पुणे: पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात राज्य शासनाकडून विविध अटी व शर्तींवर कब्जेहक्काने किंवा भाडेतत्त्वावर (Lease) वाटप करण्यात आलेल्या शासकीय जमिनींचा मोठा शर्तभंग (Violation of Conditions) झाल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत तब्बल ३३० प्रकरणांमध्ये नियमभंग झाल्याचे निष्पन्न केले असून, त्यापैकी प्रत्यक्ष कारवाई करत सुमारे साडेतीनशे कोटी (३५० कोटी) रुपये बाजारमूल्य असलेल्या ३० ते ४० महत्त्वाच्या जागा व भूखंड जिल्हा प्रशासनाने आपल्या ताब्यात घेऊन पुन्हा शासनजमा केले आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, शासनाने विविध शैक्षणिक, संस्थात्मक, औद्योगिक, व्यावसायिक किंवा इतर सार्वजनिक व खासगी हेूंसाठी सवलतीच्या दरात किंवा विशिष्ट अटींवर जमिनींचे वाटप केले होते. मात्र, ज्या उद्देशासाठी जमीन देण्यात आली होती, त्या नियमांचे व अटींचे उल्लंघन करून जमिनीचा परस्पर व्यावसायिक वापर करणे, विहित मुदतीत बांधकाम न करणे, किंवा नियमबाह्य हस्तांतरण करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे महसूल विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले.
या संपूर्ण मोहिमेत सर्वाधिक शर्तभंगाचे व नियमबाह्य वापराचे प्रकार हे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या हद्दीत तसेच शहरालगतच्या महत्त्वाच्या विकसित भागात असल्याचे समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर एकूण ११२ जमिनींवर धडक कारवाईची प्रक्रिया सुरू केली असून, त्यातील ३० ते ४० मोठे आणि मोक्याचे भूखंड थेट जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या जमिनींचे एकत्रित बाजारमूल्य अंदाजे ३५० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शासकीय जमिनींचे असे विनापरवाना व नियमबाह्य हस्तांतरण किंवा शर्तभंग करणाऱ्यांवर जिल्हा प्रशासनाने आता विशेष मोहीम उघडली आहे. महसूल विभागाच्या या कठोर कारवाईमुळे लाटल्या गेलेल्या किंवा चुकीच्या पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या शासकीय जमिनींचे बिंग फुटले असून, अनधिकृत कब्जाधारकांमध्ये आणि भूमाफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळात अशाच प्रकारच्या इतर प्रकरणांमध्येही तीव्र दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




