युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान अमेरिकेचा इराणवर मोठा हल्ला; होर्मुज सामुद्रधुनीजवळ उडवल्या इराणी नौका! अमेरिका आणि इराण यांच्यात अत्यंत संवेदनशील वातावरणात युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच, खाडी देशांमध्ये पुन्हा एकदा लष्करी तणाव कमालीचा वाढला आहे.
अमेरिकन लष्कराने आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या होर्मुज सामुद्रधुनीजवळ (Strait of Hormuz) समुद्रामध्ये सुरुंग पेरणाऱ्या इराणी नौकांवर थेट हल्ला केला आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) या लष्करी कारवाईला दुजोरा दिला असून, हा हल्ला स्वतःच्या रक्षणासाठी (Self-Defence Strikes) केला असल्याचे स्पष्ट केले आहे. सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्फोटमिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने केवळ इराणी नौकांवरच हल्ला केला नाही,
तर इराणच्या बंदर अब्बास पोर्टजवळ असलेल्या 'सरफेस टू एअर' मिसाइल तळालाही (Surface-to-Air Missile Sites) लक्ष्य केले आहे. अमेरिकन लष्कराचे प्रवक्ते कॅप्टन टिम हॉकिन्स यांनी सांगितले की, इराणी नौका या भागात जहाजांसाठी घातक ठरणारे सागरी सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करत होत्या.
अमेरिकन जवानांच्या आणि व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी ही कारवाई आवश्यक होती. युद्धविराम लागू असतानाही अमेरिकेने संयम राखत केवळ धोका निर्माण करणाऱ्या घटकांवरच हा मर्यादित हल्ला केला आहे. युद्धविरामाच्या चर्चेवर काय होणार परिणाम?हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
ट्रम्प आणि इराणचे प्रशासन यांच्यात शांतता कराराबाबत सकारात्मक चर्चा पुढे सरकत होती. इराणने आपला संवर्धित युरेनियमचा साठा नष्ट करण्यासाठी किंवा अमेरिकेकडे सोपवण्यासाठी तत्वतः मान्यता दिली असल्याची चर्चा असतानाच या ताज्या संघर्षामुळे तणाव वाढला आहे. तथापि, ज्येष्ठ अमेरिकन पत्रकारांच्या विश्लेषणानुसार, युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही अशा लहान-मोठ्या लष्करी चकमकी किंवा सुरक्षेसाठी केलेले हल्ले यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहायला मिळाले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्वीच स्पष्ट केले होते की, स्वसंरक्षार्थ केलेल्या अशा कारवाईला युद्धविराम मोडला गेला असे मानले जाणार नाही. ट्रम्प प्रशासन अजूनही इराणसोबत एक मोठा आणि अर्थपूर्ण शांतता करार करण्यासाठी उत्सुक आहे.इराणकडून संताप व्यक्तदुसरीकडे, इराणने अमेरिकेच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला असून हा युद्धविरामाचा थेट भंग असल्याचा आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर इराणकडून केल्या जाणाऱ्या हालचालींना अमेरिकेने लक्ष्य केल्यामुळे इराणचे लष्कर देखील सतर्क झाले आहे. या हल्ल्यात नेमकी किती जीवितहानी किंवा वित्तहानी झाली आहे, याची अधिकृत आकडेवारी दोन्ही देशांकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे जगातील सर्वात महत्त्वाच्या खनिज तेल वाहतूक मार्गावर (Strait of Hormuz) पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत.
शहर
- पुणे: गणेश विसर्जन मिरवणूक वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून तब्बल २६ ठिकाणी वाहन पार्किंगची जय्यत व्यवस्था!
- पुणे: पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी पुणे महानगरपालिका प्रशासन सज्ज; नदीपात्रात घाटांवर, कृत्रिम हौद आणि लोखंडी टाक्यांची व्यापक व्यवस्था!
- मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार निवडणूक जिंकले; संजय राऊत यांचा गंभीर आरोप!
- पुणे: अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बारामती दौरा निश्चित; २४ ऑक्टोबरला करणार 'प्रेरणास्थळा'चे उद्घाटन, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा!
महाराष्ट्र
- नंदुरबार: प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या दोन खासगी बसेसवर मोठी कारवाई; आरटीओच्या वायुवेग पथकाकडून दंड वसूल!
- जालना: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अन् हेक्टरी भरपाई द्या; मागण्या मान्य न झाल्यास पाटोद्यावरून मुंबईकडे कूच करण्याचा मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
- गोवा:राजकारणात खळबळ मंत्री विश्वजित राणे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांची भेट, दिल्लीत महत्त्वपूर्ण चर्चा!
- महाराष्ट्र: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर!
गुन्हा
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
- दिल्ली: धर्म म्हणजे कोणताही रिलीजन किंवा पूजापद्धती नव्हे; राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण विधान आणि धर्माची नेमकी व्याख्या
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!






























Subscribe to my channel




