर्च वजा केल्यास प्रत्यक्ष हा दर 2900 रुपये होतो. त्यामुळे हा दर जाहीर करून एकंदरीत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
तर इथेनॅाल निर्मितीला आमचा विरोध
दरम्यान, साखर कारखान्यांनी जर उपपदार्थातील हिस्सा शेतकऱ्यांना देणार नसेल तर इथेनॅाल निर्मीतीला आमचा विरोध असून कारखान्यांनी साखरचेच उत्पादन घ्यावे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. 400 रूपयांच्या दुसऱ्या हप्त्यासाठी काढण्यात आलेली आक्रोश पदयात्रेचा आठवा मुक्काम कोडोलीत झाला.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील साखर कारखाने इथेनॅालसह वीज निर्मीती व उपपदार्थ निर्मीती मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. यामधून साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवलं आहे. मात्र, कारखानदार त्या उत्पन्नातील राहिलेल्या नफ्याचे पैसे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यास तयार नाहीत. रंगराजन समितीच्या शिफारशीतील कारण पुढे करून उपपदार्थातील वाटा शेतक-यांना देण्यास टाळाटाळ करत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेस स्वाभिमानीकडून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या म्हणण्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी साखर कारखान्यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून वित्तपुरवठा करण्यात आला आहे. या साखर कारखान्याकडून एप्रिल 2023 पासून ऑक्टोबर 2023 पर्यंत शिल्लक असलेली साखर किती दराने विक्री केली, आजअखेर साखरेचा साठा किती शिल्लक आहे? याबाबतची प्रत्येक महिन्याची सविस्तर विवरण पत्र देण्याची मागणी केली.
शहर
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
महाराष्ट्र
- अमरावती: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई आणि पुण्यासाठी थेट विमानसेवेला मंजुरी, 'उडान' योजनेअंतर्गत दोन्ही मार्गांची निवड!
- नाशिक: छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांचा जागर! ९ रुग्णवाहिका, १५० पाण्याच्या टाक्या, २५ सायकली वाटप अन् १७० रक्तपिशव्यांचे संकलन!
- पुणे: 'रॅपिडो'ला मोठा धक्का! परवान्याशिवाय चालणारी 'बाईक टॅक्सी' तातडीने बंद करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश!
- अमरावती: पन्नासाची नोट उचलण्याच्या मोहात गमावले तब्बल ५ लाख रुपये; अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यात घडलेल्या थरारक घटनेने व्यापारी वर्गात खळबळ!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: आंदोलनामुळे तब्बल २००० कोटींचं नुकसान; दिल्लीतील व्यापाऱ्यांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मोठी मागणी!
- उत्तर प्रदेश: भाजपला बालेकिल्ल्यातच मोठा धक्का! माजी खासदारासह अनेक नेत्यांचा सपाट प्रवेश; अनेक आमदारही फुटणार असल्याचा अखिलेश यादवांचा दावा!
- नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!
- दिल्ली: मोठ्या राजकीय हालचाली! संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची शक्यता; पावसाळी सत्र अद्याप अधिकृतपणे समाप्त नाही!




























Subscribe to my channel




