पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या व्यग्रतेमधून जेन-झीने योग-ध्यानासाठी वेळ काढावा

कबीरदासांच्या अनेक गोष्टी आजच्या काळातही खूप महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या एका ओळीला आपण जेन-झी पिढीसाठी संदेश मानू शकतो. ती ओळ म्हणजे- ‘माला तो कर में फिरे, जीभ फिरे मुख मांहि। मनुवा तो दहु दिसि फिरे, यह तो सुमिरन नाहिं।’ आता हे ऐकून असे वाटते की, कबीरदासांनी केवळ जपमाळ ओढणाऱ्यांवर उपहासात्मक टीका केली आहे, पण इथे माळ म्हणजे कर्मयोग आहे. मन कर्मयोग्याला भरकटवते. ते म्हणतात की, आपल्या ध्येयाप्रति नेहमी जागरूक राहा. मन दहा दिशांना भटकत असते. जेन-झीचा उत्साह आणि त्यांची ऊर्जाही याच प्रकारे सर्व दिशांना पसरलेली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या नव्या उत्साहाचे पडसाद उमटत आहेत. म्हणूनच कबीरांनी मन वळवण्याचा आणखी एक मार्ग सुचवला आहे. मन जेव्हा भरकटेल, तेव्हा स्वतःमध्ये डोकावणे हा तो मार्ग आहे. माणूस स्वतःमध्ये डोकावून बघेल, तेव्हा त्याला शून्यावस्थेची जाणीव होईल. हीच खरी ऊर्जा असते. जेन-झी कितीही व्यग्र असली, तरी त्यांनी योग व ध्यानासाठी थोडा वेळ नक्की काढावा.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *