आजपासून बरोबर 25 वर्षांपूर्वी मी एक सहायक संपादक होतो आणि या वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर अग्रवाल यांच्यासोबत एका नवीन उपक्रमावर जवळून काम करत होतो. मी त्यांना प्रेमाने ‘एसए’ म्हणायचो. संध्याकाळची वेळ होती. आम्ही नुकतीच संपादकीय बैठक संपवली होती, ज्यामध्ये 12 सप्टेंबरच्या अंकात काय-काय जाणार हे ठरवले होते. मी माझ्या खुर्चीवर परत येऊन काम करण्याची तयारी करत होतो तेवढ्यात एसए माझ्या केबिनमध्ये आले. साधारणपणे ते मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवायचे. त्यांनी विचारले, ‘तू बातम्या पाहिल्यास का?’ मी म्हणालो, ‘नाही.’ ते थांबले नाहीत, फक्त वळले आणि म्हणाले की ‘माझ्यासोबत चल.’ मी त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या केबिनमध्ये गेलो. तिथे एन.के. सिंह आणि श्रवण गर्ग यांच्यासह इतर वरिष्ठ संपादकांसोबत आम्ही टीव्ही स्क्रीनवर घडत असलेली ती भयावह घटना पाहिली- तो हल्ला, जो 21 व्या शतकातील सर्वात घातक दहशतवादी हल्ला ठरणार होता. 25 वर्षांनंतर आज मला एसए यांचे माझ्या केबिनमधून त्यांच्या केबिनपर्यंत जाणे आणि त्यांचा चिंतेने भरलेला स्वर पुन्हा आठवला, जेव्हा अँथ्रोपिकचे संशोधक जेकब कॉक्सन यांनी एआयच्या वेगाने होणाऱ्या प्रगतीबाबत एक धडकी भरवणारा इशारा दिला. मंगळवारी त्यांनी इशारा दिला की 2030 पर्यंतच एआय मानवतेसाठी अस्तित्वाचे संकट निर्माण करू शकते. त्यानंतर त्यांनी आपली नोकरी सोडली आणि जोर देऊन सांगितले की त्यांचा इशारा कोणताही ‘मार्केटिंग स्टंट’ नाही. कॉक्सन यांनी ओपनएआय आणि अँथ्रोपिक, या दोन्ही कंपन्यांवर ‘थेट सेल्फ-इम्प्रूव्हिंग सुपरइंटेलिजन्सच्या शर्यतीत सामील होण्याचा’ आणि ‘आपल्या जीवनाशी जुगार खेळण्याचा’ आरोप लावला. त्यांना भीती आहे की वेगाने सक्षम होत चाललेल्या एआय प्रणाली संगणक नेटवर्क हॅक करू शकतात, सायंटिफिक रिसर्च करू शकतात, संसाधने गोळा करू शकतात आणि इतके स्वायत्त्व होऊ शकतात की मानवाचे त्यांच्यावरील नियंत्रण सुटेल. आणि कदाचित त्यांच्या बोलण्यात तथ्यही आहे. असे मी फक्त हे विचार करून म्हणत नाहीये की एआय पुढे जाऊन काय बनू शकते, तर हे पाहून म्हणत आहे की तंत्रज्ञान आधीपासूनच आपल्या घरांमध्ये काय करत आहे. मला मुलांच्या खोल्यांमध्ये ब्लँकेटच्या आतून येणारा तो अंधुकसा प्रकाश आणि हळूवार हसू आठवते. हे हसू अनेकदा सोशल मीडिया पोस्टवर मिळणाऱ्या लाइक्स आणि रिॲक्शन्सवरून यायचे, जेव्हा टीनएजर्स आपल्या मित्रांशी तुलना करायचे की कुणाला किती लाइक्स आणि रिॲक्शन मिळाल्या. लगेचच एक फायर-शेप्ड आयकॉन हे सांगण्यासाठी पाठवला जायचा की ‘मला हेवा वाटतोय.’ त्या सर्व रात्री आठवा, जेव्हा पालक म्हणून आपल्याला आपल्या मुलांच्या खोलीतून हसण्याचा आवाज यायचा. आपण आत जाऊन विचारायचो की ‘रात्रीचे 2 वाजले आहेत, अजून झोपला नाहीस?’ असे यासाठी होते, कारण जे तंत्रज्ञान त्यांना आकर्षित करत होते, ते इतके ॲडिक्टिव्ह होते की त्यांना जाणीवच होत नसे की ज्या वेळी त्यांनी सुरुवात केली होती, वेळ त्याहून 5 तास पुढे निघून गेली आहे. जी गोष्ट आपल्याला निरागस वाटत होती, ती प्रत्यक्षात खूप खोल होती. तंत्रज्ञान गुपचूप संपूर्ण एका पिढीच्या इतरांकडून ॲप्रूव्हल मिळवण्याच्या, स्वतःची तुलना करण्याच्या आणि भावना कम्युनिकेट करण्याच्या पद्धती बदलत होते. हेच कारण आहे की एआयबाबत सुरू असलेली चर्चा मला चिंतेत टाकते. धोका 9/11 सारखा आवाज आणि विनाश घेऊन येणार नाही. तो गुपचूप येऊ शकतो- स्क्रीनवरून स्क्रीनवर, घराघरात आणि एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात. मग अचानक आपल्याला जाणीव होईल की काही मूलभूत गोष्टी बदलल्या आहेत. म्हणूनच आश्चर्य नाही की मेटानेही आगामी 6 महिन्यांत टीनएजर युजर्सच्या बचावासाठी नवीन सुरक्षा उपाय लागू करण्यासाठी पावले उचलली आहेत. जर असे झाले तर पालक म्हणून अमर्याद स्क्रोलिंगबाबतची आपली चिंता थोडी कमी होईल. कारण, मेटाने टीनएजर्ससाठी इन्स्टाग्राम, फेसबुकवर दररोज 2 तासांची कालमर्यादा लागू करण्यास आणि मध्यरात्रीपासून सकाळी 6 वाजेपर्यंत ॲप्स ब्लॉक करण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, यादरम्यान डायरेक्ट मेसेज सुविधा उपलब्ध राहील. लाइक्स आणि रिॲक्शनची संख्याही ऑटोमॅटिकली लपवली जाईल, जेणेकरून टीनएजर्स आपली आणि इतरांची संख्या पाहून तुलना करू शकणार नाहीत.
फंडा असा की - जसजसे जग ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स आणि एआयच्या त्रुटींबाबत जागरूक होत आहे, आपण हा प्रश्न विचारला पाहिजे की हे शक्तिशाली टूल्स मानवतेसाठी पुढील 9/11 बनू शकतात का? विनाश येण्यापूर्वी आपल्याला यावर वेगाने विचार करावा लागेल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

म्हसावद पोलिसांची धडक कारवाई; ₹१०.३७ लाखांचा अवैध दारूसाठा व वाहन जप्त!
कुख्यात ड्रग्ज तस्कर सनी पगारेचा जेलमधील VIDEO व्हायरल; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!
सिंहगड कॉलेजमध्ये NSUIचा अचानक पाहणी दौरा; ‘हजेरी लावून कर्मचारी गायब’चा आरोप!
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




