दररोज केवळ तीनशे रुपये कमावणाऱ्या एका वडिलांनीमुलीच्या डोळ्यांत डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले वत्यासाठी कर्ज घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही. मात्र तेमुलीला वेळेत नीटच्या परीक्षा केंद्रावर पोहोचवू शकलेनाहीत. अल्प उत्पन्न असलेल्या त्या वडिलांनी मुलीसोबतसत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. पण ते दोन मिनिटेउशिरा पोहोचले. परिणामी, त्या मुलीचे व तिच्यावडिलांचे सर्व विनवण्या, आक्रोश व अश्रू निरर्थक ठरले.कारण परीक्षा नियमांनुसार चालते. परीक्षा केंद्रावरीलसुरक्षारक्षकाला स्पष्ट आदेश होते की, निर्धारित वेळेनंतरएक मिनिट उशीर झाला तरी परीक्षार्थीला उशिरा आलेलेमानले जाईल आणि प्रवेश दिला जाणार नाही. हताश झालेले वडील जमिनीवर कोसळले होते. मुलगीत्यांना बिलगून रडत होती. मात्र, संस्थेच्या भिंतीनिःशब्दपणे फक्त घड्याळाकडे बोट दाखवत सांगतहोत्या की, तुम्ही उशिरा आलात. मग तो उशीर फक्त दोनमिनिटांचाच का असेना. एक मिनिटाचाही उशीर म्हणजेउशीरच असतो. वेळेचे महत्त्व काय असते हे जाणूनघ्यायचे असेल, तर जपानकडे पाहावे. जपानमध्ये वेळेचे काटेकोर पालन हा त्यांच्या संस्कृतीचामहत्त्वाचा भाग आहे. त्याला ‘जिकन-गेन्शु’ म्हणजेवेळेचे कठोर पालन असे म्हटले जाते. वेळेवर पोहोचणेही केवळ शिस्तबद्ध जीवनशैली नसून तुमची वाटपाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचा आदर मानला जातो. हेइतरांविषयीची जाणीव आणि विश्वास यांच्याशीहीजोडलेले आहे. जपानमध्ये वेळ पाळणे म्हणजेदुसऱ्याच्या वेळापत्रकाचा सन्मान करणे व तेथील प्रत्येकसंस्था तसेच नागरिकांच्या वर्तनात हे दिसून येते. रेल्वेप्रशासन व सरकारी अधिकारी किरकोळ विलंबाबद्दलहीजाहीर माफी मागतात. तेथील सार्वजनिक वाहतूकव्यवस्था वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध आहे. बस किंवारेल्वेला काही मिनिटे उशीर झाल्यास अधिकृत विलंबप्रमाणपत्र दिले जाते. ते प्रवासी कार्यालयात किंवा शाळेतसादर करू शकतात. मात्र, त्या वडिलांकडे असेकोणतेही प्रमाणपत्र नव्हते. त्यांच्याकडे फक्त एक मानवीसत्य होते की, पावसाच्या अडथळ्यांनंतरही ते वेळेतपोहोचण्याचा प्रयत्न करत होते. नियमांनुसार ते उशिराआले होते. पण परीक्षा केंद्राकडूनही संवेदनशीलतादाखवण्यात उशीर झाला. लोकशाहीतील शेवटचा माणूसदोन मिनिटांच्या उशिरामुळे पराभूत झाला. या घटनेने मुख्यतः दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिलाम्हणजे आपल्या देशात वेळेचे पालन हा सामाजिकसंस्कार का बनू शकत नाही? आणि दुसरा म्हणजे काहीविशेष परिस्थितीत उशिराच्या नियमांमध्ये लवचिकताअसू शकत नाही का? परीक्षा केंद्रांवर एखाद्याअपवादात्मक परिस्थितीत एक-दोन मिनिटांची सवलतदेणे अशक्य आहे का? कारण कोणताही परीक्षार्थीजाणीवपूर्वक एक-दोन मिनिटे उशिरा पोहोचण्याचीयोजना आखणार नाही. त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजेआपण वेळेला किती आदर देतो? देशात वेळेबाबत अशीनिष्ठा आहे का? बैठका वेळेवर सुरू होऊन वेळेवरसंपतात का? एखाद्याला वाट पाहायला लावल्यानेआपल्याला अपराधी वाटते का? की वेळेचे बंधनकाहींसाठी कठोर आणि काहींसाठी लवचिक असते? त्या वडिलांना आणि त्यांच्या मुलीला विश्वास होता की,माणुसकी व माणसाची करुणा अजूनही जिवंत आहे.त्यांच्या विनवण्या ऐकून कुणाचे तरी मन पिळवटूनजाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.त्या मुलीचे एक वर्ष वाया गेले. तिच्या आयुष्यातील एकावर्षावर दोन मिनिटांचा विलंब अवजड ठरला. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




